वंचित बहुजन आघाडी गाव शाखा दाभोळे

  • Home
  • India
  • Ratnagiri
  • वंचित बहुजन आघाडी गाव शाखा दाभोळे

वंचित बहुजन आघाडी गाव शाखा दाभोळे समाजातील बहुजन जे सत्तेपासून वंचित आहेत. त्यांना सत्त्ता मिळवून देन्यासाठी प्रस्थापितांविरोधात हा लढा

चंदनापरी झिजल्या, आपल्या सुगंधाने मोहून कायम कनल्या म्हणून 9 कोटी जनतेच्या माऊली बनल्या..धन्य त्या माता रमाई ला विनम्र अ...
27/05/2026

चंदनापरी झिजल्या, आपल्या सुगंधाने मोहून कायम कनल्या म्हणून 9 कोटी जनतेच्या माऊली बनल्या..धन्य त्या माता रमाई ला विनम्र अभिवादन.

28/11/2025

दाभोळे जिल्हा परिषद गट-गणात वंचित बहुजन आघाडी स्वबळावर रिंगणात; तिन्ही जागांवर ताकद दाखवण्याची तयारी

दाभोळे : आगामी 2025/2026 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने दाभोळे जिल्हा परिषद गट आणि गणांमध्ये स्वबळावर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. तिन्ही जागांवर ताकद दाखवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला असून ही माहिती पंचायत व जिल्हा परिषद प्रतिनिधींनी दिली.

प्रस्थापित पक्षांनी बहुजन समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, “आमचा विकास कोण करणार यावर आता विश्वास उरलेला नाही. बहुजन, ओबीसी, एसटी, एससी, मुस्लिम बांधवांना एकत्र घेऊन सत्ताबदल घडवून आणण्याचा आमचा संकल्प आहे,” असे प्रतिनिधींनी सांगितले. तळागाळातील उपेक्षित, वंचित घटकांना संधी देत उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.

मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेनंतर राज्यभरात पक्षाबद्दल नवचैतन्य निर्माण झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. “स्थापन झाल्यापासून सातत्याने विरोधी भूमिका निभावणारा हा एकमेव पक्ष आहे, त्यामुळे भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या मतदारांचा कल वंचित बहुजन आघाडीच्या दिशेने झुकत आहे,” असा दावा पक्ष कार्यकर्त्यांनी केला.

गावोगावी, शहरांत, मुंबईत तसेच तरुणाई व महिलांमध्ये पक्षाचा सूर उमटत असल्याने आगामी निवडणुकीत याचा निश्चितच लाभ होणार असल्याचा विश्वास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. “आमचा विकास हाच आमचा ध्यास आणि जनतेचा विश्वास,” असे म्हणत पक्षाने निवडणूक रणांगणात उतरण्याची स्पष्ट घोषणा केली आहे.

07/11/2024

Address

Dabhole Tal/Sangmeshwer Dist/Ratnagiri
Ratnagiri
415804

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी गाव शाखा दाभोळे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category