Collector & District Magistrate - Ratnagiri

Collector & District Magistrate - Ratnagiri Official Page of District Collector & Magistrate - Ratnagiri

For Emergencies, Complaints & Suggest

15/07/2026

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६

गणपतीपुळे विकास आराखडा बैठक.
10/07/2026

गणपतीपुळे विकास आराखडा बैठक.

खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी येथे घडलेल्या दुर्घटनास्थळाला आज महसूल राज्यमंत्री योगेश कदम आणि जिल्हाधिकारी मनु...
07/07/2026

खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी येथे घडलेल्या दुर्घटनास्थळाला आज महसूल राज्यमंत्री योगेश कदम आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व स्थानिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच मदत कार्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी हेल्पलाईन!संकटाच्या काळात घाबरू नका – त्वरित मदतीसाठी हेल्पलाईनचा वापर करा.सतर्क राहा, ...
06/07/2026

आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी हेल्पलाईन!

संकटाच्या काळात घाबरू नका – त्वरित मदतीसाठी हेल्पलाईनचा वापर करा.

सतर्क राहा, सुरक्षित राहा...

#पावसाळा
#आपत्कालीनमदत




जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हास्तरीय लोकशाही दिन झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जि...
06/07/2026

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हास्तरीय लोकशाही दिन झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सागर पाटील यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
नवीन अर्ज तसेच प्रलंबित अर्जांचा जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला. 15 दिवसात प्रलंबित अर्जांची निर्गती झाली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, रस्ता, मोजणी, नुकसानीचा मोबदला, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम असे विषय स्थानिक स्तरावरच ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसिलदार जास्तीत जास्त उपविभागीय अधिकारी स्तरावर सुटायला हवेत. सर्व सामान्य नागरिक आपल्या समस्या घेऊन जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये येत असतात, हे योग्य नाही. या लोकांचे प्रश्न जागेवरच संबंधित यंत्रणेने मार्गी लावून न्याय द्यायला हवा. सामान्य नागरिकांवर आपल्या डोळ्यांसमोर अन्याय होत असेल, तर हे बरोबर नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित विषय 15 दिवसात निकालात काढावेत, असेही ते म्हणाले.
क्षेत्रीयस्तरावरील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

11/05/2026

नागरिकांनी स्वगणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा
- जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, दि. 10 (जिमाका):- "जनगणना हा देशाच्या आणि जिल्ह्याच्या भविष्यातील नियोजनाचा पाया आहे. या महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी १५ मेपर्यंत स्वगणना करुन सक्रिय सहभाग नोंदवावा. आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकांना अचूक माहिती देऊन जिल्ह्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे," असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे..

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानचा रत्नागिरी तालुक्यातील फणसोप मंडळाचा कार्यक्रम येथे पार पडला यावेळी...
17/04/2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानचा रत्नागिरी तालुक्यातील फणसोप मंडळाचा कार्यक्रम येथे पार पडला यावेळी मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी श्री. मनुज जिंदल व स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि लाभार्थी उपस्थीत होते.
या शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड, सातबारा आणि आवश्यक ती कागदपत्रे वितरित करण्यात आले.

रत्नागिरी तालुक्यातील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी कार्यालय ,फणसोप च्या नुतन इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन जिल्हा...
17/04/2026

रत्नागिरी तालुक्यातील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी कार्यालय ,फणसोप च्या नुतन इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री. मनुज जिंदल यांच्या हस्ते करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा - २०२६ शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला मा. ...
16/04/2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा - २०२६ शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला मा. ना. डॉ. उदय सामंत मंत्री उद्योग , मराठी भाषा तथा पालकमंत्री रत्नागिरी व मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी श्री. मनुज जिंदल, भा .प्र.से, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी मा. वैदही रानडे व आदी मान्यवर उपस्थीत होते.

रत्नागिरी  येथे होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केंद्र याला मा.ना.डॉ. उदय सामंत, मंत्...
10/04/2026

रत्नागिरी येथे होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केंद्र याला मा.ना.डॉ. उदय सामंत, मंत्री (उद्योग,मराठी भाषा) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी भ.प्र.से. मनुज जिंदल यांनी भेट देऊन कामाचा आढावा घेतला .

Address

Ratnagiri

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Collector & District Magistrate - Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Collector & District Magistrate - Ratnagiri:

Shortcuts

Share