30/03/2026
#सरकारी #ग्रामीण #रुग्णालय #साखरपा
साखरपा बाजार पेठेत, लाखो रुपये खर्च करून, एवढा मोठा नवीन सरकारी दवाखाना बांधला आहे. पण त्या दवाखान्यात , रुग्णांच्या सेवेसाठी, शासनाने, आतापर्यंत एकाही तज्ञ #डॉक्टरांची, कायमस्वरूपी नियुक्ती केलेली नाही.
#साफ चावला, #कुत्रा चावला तरी, पेशंटला, #रत्नागिरी किंवा #कोल्हापूरला जावे लागते.
याच्यावर सर्वांनी मिळून आवाज उठवला पाहिजे, आणी लोक लढा दिला पाहिजे.
या नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नावर, गेली कित्येक वर्ष, कोणीही आवाज उठवत नाहीत किंवा साधे आंदोलन करत नाहीत.
पंचक्रोशीतील स्थानिक पातळीवरिल पुढारी, लोक प्रतिनिधी, आमदार, याना या समस्येच, काहीही गांभीर्य वाटत नाही किंवा त्यांना त्यांच काही पडलेलं नाही.
#कोकणातील जनता आपल्या गावातील एखाद्या समस्येवर किंवा आपल्या भागांतील गैरसोय, शासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी, सर्वांनी एकत्र येऊन, एकजुटीने आंदोलन करायला केव्हा शिकणार? कोल्हापूरांसारखी. एखाद्या अन्यायाविरोधात लढा द्यायला कधी शिकणार, कोल्हापूरच्या नागरिकांसारखे. झोपेचे सोंग घेतलेली, कोकणातील नागरिक कधी जागे होणार?
या दोन्ही सरकारी दवाखान्यात पूर्वीसारख्या चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी तेथील पंचक्रोशीतील स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले पाहिजे.
टीप: साखरपा बाजार पेठेतील, या सरकारी दवाखान्यात, दवाखान्याची जुनी कौलारू इमारत असताना, पंचक्रोशीतील रूग्णांना खूप चांगल्या, आरोग्य सुविधा मिळत होत्या. पण आता चांगली टुमदार नवीन सर्वसोयीनियुक्त, सुसज्य अशी नवीन इमारत होऊन देखील, पूर्वीसारखा चांगल्या आरोग्य सोयी सुविधा मिळत नाहीत, हे दुर्दैव.
प्रश्न = साखरपा कोंडगाव पंचक्रोशीतील नागरिकांना, या सरकारी दवाखान्यात चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा कधी मिळणार?
कोकणातील साखरपा येथील या प्राथमिक आरोग्य केंद्राला, ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा कधी मिळणार ?
तसेच #संगमेश्वर तालुक्यातील, #देवरूख या मुख्य शहरात असलेल्या, ग्रामीण रुग्णालयाचे , उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर कधी होणार?
धन्यवाद.