Taluka Dapoli

Taluka Dapoli News/Publishing research on cultural, historical and social aspects of Dapoli

झंझावाती वेगानं वाढणारी आधुनिकता गाव आणि गावाचे गावपण नष्ट करत चालली आहे. विकास होतोय असं मानलं, तरी ह्या विकासात मूळ भूमिपुत्र सबळ होताना दिसत नाही. उलट अधिकाधिक भरडला जातो, हे चित्र आहे. त्यामुळे बदलत्या विकासाशी मूळ मातीतला माणूस जोडलेला असावा आणि त्याच बरोबरीने त्याच्याशी जोडलेला पारंपरिक, सांस्कृतिक, जगण्याचा समृद्ध ठेवा शतकानुशतके टिकून राहावा, या विचाराखाली उचलेला हा मुंगीएवढा वाटा म्हणजे आ

मचा 'तालुका दापोली' हा उपक्रम. आम्ही या उपक्रमाद्वारे दापोली गाव आणि शहर यातील सर्व लोकांना एकत्रित करू पाहतोय. शिवाय जे मूळ दापोलीचे असून सध्या मुंबई आणि अन्य भागात वसलेले आहेत, अशा सगळ्यांना माहितीच्या जाळ्यात आणून हे जाळे दापोलीत आणून रुंद करायचे आहे. ज्यामुळे लोक माहिती देऊन-मिळवून स्वतः व दुसऱ्याला अधिकधिक कार्यक्षम करून भरभराटीस येतील. त्यामुळे इथे आम्ही केवळ एक माध्यम आहोत.

आवडल्यास नक्की लाईक करा आणि आमचा उत्साह वाढवण्यासाठी सहकार्य करा......

धन्यवाद....

https://www.facebook.com/talukadapoli/

https://www.facebook.com/share/p/6Epg6TvV1oybM4WU/?mibextid=qi2Omg
06/09/2024

https://www.facebook.com/share/p/6Epg6TvV1oybM4WU/?mibextid=qi2Omg

गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा! गणेशाच्या प्रतिष्ठापनेत वापरण्यात येणाऱ्या विविध पत्री तसेच फळे इत....

फाल्गुनोत्सव व होळी फाल्गुन हा दक्षिणेत वर्षाचा शेवटचा मास गणिला जातो. हा इंग्रजी मार्च महिन्याच्या सुमारास येतो. श्रीकृ...
16/03/2024

फाल्गुनोत्सव व होळी फाल्गुन हा दक्षिणेत वर्षाचा शेवटचा मास गणिला जातो. हा इंग्रजी मार्च महिन्याच्या सुमारास येतो. श्रीकृष्णाप्रीत्यर्थ या महिन्यात गाई, तांदूळ व वस्त्रे यांची दाने करावी असे काही पौराणिक संदर्भ सांगतात. फाल्गुनी पौर्णिमा ही मन्वादि आहे. या तिथीला होलिका असे म्हणतात. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला जो सण साजरा केला जातो त्यास होलिकोत्सव असे म्हणतात. ‘होळी’ हा शब्द ‘होलिका’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. याशिवाय ‘होलाका’ असेही म्हणतात. होलाका म्हणजेच ‘वसंतमहोत्सव’. स्थानपरत्वे यास शिमगा, होलिकादहन, हुताशनी महोत्सव, दोलायात्रा अशी नावे आहेत.( उत्तरेत दोलायात्रा, कोकण महाराष्ट्रात शिमगा व होळी आणि दक्षिणेत कामदहन. )

Read more at: https://talukadapoli.com/folk-art/shimga-history/

Dapolicha Online Shimgotsav | Taluka Dapoli Shimga History | शिमगा इतिहास 'www.talukadapoli.com' is a research project that aims to make information availabl...

गोरखचिंच. जगातील दुर्मिळ वृक्षांमध्ये या झाडाची गणना होते. मूलतः आफ्रिका खंड, अरबी व्दिकल्प, मादागास्कर या भागात आढळणारी...
08/01/2024

गोरखचिंच. जगातील दुर्मिळ वृक्षांमध्ये या झाडाची गणना होते. मूलतः आफ्रिका खंड, अरबी व्दिकल्प, मादागास्कर या भागात आढळणारी ही वृक्षप्रजाती अरब आणि आफ्रिकन लोकांनी भारतात आणली. बाँबेकेसी कुळ असल्यामुळे या वृक्षाला बाओबाब, तर माकडांना याची फळे आवडत असल्यामुळे ‘मंकी ब्रेड ट्री’ असे या झाडाला म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव आहे, ‘ॲडॅन्सोनिया डिजीटाटा’. अठराव्या शतकात फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञ मायकेल ॲडन्सने या वृक्षाचे वर्णन केल्यामुळे त्याच्या सन्मानार्थ शास्त्रीय नावातील वंशाचे नाव ‘ॲडॅन्सोनिया’ आणि हाताच्या बोटासारख्या खंडावरून जागतिक नाव ‘डिजीटाटा’ असे देण्यात आले. भारतात या झाडाला गोरख इमली , गोरख आमली, रुखडो, ब्रम्हलीका असे संबोधले जाते. महाराष्ट्रात हा वृक्ष गोरख चिंच नावाने ओळखला जातो . यातील गोरख हा शब्द ‘गोरक्षी’ शब्दाचा अपभ्रंश दिसतो, तर फळ चिंचेप्रमाणे आंबूस म्हणून ‘चिंच’ ही उपाधी दिलेली आढळते. या झाडाची उंची ५० फुटांपर्यंत होत असून हा पानगळी वृक्षात मोडतो. झाडाचा बुंधा फारच मोठा असून खोडाचा परीघ १०० फुटापर्यंतही असतो. झाडाची साल गुळगुळीत व करडी असते. पाने हस्ताकृती संयुक्त , लांब देठाची आणि मोठी दले असलेली असतात. याचे फूल साधारणतः १५ सेमी व्यासाचे, रंगाने पांढरे कक्षस्थ व लोंबते असते. त्यांना मंद सुहास असतो. फुल गळून तेथे जे फळ येते ते आकाराने दुधी-भोपळ्यासारखे किंवा नारळासारखे असते. फळाची साल मखमली, लवदार असून वजन साधारणतः दिड किलोपर्यंत असते. फळातला गर चवीला चिंचेसारखा असतो आणि त्यात व्हिटामिन ‘सी’ ची मात्रा भरपूर असते. गराचं सरबत अतिशय शितल असून शरीरातला दह आणि तृष्णा कमी करतं. दमा, अतिसार आणि आव पडणे इत्यादी विकारांवर ते गुणकारी आहे. फळाप्रमाणे झाडाची साल व लाकुड अत्यंत उपयोगी आहे. खोडाच्या अंतरसालापासून मजबूत दोर व गोणपाट तयार केले जातात. आंतरसाल उत्तम टिकावू असल्यामुळे त्याचा वापर ब्राउन पेपर तयार करण्यासाठी होतो. झाडाचे लाकूड हलके असल्यामुळे गुजरातमध्ये मासेमारीसाठी याच्या लाकडापासून होड्या तयार केल्या जातात .

Read more at: https://talukadapoli.com/dapoli-special/baboab-tree-information/

गोरखचिंच. जगातील दुर्मिळ वृक्षांमध्ये या झाडाची गणना होते. मूलतः आफ्रिका खंड, अरबी व्दिकल्प, मादागास्कर या भागात ....

‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट बनवून दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला. २००९ साली आलेल्या ‘हरिश्चंद्राच...
16/12/2023

‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट बनवून दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला. २००९ साली आलेल्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमातून फाळकेंचा पहिल्या चित्रपटाचा प्रवास कसा घडला? हे आपण पहिले असेलच. नाटकाच्या बहारदार काळात चित्रपटासाठी नट मिळवताना फाळकेंना मोठी खटाटोप करावी लागली. पण इतर पात्रांसाठी फाळकेंची जेवढी दमछाक झाली, तेवढी हरिश्चंद्रासाठी झाली नाही. फाळकेंना त्यांच्या चित्रपटाचा नायक लगेच मिळाला होता आणि ते होते श्री. दत्तात्रय दामोदर दाबके.

Read more at:

Dattatreya Damodar Dabke - the first hero of Indian cinema

दापोली तालुक्यात गगनाला भिडणारं, अतिशय सुंदर आणि पर्यटकांना खूप आकर्षित करेल असं एक ठिकाण आहे, ते म्हणजे 'देवाचा डोंगर'....
13/12/2023

दापोली तालुक्यात गगनाला भिडणारं, अतिशय सुंदर आणि पर्यटकांना खूप आकर्षित करेल असं एक ठिकाण आहे, ते म्हणजे 'देवाचा डोंगर'. समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचावर असलेलं हे ठिकाण चार तालुक्यांचं केंद्रस्थान आणि दोन जिल्ह्यांच्या सीमा जोडणारं आहे. डोंगरावरच्या चार वाड्या दापोली, खेड, महाड, मंडणगड या चार तालुक्यांमध्ये विभागलेल्या आहेत. चारही वाड्यांमधून समस्त धनगर समाज राहतो. डोंगराच्या मध्यवर्ती शंकराचं स्वयंभू स्थान आहे, या स्थानामुळेचं डोंगराला 'देवाचा डोंगर' असे म्हटलं जातं. शिवमंदिर अगदी साधेसुधं आहे; पण मंदिराच्या परिसरातून चौफेर जे निसर्गाचे अप्रतिम, विहंगम दृश्य दिसतं, ते डोळ्यांना आणि मनाला अतिशय सुखद करणारं असतं. थंडीच्या दिवसात तर हे ठिकाण अनुभवण्याची निश्चितच एक वेगळी मजा आहे.

दापोली तालुक्यात गगनाला भिडणारं, अतिशय सुंदर आणि भविष्यात पर्यटकांना खूप आकर्षित करेल असं एक ठिकाण आहे, ते म्हणज.....

पशुधनाच्या व्यवस्थापनामधील प्रमुख घटक म्हणजे आहार व्यवस्थापन. नेहमीच्या आहारा सोबतच अझोला या खाद्याचा समावेश केला असता श...
07/12/2023

पशुधनाच्या व्यवस्थापनामधील प्रमुख घटक म्हणजे आहार व्यवस्थापन. नेहमीच्या आहारा सोबतच अझोला या खाद्याचा समावेश केला असता शेतकऱ्यांना पशूंचे आहार व्यवस्थापन अधिक चंगल्या आणि आरोग्यदायी करता येईल. अझोला या वनस्पतीमध्ये प्रथिनांचा समावेश अधिकतर असतो. या वनस्पतीची लागवड कशी करावी व पशुधनासाठी खाद्य म्हणून तिचा वापर कसा करावा याची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ जरूर पहा:

पशुधनाच्या व्यवस्थापनामधील प्रमुख घटक म्हणजे आहार व्यवस्थापन. नेहमीच्या आहारा सोबतच अझोला या खाद्याचा समावेश क...

मधुमक्षिका पालन माहिती
21/11/2023

मधुमक्षिका पालन माहिती

'www.talukadapoli.com' is a research project that aims to make information available to all the people in Dapoli district in digital form which will facilita...

थंडीच्या दिवसात दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांवर या परदेशी पाहुण्यांची गर्दी पहायला मिळते. हे पाहुणे खूप लांबचा प्रवास करून ...
16/11/2023

थंडीच्या दिवसात दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांवर या परदेशी पाहुण्यांची गर्दी पहायला मिळते. हे पाहुणे खूप लांबचा प्रवास करून येथे आलेले असतात. सकाळी ६-७ च्या सुमारास आणि सायंकाळी ६-७ च्या सुमारास यांचे थवेच्या थवे आपल्याला पाहायला मिळतात. यांच्या येण्या-जाण्याचा व किनारी थांबण्याचा मार्ग निश्चित नसतो. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातील फॉरेस्ट्री विभागाच्या विद्यार्थ्यांनी २०१७ मध्ये हिवाळ्यात स्थालांतर करून येणाऱ्या या पक्ष्यांचा एक स्टडी केला होता. हा स्टडी दापोली मर्यादित होता. स्टडी दरम्यान आढळलेल्या या Gull आणि Tern म्हणजेच कुरव आणि सुरय पक्ष्यांची सविस्तर माहिती घेऊ.

Read more at: https://talukadapoli.com/dapoli-special/seagull-birds-in-dapoli/

Seagull Birds flock to the beaches of Dapoli (Maharashtra, Ratnagiri) in winters. In Dapoli, you can see swarms of these Seagull birds around 6-7 in the morn...

दापोली आज एक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होत आहे. परंतु खरे पाहिले तर सगळ्यात आधी ते एक ऐतिहासिक स्थान म्हणून विकसित व्ह...
09/11/2023

दापोली आज एक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होत आहे. परंतु खरे पाहिले तर सगळ्यात आधी ते एक ऐतिहासिक स्थान म्हणून विकसित व्हायला हवे. कारण इथल्या पावन भूमीने अनेक नररत्न, अनेक युगपुरुष देशाला दिले आहेत. ज्यांच्या कार्याचा गौरव निव्वळ भारतभर नव्हे तर जगभर आहे असे. त्याचं महात्म्यांपैकी एक म्हणजे ‘महर्षी धोंडो केशव कर्वे’, महाराष्ट्राचे लाडके ‘अण्णा.’ कर्वेंचं मूळ जन्मस्थान त्यांच आजोळ शेरवली; पण अण्णांच बालपण वाढलं ते दापोलीतल्या मुरुडच्या अंगाखांद्यावर खेळून. मुरुडच्याच सरकारी शाळेमध्ये त्यांच प्राथमिक शिक्षण झालं. अण्णा लहानपणापासूनच हुशार, बुद्धिमान आणि आज्ञाधारी होते. शिवाय सुस्कांराबरोबर रामविजय , हरिविजय, शिवलीलामृत हे वाचण्याचा दररोज घरी परिपाठ असल्यामुळें अण्णाची वाणी खणखणीत शुद्ध आणि स्पष्ट होती. मुरुडमधील लोकांना सार्वजनिक प्रश्नांची माहिती करून देण्यासाठी गुरुजींच्या सांगण्यावरून ते सायंकाळी पाच वाजल्यापासून दिवे लागणीपर्यंत तेथील दुर्गा मंदिरात बसून वर्तमानपत्र वाचीत असत. कमावते झाल्यानंतर अण्णांनी पुढाकार घेऊन याच मंदिराची कुजून गळू लागलेली रिफ बदलून घेतली. त्यांच्या प्रतिभाशाली, कर्तबगार आयुष्याची चणी खऱ्या अर्थाने येथूनच उभी राहिली. मुरुड गावावर त्यांचे फार प्रेम असल्यामुळे मुरुड फ़ंडामार्फत ग्रामविकासासाठी जमेल तेवढे प्रयत्न त्यांनी केले. पहिली पत्नी राधाबाई सोबतचा सुखी संसार अण्णांनी या मुरुडमध्येच केला. र. धो चां जन्म देखील येथेच झाला. (र. धो म्हणजे अण्णांचे ज्येष्ठ चिरंजीव – रघुनाथ धोंडो कर्वे). राधाबाईंच्या मृत्यूपश्चात अण्णांनी विधवेशी केलेला पुनर्विवाह संपूर्ण महाराष्ट्रासकट मुरुडलाही अमान्य ठरला. हेचं काय ते दुर्दैव. पुढे अण्णांची कर्मभूमी पुणे राहिली आणि संपूर्ण आयुष्याची वाटचाल केवळ स्त्री शिक्षण आणि स्त्री उद्धारासाठी राहिली.

Read more at: https://talukadapoli.com/personalities/maharshi-karve/maharshi-karve-dapoli/

दापोली आज एक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होत आहे. परंतु खरे पाहिले तर सगळ्यात आधी ते एक ऐतिहासिक स्थान म्हणून विकस...

“तुण्…तुण्….तुण्….तुण्…. तुणतुण्यामधून निघणारे हे नाद आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन न गेले तरच नवल! तुणतुणे हे खरे ...
05/11/2023

“तुण्…तुण्….तुण्….तुण्…. तुणतुण्यामधून निघणारे हे नाद आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन न गेले तरच नवल! तुणतुणे हे खरे तर खूप साधे व वाजवायलाही तितकेच सोपे असे पारंपारिक तंतुवाद्य. पूर्वी कोकणात सुगीच्या दिवसांत प्रत्येक गावात असे तुणतुणेवाले फिरताना दिसत. हातातले तुणतुणे वाजवित कधी ज्योतिष सांगताना तर कधी देवादिकांच्या नावाने आरती गाताना, ज्या घरासमोर थांबतील त्या घरातल्या पुर्वजांच्या नावांची आठवण करीत गीत गाताना हमखास दिसत. डोक्याला पागोटे, कपाळाला टीळा, गळ्यात उपरणे, धोतर व सदरा या वेषातील तुणतुणेवाला त्याच्या पेहरावाबरोबरच हातातल्या तुणतुण्यामधून निघणाऱ्या कर्णमधुर सुरांमुळे लांबूनही ओळखता येई.

Read more at: https://talukadapoli.com/folk-art/tuntune-indian-classical-music-instrument/

https://youtu.be/e9t9ZrfHR7U?si=FFH5g4ck9yv9lOsT

अनेक पारंपरिक व सांस्कृतिक वाद्यांच्या सांग्रसंगीतात एके काळी महत्वाचे स्थान असलेले तंतुवाद्य आता तसे अडगळीत ग...

लेणे पन्हाळेकाजी
11/10/2023

लेणे पन्हाळेकाजी

Detailed research about Panhalekazi caves by www.talukadapoli.com in Marathi

गणा धाव रे, मना पाव रेI तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे | तू दरसन आम्हाला डाव रे…| श्रावण बाळ जातो काशीला, जातो काशीला…|...
23/09/2023

गणा धाव रे, मना पाव रेI तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे | तू दरसन आम्हाला डाव रे…| श्रावण बाळ जातो काशीला, जातो काशीला…| आईबापाची कावड खांद्याला, कावड खांद्याला…|

Read more at: https://talukadapoli.com/folk-art/jakhadi-nrutya/

Jakhadi Nrutya is a prominent folk dance, performed during Holi (Shimga) in konkan. festivalinkokan jakhadi #...

Address

Dapoli
Ratnagiri
415712

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taluka Dapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Taluka Dapoli:

Share