BJP 4 Jalgaon East - Raver

BJP 4 Jalgaon East - Raver Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Jalgaon East - Raver Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

05/06/2026

एकत्र येऊ, पर्यावरण वाचवू!
प्लॅनेटसाठी सकारात्मक बदल घडवा, नकारात्मक सवयी सोडा. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ जबाबदारी नाही, तर भावी पिढ्यांसाठी दिलेली हमी आहे.
LiFE म्हणजेच Lifestyle for Environment .
बदल स्वतःपासून सुरू करा, पृथ्वी वाचवा! ‘LiFE’चा संकल्प करा.
पंतप्रधान Narendra Modi यांचे आवाहन !

सत्ता नव्हे, संस्कार; संघटन हीच शक्ती, विचारांचा हा वारसा राष्ट्राला देणाऱ्या वंदनीय गोळवलकर गुरुजींना विनम्र अभिवादन!  ...
05/06/2026

सत्ता नव्हे, संस्कार; संघटन हीच शक्ती, विचारांचा हा वारसा राष्ट्राला देणाऱ्या वंदनीय गोळवलकर गुरुजींना विनम्र अभिवादन!

04/06/2026
03/06/2026

LIVE - महायुतीची पत्रकार परिषद - ३ जून २०२६ - गरवारे क्लब, चर्चगेट,मुंबई !

03/06/2026

सामान्य माणसाचा नेता, कार्यकर्त्यांचा आधार आणि गुन्हेगारीविरोधातील बुलंद आवाज !
#गोपीनाथ_मुंडे

02/06/2026

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर महिलांच्या सन्मान, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाची नवी दिशा आहे.

या योजनेतून महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची ताकद मिळाली असून, १ कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा संकल्प महिला सक्षमीकरणाला नवी उंची देणारा आहे.

महिलांचा सन्मान, स्वावलंबनाचा मार्ग आणि समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प!

01/06/2026

मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी उष्णतेबाबत चिंता व्यक्त केली. भरपूर पाणी प्या, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या असे सांगत नागरिकांना विविध प्रांतातील उन्हाळी पेय यांचे महत्त्व सांगितले व उष्माघातापासून सावध राहण्याचे आवाहन केले..

[ Mann Ki Baat, Narendra Modi, PM Modi, BJP4Maharashtra ]

01/06/2026

मराठी संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत!

​'निंबोणीच्या झाडामागे...', 'जिथे सागरा धरणी मिळते', 'केतकीच्या बनी तेथे नाचला गं मोर' आणि 'घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात' यांसारखी एकापेक्षा एक अजरामर गाणी ज्यांच्या सुमधुर आवाजाने सजली, त्या अजरामर पार्श्वगायिका, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने मराठी संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.

​मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले अमूल्य योगदान कधीही विसरता येणार नाही. मराठी व हिंदीसोबतच बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तीगीते गाण्यात त्यांना विशेष गोडी होती.

ज्येष्ठ नागरिकांपासून ते आजच्या तरुणांपर्यंत प्रत्येकाच्या ओठांवर आजही त्यांची गाणी तितक्याच प्रेमाने रेंगाळतात.

​त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एक अथांग आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही.

​भावपूर्ण श्रद्धांजली!

Address

Raver
425508

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP 4 Jalgaon East - Raver posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share