आपले हक्काचे नगरसेवक रविंद्र चाळके व प्रियांका धनावडे

  • Home
  • India
  • Roha
  • आपले हक्काचे नगरसेवक रविंद्र चाळके व प्रियांका धनावडे

आपले हक्काचे नगरसेवक रविंद्र चाळके व प्रियांका धनावडे प्रभाग क्र.7 आणि शहरामधील नागरिकांच्या समस्या, विकासकामे व जनसेवा यासाठी सातत्याने कार्यरत.

रोहा अष्टमी नगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी विविध भागांमध्ये नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू असून, प्रभाग क्रमांक ०७ येथ...
10/05/2026

रोहा अष्टमी नगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी विविध भागांमध्ये नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू असून, प्रभाग क्रमांक ०७ येथील कल्पक सोसायटीजवळील नालेसफाईच्या कामाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. संबंधित नाल्यातील मोठ्या प्रमाणावरील गाळ काढून पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.

सदर काम हे नगराध्यक्षा मा. वनश्री ताई शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने सुरू करण्यात आले असून, आमच्या सोबत त्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत कामाची पाहणी करून संबंधित कंत्राटदारांना आवश्यक सूचना दिल्या.
@श्री.रविंद्र सुधीर चाळके
सौ.प्रियांका स्वप्नील धनावडे

धनगर आळी येथे मच्छर प्रतिबंधक धूर फवारणी करण्यात आली.
18/04/2026

धनगर आळी येथे मच्छर प्रतिबंधक धूर फवारणी करण्यात आली.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जयंतीनिमित्त नगरपालिकेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्...
14/04/2026

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जयंतीनिमित्त नगरपालिकेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जयंतीनिमित्त आज त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मा. नगराध्यक्षा कु.वनश्रीसमीर शेड...
14/04/2026

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जयंतीनिमित्त आज त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मा. नगराध्यक्षा कु.वनश्रीसमीर शेडगे यांच्यासोबत दर्शन घेण्याचा सन्मान लाभला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान विचारवंत आणि समाजसुधारक असलेल्या बाबासाहेबांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांनी आजही आपल्या जीवनाला दिशा मिळते.या पावन दिनानिमित्त त्यांच्या कार्याला व विचारांना विनम्र अभिवादन!

13/04/2026

मा. सुनीलजी तटकरे साहेब यांनी आज प्रस्तावित क्रिकेट मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. 🏏मा. सुनीलजी तटकरे साहेब यांनी आज प्रस्तावित क्रिकेट मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. 🏏

यावेळी मैदानाच्या विकासाबाबत आवश्यक सूचना देत, लवकरात लवकर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

स्थानिक युवकांना उत्तम क्रीडा सुविधा मिळाव्यात, तसेच भविष्यात येथून गुणवंत खेळाडू घडावेत, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे साहेबांनी यावेळी सांगितले.



Ravindra Chalke Priyanka Narvankar

07/04/2026

मा खासदार सुनील तटकरे साहेब मा मंत्री अदिती तटकरे ताई आणि मा आमदार अनिकेत तटकरे भाई यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा शहरातील शाळांमध्ये डिजिटल उपक्रमांना गती मिळत आहे

आज नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक ०४ रोहा मोहल्ला येथे नगराध्यक्षा कु वनश्री ताई शेडगे यांच्या हस्ते वायफाय कनेक्शनचे उद्घाटन करण्यात आले

शिक्षण व क्रीडा समिती सभापती रवींद्र दादा चाळके यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्वखर्चातून संपूर्ण वायफाय व राऊटर प्रणाली उपलब्ध करून दिली

07/04/2026

कलावती आई मंदिर समोरील गटारामध्ये एक फुटा पर्यंत मातीचे साठे झाले होते आज नगर परिषदच्या माध्यमातून साफ करून घेतले.

आपल्या **प्रभाग क्रमांक 7 मध्ये राहणारे रोह्याचे सुपुत्र कु. संकेत कुंभार** यांनी देशातील सर्वात कठीण व प्रतिष्ठेची मानल...
12/03/2026

आपल्या **प्रभाग क्रमांक 7 मध्ये राहणारे रोह्याचे सुपुत्र कु. संकेत कुंभार** यांनी देशातील सर्वात कठीण व प्रतिष्ठेची मानली जाणारी **UPSC परीक्षा AIR 539 क्रमांकाने उत्तीर्ण करत IRS (Indian Revenue Service)** साठी पात्रता मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल **रोहा-अष्टमी नगरपरिषदेतर्फे नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे यांच्या शुभहस्ते** त्यांचा **डॉ. सी. डी. देशमुख यांची प्रतिमा व स्मृतिचिन्ह देऊन गौरवपूर्ण सत्कार** करण्यात आला.

रोह्याच्या भूमीतून **डॉ. सी. डी. देशमुख (ICS)**, **योगेश देसाई (IPS)** यांच्यानंतर आता **संकेत कुंभार** यांनीही या परंपरेत मानाची भर घालत रोह्याचा अभिमान वाढवला आहे.

यावेळी नगराध्यक्षा यांनी त्यांना रोह्यातील विद्यार्थ्यांना **UPSC व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती** केली तसेच त्यांच्या सन्मानार्थ **लवकरच नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात येईल**, अशी घोषणाही केली.

संकेत कुंभार यांना पुढील वाटचालीसाठी आपल्या प्रभागातील नागरिकांकडून मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳✨
*श्री.रविंद्र चाळके*
सभापती, शिक्षण व युवक कल्याण,रोहाअष्टमी नगर परिषद
*डॉ. सौ. प्रियांका धनावडे*
नगरसेविका, रोहाअष्टमी नगर परिषद

ग्रामस्थ मंडळ धनगर आळीतील सर्व नवतरुण मित्रमंडळी यांनी आपल्या आळीतील स्वातंत्र्यसैनिक हरिश्चंद्र धोंडू गोलीपकर चौक या ठि...
28/02/2026

ग्रामस्थ मंडळ धनगर आळीतील सर्व नवतरुण मित्रमंडळी यांनी आपल्या आळीतील स्वातंत्र्यसैनिक हरिश्चंद्र धोंडू गोलीपकर चौक या ठिकाणी आपल्या होळीचा उत्सव आपण साजरा करतो त्या ठिकाणी चौकामध्ये हायमास्ट असावा अशी मागणी आमच्याकडे केली होती त्यांच्या विनंतीचा मान ठेवत स्वातंत्र्यसैनिक हरिश्चंद्र धोंडू गोलीपकर चौकामध्ये आज हायमास्ट लावण्यात आलेला आहे.यावेळी याप्रसंगी पाणी व दिवाबत्ती विभाग सभापती श्री.मयूर जी दिवेकर ग्रामस्थ मंडळ धनगर आळीचे सन्माननीय अध्यक्ष रमेशजी साळवी,केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष स्वप्नील धनावडे,प्रेषित बारटक्के,तसेच रमेश काका गोलीपकर मधु काका गोलीपकर, प्रवीण कडव उपस्थित होते.

कु.वनश्री अवनी समीर शेडगे
नगराध्यक्षा
श्री रवींद्र चाळके
सभापती
शिक्षण, कला व क्रीडा विभाग
रोहा अष्टमी नगरपरिषद.
डॉक्टर सौ.प्रियांका धनावडे
नगरसेविका, तथा सदस्य शिक्षण व महिला व बालविकास विभाग

श्री विश्वकर्मा मय पांचाळ कलाकार समाज, रोहा यांच्या तर्फे आयोजित श्री विश्वकर्मा जयंती महोत्सवाला उपस्थित राहण्याचा सन्म...
31/01/2026

श्री विश्वकर्मा मय पांचाळ कलाकार समाज, रोहा यांच्या तर्फे आयोजित श्री विश्वकर्मा जयंती महोत्सवाला उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला. यावेळी रोहा नगरीच्या नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे गटनेते महेंद्रजी गुजर गटनेते महेंद्रजी गुजर, सौ.गौरी बारटक्के,प्रेषित बारटक्के,सौ.प्रतीक्षा चाळके समाजाचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित
समाज घडविणाऱ्या कष्टकरी विश्वकर्मा बांधवांच्या श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीला सलाम करत हा क्षण मनाला स्पर्शून गेला.
यावेळी आयोजकांनी दिलेला पुष्पगुच्छ व आत्मीय सत्कार हा केवळ सन्मान नसून, समाजाच्या विश्वासाची पावती आहे.
विश्वकर्मा समाजाच्या प्रगतीसाठी, हक्कांसाठी आणि एकजुटीसाठी सदैव सोबत राहण्याचा निर्धार यानिमित्ताने पुन्हा एकदा दृढ झाला.
या प्रेरणादायी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

Address

Roha
402109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपले हक्काचे नगरसेवक रविंद्र चाळके व प्रियांका धनावडे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category