Amol Khatal-Patil

Directions Website Contact the organization

Amol Khatal-Patil आमदार, २१७ संगमनेर विधानसभा
Member of the Legislative Assembly (MLA) Sangamner

Jansevak - जनसेवक

अध्यक्ष - संजय गांधी निराधार योजना समिती संगमनेर

निवडणूक प्रमुख - संगमनेर विधानसभा भाजपा
अध्यक्ष - संजय गांधी निराधार योजना संगमनेर

संगमनेर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते श्री. अविनाशजी थोरात यांना वाढदिवसानिमित्त निवासस्थानी जाऊन मनःपूर्वक...
08/10/2026

संगमनेर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते श्री. अविनाशजी थोरात यांना वाढदिवसानिमित्त निवासस्थानी जाऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह उपस्थित सहकाऱ्यांशी विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली. थोरात कुटुंबीयांची आपुलकीने विचारपूस केली. अविनाशजींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले.

मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीच्या भेटीत एक वेगळा जिव्हाळा, आपलेपणा आणि विश्वास जाणवतो. नागरिकांच्या आनंदाच्या क्षणी त्या...
08/10/2026

मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीच्या भेटीत एक वेगळा जिव्हाळा, आपलेपणा आणि विश्वास जाणवतो. नागरिकांच्या आनंदाच्या क्षणी त्यांच्या आनंदात सहभागी होता येणं आणि अडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभं राहता येणं, हेच माझ्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेलं खरं समाधान आहे.

📍शिवसेना महायुती जनसंपर्क कार्यालय, संगमनेर

पळसखेडे येथील कांडेकर परिवारातील कै.पांडुरंग तात्याबा कांडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित वर्षश्राद्ध कार्यक...
08/10/2026

पळसखेडे येथील कांडेकर परिवारातील कै.पांडुरंग तात्याबा कांडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित वर्षश्राद्ध कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

आमचे सहकारी श्री. प्रसाद कदम यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृ...
08/10/2026

आमचे सहकारी श्री. प्रसाद कदम यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो या सदिच्छा व्यक्त केल्या.

शिवकांता लॉन्स, लोणी येथे कै. बाळासाहेब किसनराव वाडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित वर्षश्राद्ध कार्यक्रमाला ...
08/10/2026

शिवकांता लॉन्स, लोणी येथे कै. बाळासाहेब किसनराव वाडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित वर्षश्राद्ध कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली व वाडेकर कुटुंबीयांची भेट घेऊन आपुलकीने विचारपूस केली.

📍संगमनेर, बस स्थानक | संगमनेर आगारात दाखल झालेल्या नव्या - कोऱ्या शिवाई E⚡बसेसचे लोकार्पण आणि पूजनसंगमनेर आगारातील सार्व...
08/10/2026

📍संगमनेर, बस स्थानक | संगमनेर आगारात दाखल झालेल्या नव्या - कोऱ्या शिवाई E⚡बसेसचे लोकार्पण आणि पूजन

संगमनेर आगारातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी परिवहन मंत्री मा.ना.श्री. प्रतापराव सरनाईक साहेब यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून संगमनेर आगारासाठी मंजूर झालेल्या २५ अत्याधुनिक 'इलेक्ट्रिक शिवाई' बसेसपैकी पहिल्या टप्प्यात १० बसेस आगारात दाखल झाल्या आहेत. त्यातील ६ ई-शिवाई बसेसचा लोकार्पण व पूजन सोहळा आज संगमनेर बस स्थानक येथे संपन्न झाला. महामंडळात सेवा दिलेले ९२ वर्षीय ज्येष्ठ निवृत्त कर्मचारी श्री. उत्तमराव कर्पे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या ई-बसेस प्रवाशांच्या सेवेत समर्पित करण्यात आल्या.

विशेष बाब म्हणजे, या अत्याधुनिक शिवाई बसेस दररोज संगमनेर - पुणे मार्गावर धावणार असून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांसह अधिक आरामदायी, सुरक्षित, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

संगमनेर-पुणे-संगमनेर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता या मार्गावर विनाथांबा, विनावाहक गाड्या सुरू करण्यात याव्यात ही माझी पूर्वीपासून आग्रही मागणी होती; ती देखील पूर्ण झाल्याचा आनंद आहे. उर्वरित बसेसही लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या नव्या बसेसमुळे आगारावरील ताण हलका होणार असून संगमनेरच्या ग्रामीण भागात एस.टी. च्या फेऱ्या सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमा दरम्यान ज्येष्ठ अभिनेते, 'नाम फाउंडेशन' चे संस्थापक आदरणीय नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या सामाजिक व अभिनय क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला संगमनेर आगाराचे व्यवस्थापक श्री. निलेशजी बेंडकुळे, तसेच आमचे सहकारी वसंतराव देशमुख, आबासाहेब थोरात, विठ्ठल घोरपडे, गुलाब भोसले, रमेश काळे, साक्षीताई सूर्यवंशी, नीलम खताळ, आशिष शेळके, रणजीत ढेरंगे, कैलास कासार, ज्ञानेश्वर कर्पे, डॉ. सोमनाथ कानवडे, ॲड. थोरात, दादा पाटील गुंजाळ, रऊफ शेख, अनिल थोरात, दिपाली वाव्हळ, शिवदास गायकवाड, सचिन वाकचौरे, सुमेध संत, मथ्थु शेरमाळे, शंकर वाळे, बादशाह गुंजाळ, भगवान गीते, नामदेवराव गुंजाळ, वैभव कर्पे, विनायक वाडेकर, नवनाथ जोंधळे, रवी दातीर, संगीता पुंड, सपना जाधव, संतोष कुटे, रणजीत जाधव, किसन शिंदे, संकेत खुळे, मुन्ना पुंड, प्रवीण दिड्डी, राहुल भोईर, शशांक नामन, अमोल आंधळे, भारत गवळी, प्रवीण कर्पे, वाल्मीक शिंदे, विनोद घोलप, शशिकांत दायमा, सुशील शेवाळे, सुरेश लांडगे, रोहित चौधरी, सौरभ देशमुख यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते, आगारातील कर्मचारी उपस्थित होते.

भावपूर्ण श्रद्धांजली!आपल्या दमदार अभिनयाने आणि संवादाने असंख्य प्रेक्षकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ ...
08/10/2026

भावपूर्ण श्रद्धांजली!

आपल्या दमदार अभिनयाने आणि संवादाने असंख्य प्रेक्षकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वासह संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असून भारतीय चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू कलावंत गमावला आहे.

पडद्यावर आपल्या अभिनयाची अमीट छाप उमटवतानाच ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण भागातील गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे महान कार्य नानांनी केले. कलावंत म्हणून मिळवलेली लोकप्रियता समाजसेवेसाठी समर्पित करणारे नाना पाटेकर यांचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणादायी राहतील.

नानांच्या निधनाने महाराष्ट्राच्या कला आणि सामाजिक क्षेत्राची भरून न निघणारी मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीय, आप्तस्वकीय व असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

Nana Patekar

आकाशाला गवसणी घालून देशरक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सर्व वायुवीरांना भारतीय वायुसेना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
08/10/2026

आकाशाला गवसणी घालून देशरक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सर्व वायुवीरांना भारतीय वायुसेना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

📍मंत्रालय, मुंबई | ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई बोर्डीकर व शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब यांची कामानिमित्त...
07/10/2026

📍मंत्रालय, मुंबई | ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई बोर्डीकर व शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब यांची कामानिमित्त भेट

ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई बोर्डीकर यांची मंत्रालयात भेट घेऊन संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी मेंढवण येथे मंजूर असलेल्या सबस्टेशनचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे तसेच वीजपुरवठा सुरळीत रहावा, वीजेअभावी शेतकऱ्यांना कोणता त्रास होऊ नये यासाठी मतदारसंघात विविध भागात, वाड्या वस्त्यांवर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावेत, सतत नादुरुस्त होत असलेले ट्रान्सफॉर्मर बदलून त्याजागी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावेत अशी विनंती केली.

यासोबतच शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब यांची भेट घेतली. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये असे शासनाकडून निर्देश असताना अनेक शाळा - महाविद्यालये गोरगरीब विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारत आहेत. अशा शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई शासनाने करावी अशी मागणी केली. तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी केली.

Address

Sangamner
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Khatal-Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amol Khatal-Patil:

Shortcuts

Share