मराठ्यांची धारातीर्थे

  • Home
  • India
  • Sangli
  • मराठ्यांची धारातीर्थे

मराठ्यांची धारातीर्थे इथे शिवस्वराज्याचा देदीप्यमान इतिहास असतो पुराव्यानिशी.

"दादाजी कोंडदेवांच्या मृत्यूने आम्ही निराश्रित झालो!" महाराज खरेच असे म्हणाले होते का?https://youtu.be/JywDo4ukYbg महारा...
23/08/2026

"दादाजी कोंडदेवांच्या मृत्यूने आम्ही निराश्रित झालो!" महाराज खरेच असे म्हणाले होते का?
https://youtu.be/JywDo4ukYbg
महाराजांच्या पत्राचा पुरावा खरा की खोटा? एक धक्कादायक वास्तव!
शिवछत्रपतींचे ते लिखित उद्गार हेच त्रिवार सत्य? दादाजी कोंडदेव खरेच इतके मोठे होते का?
"दादाजी कोंडदेव वडिलांसमान होते, ते मरण पावल्यामुळे आम्ही आता निराश्रित झालो!" हे आहे शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक कागदपत्रांत नमूद झालेले वाक्य! प्रसंग आहे महाराजांनी पुरंदर किल्ला कब्जात घेण्याचा आणि ते वाक्य आहे एका बखरीमधे आणि पुरंदरच्याच किल्लेदाराच्या एका हकीकतीमध्ये!
महाराजांच्या त्या वाक्याचा अर्थ असा होतो की, 'दादाजींच्या मृत्यूपर्यंत महाराज दादाजींच्याच आधाराने, आश्रयाने होते! म्हणजेच 'दादाजींमुळेच महाराज स्वराज्यस्थापनेचा श्रीगणेशा करू शकले होते!'
महाराजांच्या त्या वाक्याला दोन वेगवेगळे पुरावे असल्याने 'ते वाक्य खरेच असणार!' असा अर्थ काढला गेला तर त्यात आश्चर्य नाही, पण ते वाक्य 'खरे की खोटे?' हे सांगणाऱ्या इतर पुराव्यांकडे दुर्लक्ष करणे हे मात्र नक्कीच आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे! विशेष म्हणजे यात खुद्द शिवराय आणि शहाजीराजे यांची पत्रे आहेत, तसेच सरनाईकांच्या आणखी दोन हकीकतीसुद्धा आहेत!
अशा अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक कागदपत्रांमधून 'महाराजांचे ते वाक्य खरे की खोटे?, अस्सल की बनावट?' याचा पूर्णपणे निकाल लागतो! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
https://youtu.be/JywDo4ukYbg

शिवछत्रपतींचे ते लिखित उद्गार हेच त्रिवार सत्य? दादाजी कोंडदेव खरेच...

20/08/2026

महाराजांच्या ३२ मणाच्या सिंहासनाने शहाजहानच्या मयूरासनाचे खर्चाचे रेकॉर्ड तोडले? शिवसिंहासनाच्या संपूर्ण खर्चाची रक्कम किती?
या दोन्ही आसनांत सोने किती? हिरे, मोती, रत्ने किती? दोन्हींचा खर्च किती? अशी तुलना आजवर कुणीही केलेली नाही!
शिवछत्रपतींचे सुवर्ण सिंहासन आणि मोगल बादशहा शहाजहानचे मयूर सिंहासन! एकाच काळात बनवली गेलेली ही दोन आसने! औरंगजेबाच्या बापाचे ते मयूरासन जगातील सर्वात महागडे म्हणून प्रसिद्ध, तर महाराजांचे सिंहासन तब्बल ३२ मण सोन्याचे! मग या दोन्हीतील जास्त किमतीचे कोणते? ते कसे आणि का? महाराजांच्या सिंहासनाला एकूण खर्च किती आला होता?
'शिवरायांचे सिंहासन फक्त १४४ किलो सोन्याचे होते असे सांगितले जाते', हे चूक की बरोबर? एक मण म्हणजे किती किलो? शिवकाळात तोळा, शेर आणि मण यांच्या वजनांची प्रमाणे कोणती होती? त्यातील कोणते प्रमाण का बरोबर आहे?
जगातील सर्वात महागड्या मोगली मयूरासनाच्या खर्चाचे रेकॉर्ड शिवछत्रपतींच्या सुवर्ण सिंहासनाने तोडले होते का? आजवर कोणीही हात न घातलेल्या या प्रश्नाचे आश्चर्याचा मोठा धक्का देणारे, अगदीच अनपेक्षित असे थेट उत्तर! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!

महाराजांच्या ३२ मणाच्या सिंहासनाने शहाजहानच्या मयूरासनाचे रेकॉर्ड तोडले?https://youtu.be/phAbavRAgYsशिवसिंहासनासाठी संपू...
16/08/2026

महाराजांच्या ३२ मणाच्या सिंहासनाने शहाजहानच्या मयूरासनाचे रेकॉर्ड तोडले?
https://youtu.be/phAbavRAgYs
शिवसिंहासनासाठी संपूर्ण खर्च किती आला?
शिवछत्रपतींचे सुवर्ण सिंहासन आणि मोगल बादशहा शहाजहानचे मयूर सिंहासन ही दोन आसने एकाच काळात बनवली गेली होती! औरंगजेबाच्या बापाचे ते मयूरासन जगातील सर्वात महागडे म्हणून प्रसिद्ध, तर महाराजांचे सिंहासन तब्बल ३२ मण सोन्याचे! मग या दोन्हीतील जास्त किमतीचे कोणते? ते कसे आणि का? महाराजांच्या सिंहासनाला एकूण खर्च किती आला होता?
'शिवरायांचे सिंहासन फक्त १४४ किलो सोन्याचे होते!' असे सांगितले जाते, हे चूक की बरोबर? एक मण म्हणजे किती किलो? शिवकाळात तोळा, शेर आणि मण यांच्या वजनांची प्रमाणे कोणती होती? त्यातील कोणते प्रमाण का बरोबर आहे?
महाराजांचे सिंहासन आणि मयूरासन या दोन्हीत सोने किती? हिरे, मोती, रत्ने किती? दोन्ही आसनांचा खर्च किती? अशी तुलना आजवर कुणीही केलेली नाही!
जगातील सर्वात महागड्या मयूरासनाच्या खर्चाचे रेकॉर्ड शिवछत्रपतींच्या सुवर्ण सिंहासनाने तोडले होते का? आजवर कोणीही हात न घातलेल्या या प्रश्नाचे, आश्चर्याचा मोठा धक्का देणारे, अगदीच अनपेक्षित असे थेट उत्तर! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
https://youtu.be/phAbavRAgYs

शिवछत्रपतींचे सुवर्ण सिंहासन आणि मोगल बादशहा शहाजहानचे मयूर सिंहासन...

महाराजांच्या आग्र्यातील कैदेचे खरे ठिकाण सोडून चुकीच्या जागी महाराष्ट्र शासनाचा करोडोंचा खर्च?https://youtu.be/hoR-Tt2ja...
13/08/2026

महाराजांच्या आग्र्यातील कैदेचे खरे ठिकाण सोडून चुकीच्या जागी महाराष्ट्र शासनाचा करोडोंचा खर्च?
https://youtu.be/hoR-Tt2ja_Q
प्रचंड महत्त्वाच्या जागेचा खेळखंडोबा! उत्तर प्रदेशाच्या झोलझालात महाराष्ट्र अडकला!
नाचक्कीची मानहानी आणि कौतुकाचे धनी!
संपूर्ण हिंदुस्थान मोगली सत्तेच्या अमलाखाली आणण्याच्या औरंगजेबाच्या स्वप्नांचा चक्काचूर त्याच दिवशी झाला, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामधून औरंगजेबाच्या कैदेतून अतर्क्य करामत करून निसटून गेले!
‌ शिवछत्रपतींच्या त्या कैदेच्या जागी उत्तर प्रदेश शासन आणि महाराष्ट्र शासन मिळून भव्य दिव्य स्मारक उभारत आहेत. नऊ कोटी रुपयांना ती जागा खरेदी करून त्यावर म्युझियम, साउंड अँड लाइट शो, महाराजांचा शंभर फुटी पुतळा अशा अनेक बाबी होणार आहेत.
पण ज्या जागी हे स्मारक होणार आहे तीच जागा औरंगजेबाने शिवरायांना कैदेत ठेवलेली आणि शिवराय निसटून गेलेली जागा आहे का? या सर्वात महत्त्वाच्या आणि मूलभूत अशा प्रश्नाकडे मात्र साफ दुर्लक्ष केले गेले आहे! दिल्ली आग्र्यातील काही इतिहासकारांनी आग्र्यामधील 'एक विशिष्ट जागा' हेच शिवरायांचे कैदेचे ठिकाण आहे असे सांगितले आणि उत्तर प्रदेश शासन स्मारकासाठी सरसावले. यानंतर महाराष्ट्र शासनाने त्या स्मारकाच्या कामात मोठा वाटा उचलण्यासाठी भाग घेतला.
पण त्या विशिष्ट जागेत महाराज कैदेत नव्हतेच! महाराजांच्या कैदेची आणि निसटण्याची खरी जागा ही वेगळीच आहे आणि ती या विशिष्ट जागेपासून आठ किलोमीटर दूर आहे! महाराजांच्या कैदेची ती खरी जागा अगदी अस्सल, समकालीन आणि महत्त्वाच्या पुराव्यांमधून पूर्णपणे सिद्ध होते!
असे असताना महाराजांशी काडीमात्रसुद्धा संबंध नसलेल्या ठिकाणी स्मारक उभे करताना हे भान पाहिजे की महाराजांच्या बाबतीत अशी चूक केली तर त्याचे परिणाम काय होतील? स्मारकाचे श्रेय तर बाजूलाच राहील आणि पूर्ण अभ्यास न करता, उत्तर प्रदेश शासनाच्या मागेमागे आंधळेपणाने गेल्याने महाराष्ट्र शासनाची संपूर्ण भारतात नाचक्की होईल! पण त्याऐवजी खऱ्या जागी स्मारक केले तर महाराष्ट्र शासनावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होईल!
आग्र्यातील महाराजांच्या कैदेच्या खऱ्या ठिकाणाचा सविस्तर उलगडा! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
https://youtu.be/hoR-Tt2ja_Q

संपूर्ण हिंदुस्थान मोगली सत्तेच्या अमलाखाली आणण्याच्या औरंगजेबाच्या...

06/08/2026

ब्राह्मणांनी स्वराज्याचा खजिना लुटून रिकामा केला? बोगस STORY की खरी HISTORY?
राजाभिषेकातील जातीयवादी जंत! महाराजांचे पुण्य आणि ब्राह्मणांचे पाप!
शिवराजाभिषेकात ब्राह्मणांच्या दुष्कर्मांचा विषय काही आपोआपच प्रकट झालेला नाही! अनाजीपंत- मोरोपंत ही नावे उगीचच त्या घटनेत शिरलेली नाहीत! त्यामागे अनेक ऐतिहासिक घटना कारणीभूत आहेत!, त्या कोणत्या ? 'ब्राम्हणी वृत्ती' हा काय प्रकार आहे?
'शिवराजाभिषेकात ब्राह्मणांनी महाराजांकडून अगणित रक्कम लुटून शिवस्वराज्याचा खजिना रिकामा केला!', "महाराजांनी रयतेसाठी साठवलेल्या रकमेची ब्राह्मणांनी नासाडी केली!' ही वाक्ये खरी की खोटी?
महाराजांची बक्षीस-दानधर्मावर खर्च करण्याची दानत किती? शिवस्वराज्याच्या खजिन्याची ताकद किती? महाराजांची ऐपत किती? राजाभिषेकावरील कलंकाचे खरे गुन्हेगार कोण?
'ब्राह्मणांनी केलेली लूट!' ही फक्त एक STORY की खरी HISTORY? शिवराजाभिषेकातील जातीयवादाच्या स्फोटक विषयाला FULL STOP! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!

स्वराज्याचा खजिना ब्राह्मणांनी लुटला? महाराजांचे पुण्य आणि ब्राह्मणांचे पाप? राजाभिषेकातील जातीयवादी जंत!https://youtu.b...
02/08/2026

स्वराज्याचा खजिना ब्राह्मणांनी लुटला? महाराजांचे पुण्य आणि ब्राह्मणांचे पाप? राजाभिषेकातील जातीयवादी जंत!
https://youtu.be/dGHOGZ38iGk*
*ही फक्त STORY की खरी HISTORY? खरे गुन्हेगार कोण?
शिवराजाभिषेकात ब्राह्मणांच्या दुष्कर्मांचा विषय काही आपोआपच प्रकट झालेला नाही! अनाजीपंत- मोरोपंतांची नावे आपोआप, उगीचच त्या घटनेत शिरलेली नाहीत! त्यामागे कोणत्या ऐतिहासिक घटना कारणीभूत आहेत? 'ब्राम्हणी वृत्ती' हा काय प्रकार आहे?
'शिवराजाभिषेकात ब्राह्मणांनी महाराजांकडून अगणित रक्कम लुटून शिवस्वराज्याचा खजिना रिकामा केला!' महाराजांनी रयतेसाठी साठवलेल्या रकमेची ब्राह्मणांनी नासाडी केली! ही वाक्ये खरी की खोटी?
महाराजांची बक्षीस-दानधर्मावर खर्च करण्याची दानत किती? शिवस्वराज्याच्या खजिन्याची ताकद किती? महाराजांची ऐपत किती? राजाभिषेकावरील कलंकाचे खरे गुन्हेगार कोण?
ब्राह्मणांनी केलेली लूट ही फक्त एक STORY की खरी HISTORY? शिवराजाभिषेकातील जातीयवादाच्या स्फोटक विषयाला FULL STOP! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
https://youtu.be/dGHOGZ38iGk

'शिवराजाभिषेकात ब्राह्मणांनी महाराजांकडून अगणित रक्कम लुटून शिवस्वर...

01/08/2026

एक झलक! STORY Vs. HISTORY! शिवराजाभिषेकातील ज्वालाग्राही विषयावर पुराव्यानिशी FULLSTOP! लवकरच पूर्ण व्हीडिओ 'मराठेशाही प्रवीण भोसले' युट्यूब चॅनलवर! चॅनल लिंक-
https://www.youtube.com/

31/07/2026

राजाभिषेकाला आलेला प्रत्येक ब्राह्मण महाराजांकडून 'इतकी मोठी रक्कम' घेऊन गेला होता!
आजवर तुम्हाला कुणीही न सांगितलेला आकडा! ज्या पुराव्यात आरोप त्याच पुराव्यात उत्तर!
"शिवराजाभिषेकावेळी ब्राह्मणांनी शिवरायांची अडवणूक करून, दान-दक्षिणेच्या नावाखाली अमाप रक्कम घेतली होती का?"या प्रश्नाचे उत्तर 'रायगडावर आलेल्या ब्राह्मणांची एकूण संख्या', 'महाराजांनी त्या ब्राह्मणांना दिलेली एकूण रक्कम' आणि 'प्रत्येक ब्राह्मणाला मिळालेली वैयक्तिक रक्कम' या आकडेवारीत आहे!
ब्राह्मणांवर केले जाणारे आरोप एका समकालीन व्यक्तीच्या लिखाणावर आधारलेले आहेत! आणि त्याच लिखाणातून प्रत्येक ब्राह्मणाच्या खिशात पडलेल्या रकमेचा आकडा समोर येतो! याच बाबतीत आणखी वेगळे सहा समकालीन पुरावे आहेतच! या सर्वांतून काय समोर येते?
शिवराजाभिषेकातील अगदी महत्त्वाच्या आणि कळीच्या दोन प्रश्नांची सविस्तर उत्तरे! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!

29/07/2026

शिवराजाभिषेकात दानाच्या आशेने ५० हजार ब्राह्मणांची तुफान गर्दी! चार महिने मुक्काम आणि रोज पंचपक्वान्ने! पण ब्राह्मणांची खरी संख्या किती???
'शिवराजाभिषेकावेळी ब्राह्मणांनी शिवरायांची अडवणूक करून त्यांच्याकडून अमाप रक्कम उकळली!' या दाव्यामधील कळीचा मुद्दा, 'महाराजांनी ब्राह्मणांना दिलेली एकूण रक्कम आणि रायगडावर आलेल्या ब्राह्मणांची संख्या' हा आहे ! ब्राह्मणांचा हा आकडाच समजला नाही तर तो दावा खरा की खोटा हे कळणेच शक्य नाही!
याबाबत शिवरायांच्याच पदरच्या एका अधिकाऱ्याने 'त्यावेळी रायगडावर तब्बल पन्नास हजार ब्राह्मण चार महिने मुक्काम ठोकून पंचपक्वान्ने खात होते!' असे लिहून ठेवलेले आहे!
हे खरे की खोटे? त्यावेळी रायगडावर आलेल्या ब्राह्मणांची नेमकी संख्या किती? सहा समकालीन व्यक्तींच्या लिखाणातून मिळणारे उत्तर! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!

राजाभिषेकाला आलेला प्रत्येक ब्राह्मण महाराजांकडून 'इतकी मोठी रक्कम' घेऊन गेला होता!https://youtu.be/HZj6acshndwआजवर तुम्...
26/07/2026

राजाभिषेकाला आलेला प्रत्येक ब्राह्मण महाराजांकडून 'इतकी मोठी रक्कम' घेऊन गेला होता!
https://youtu.be/HZj6acshndw
आजवर तुम्हाला कुणीही न सांगितलेला आकडा! ज्या पुराव्यात आरोप त्याच पुराव्यात उत्तर!
"शिवराजाभिषेकावेळी ब्राह्मणांनी शिवरायांची अडवणूक करून, दान-दक्षिणेच्या नावाखाली अमाप रक्कम घेतली!, महाराजांना खिंडीत गाठून ब्राह्मणांनी, स्वराज्याच्या खजिन्यावर डल्ला मारून, स्वतःच्या तुंबड्या भरल्या!" असे म्हटले जाते.
हे वाक्य खरे की खोटे? याचे उत्तर 'रायगडावर आलेल्या ब्राह्मणांची एकूण संख्या', 'महाराजांनी त्या ब्राह्मणांना दिलेली एकूण रक्कम' आणि 'प्रत्येक ब्राह्मणाला मिळालेली वैयक्तिक रक्कम' या आकडेवारीत आहे!
ब्राह्मणांवर केले जाणारे आरोप एका समकालीन व्यक्तीच्या लिखाणावर आधारलेले आहेत! आणि त्याच लिखाणातून प्रत्येक ब्राह्मणाच्या खिशात पडलेल्या रकमेचा आकडा समोर येतो! याच बाबतीत आणखी वेगळे सहा समकालीन पुरावे आहेतच! या सर्वांतून काय समोर येते?
शिवराजाभिषेकातील अगदी महत्त्वाच्या आणि कळीच्या दोन प्रश्नांची सविस्तर उत्तरे! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
https://youtu.be/HZj6acshndw

"शिवराजाभिषेकावेळी ब्राह्मणांनी शिवरायांची अडवणूक करून, दान-दक्षिणे...

Address

Sangli
416415

Telephone

+919422619791

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठ्यांची धारातीर्थे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मराठ्यांची धारातीर्थे:

Shortcuts

Share