28/12/2025
आज शनिवार दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सांगलीतील नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, सांगली (NACONS) आणि Cosmic Eye, सांगली तर्फे आयोजित अवकाश निरीक्षण आणि Digital Detox (डिजिटल उपकरणांपासून घेतलेली विश्रांती) कार्यक्रमाचे आयोजन शहरातील विश्रामबाग परिसरातील विद्यानगर येथील एका इमारतीच्या छतावर केले होते.
सायंकाळी 7 ते 10 असे 3 तास झालेल्या सदर कार्यक्रमात कॉस्मिक आय चे खगोलशास्त्र अभ्यासक श्री.शंकर शेलार सर आणि हौशी खगोलशास्त्र अभ्यासक संजय अष्टेकर यांनी उपस्थित स्थानिक नागरिक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक यांना खगोलशास्त्राची ओळख करून देताना निसर्गातील आणि अवकाशातील भन्नाट आणि विस्मयकारक गोष्टींचा खजिना उजागर केला. यावेळी शेलार सरांच्या दूरदर्शक दुर्बिणीमधून उपस्थितांना पश्चिम क्षितिजाकडे दिसणारा 143 कोटी किमी दूरचा शनि ग्रह आणि त्याचे चंद्र, तसेच पृथ्वीपासून 59 कोटी किमी दूर असणारा आणि सध्या पूर्वेकडे दिसणारा गुरू ग्रह आणि त्याचे चंद्र, युरेनस ग्रह, देवयानी (Andromeda galaxy) आकाशगंगा, orion nebula (ताऱ्यांचे जन्मस्थान), मृग राशी यांचे सखोल निरीक्षण करता आले. यावेळी शेलार सरांनी उपस्थितांमध्ये खगोलशास्त्र (Astronomy) विषयी असलेल्या अंधश्रद्धा बद्दल उद्बोधन केले. सध्याच्या सामाजिक प्रश्नांपैकी एक बहु चर्चेला जाणारा जटिल प्रश्न म्हणजे लहान मुलांचे आणि तरुणांचे डिजिटल माध्यमांकडे असलेले व्यसन! या तीन तासाच्या कार्यक्रमात सर्वांनी आपापले फोन बंद ठेवले आणि तीन तास पूर्णतः खगोलशास्त्र, त्याविषयीच्या चर्चा, गप्पा आणि निरीक्षणे यामध्ये अतिशय उत्तमरीत्या सर्वांनीच कार्यक्रमाचा आनंद घेतला. शंकर शेलार सरांनी यावेळी अधिकाधिक नागरिकांनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी NACONS संस्थेचे अरुष जाधव, आदित्य पाटील, अमित काटकर, सांगली पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता श्री अमर सूर्यवंशी, प्रा. दिपाली वळवडे, प्रा. सविता जाधव, आर्किटेक्ट मिलिंद कोष्टी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
Thanks Shankar Shelar