Dr. Sindhutai Sapkal

Dr. Sindhutai Sapkal Sindhutai Sapkal AKA” Maai” & “MOTHER OF ORPHANS” is an Indian social worker

सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या मंगलमय शुभेच्छा...- माई परिवारwww.officeofsindhutai.org
05/09/2026

सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या मंगलमय शुभेच्छा...
- माई परिवार

www.officeofsindhutai.org

03/09/2026

For online donation : www.officeofsindhutai.org/donation

माईंच्या पवित्र कार्यात आपण योगदान दिल्यास , ते अतिशय मोलाचे ठरेल..!

रक्ताच्या नात्याने नव्हे, तर प्रेम, माया आणि माणुसकीच्या अतूट बंधाने जोडलेली नाती अधिक हृदयस्पर्शी असतात, याचा प्रत्यय र...
28/08/2026

रक्ताच्या नात्याने नव्हे, तर प्रेम, माया आणि माणुसकीच्या अतूट बंधाने जोडलेली नाती अधिक हृदयस्पर्शी असतात, याचा प्रत्यय रक्षाबंधनाच्या निमित्ताने आला. पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे येथील माईंच्या लेकींनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्तृत्ववान महापौर आदरणीय श्री. रवी बाबासाहेब लांडगे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या हातावर राखी बांधली. या भावस्पर्शी भेटीतून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा अनोखा स्नेहबंध अधिक दृढ झाला.

माईंच्या मायेच्या सावलीत वाढलेल्या या लेकींसाठी रक्षाबंधन हा केवळ सण नसून, आपुलकीची नाती जपण्याचा आणि प्रेमाची नाती अधिक घट्ट करण्याचा दिवस आहे. महापौर रवी लांडगे यांना राखी बांधताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि माईंच्या लेकींच्या डोळ्यांतील प्रेमभाव या क्षणाला विलक्षण भावनिक उंची देऊन गेला.

माई अर्थात पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ, निराधार आणि वंचित मुलांना मायेची ऊब देत त्यांना नवी ओळख आणि कुटुंब दिले. त्यामुळे माईंच्या लेकींनी जपलेली ही नाती केवळ औपचारिक नसून माणुसकीच्या संस्कारातून निर्माण झालेल्या कुटुंबाची जिवंत अनुभूती आहेत. राखीच्या या नाजूक धाग्यात प्रेम, विश्वास, संरक्षण, आपुलकी आणि भावंडांच्या नात्याची अखंड भावना गुंफलेली होती. यावेळी महापौर बाबासाहेब लांडगे यांनी माईंच्या लेकींशी अत्यंत आपुलकीने संवाद साधत त्यांचे प्रेमाने स्वागत केले. त्यांच्या या प्रेमळ वागणुकीमुळे मुलींच्या आनंदाला आणखी उधाण आले. राखीच्या धाग्याने जुळलेले हे नाते रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे असते, कारण ते माणुसकीच्या भावनेने जोडलेले असते, अशी भावना यावेळी व्यक्त झाली.

या हृदयस्पर्शी प्रसंगी माईंच्या लेकी कु. गौरी, कु. वैष्णवी, कु. श्रेया, कु. गंगा, कु. श्रुतिका, चिमुकला राम, तसेच सौ. मंजुषा गोपाल गायकवाड, संस्थेचे संचालक गोपाल गायकवाड, संजय गायकवाड आणि संस्थेचे जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने माईंच्या लेकींनी जपलेला हा स्नेहबंध म्हणजे “रक्ताचे नाते नसले तरी प्रेमाचे बंध रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक घट्ट असतात,” या माईंच्या विचारांचीच जणू सुंदर प्रचिती ठरली.

https://www.facebook.com/ravi.landge.77

www.officeofsindhutai.org

# #रक्षाबधंन

पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे येथील माईंच्या लेकींनी के...
28/08/2026

पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे येथील माईंच्या लेकींनी केंद्रीय राज्यमंत्री अण्णा उर्फ मुरलीधर मोहोळ यांना पुणे येथील निवासस्थानी राखी बांधून भाऊ-बहिणीच्या या पवित्र नात्याचा अनोखा आणि हृदयस्पर्शी स्नेहबंध जपला. राखी बांधताना माईंच्या लेकींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि अण्णांच्या डोळ्यांतील आपुलकी… हा क्षण खरोखरच शब्दांच्या पलीकडचा होता.
यावेळी अण्णांनी प्रत्येक मुलीशी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने संवाद साधत तिची विचारपूस केली. “माई सिंधुताई सपकाळ माझ्यासाठी आदर्श आहेत. त्यांचे कार्य अतुलनीय आहे. माईंच्या संस्थेला कोणतीही मदत लागली, तर मला हक्काने सांगा,” असे सांगत त्यांनी माईंच्या लेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.

“आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी माईंच्या लेकींनी मला राखी बांधली, हा क्षण माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे,” या त्यांच्या भावनेने या स्नेहबंधाला आणखी एक सुंदर भावनिक किनार लाभली. माई सिंधुताई सपकाळ यांनी रक्ताच्या नात्यांपलीकडे जाऊन माणुसकीची नाती जोडली… आणि आज त्याच मायेच्या सावलीत वाढलेल्या लेकींनी एका भावाच्या मनगटावर राखी बांधून त्या नात्याला नव्याने अर्थ दिला.
या भावस्पर्शी प्रसंगी कु. गौरी, कु. वैष्णवी, कु. श्रेया, कु. गंगा, कु. श्रुतिका, चिमुकला राम, सौ. मंजुषा गोपाल गायकवाड, संस्थेचे संचालक गोपाल गायकवाड, संजय गायकवाड तसेच संस्थेचे जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी उपस्थित होते

https://www.facebook.com/MurlidharKMohol

www.officeofsindhutai.org

# #रक्षाबधंन

रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याला घट्ट विणणारा रक्षाबंधनाचा पवित्र सण मुंबई येथील लोकभवनात अत्यंत भावनिक ...
28/08/2026

रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याला घट्ट विणणारा रक्षाबंधनाचा पवित्र सण मुंबई येथील लोकभवनात अत्यंत भावनिक आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे येथील माईंच्या लेकींनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा अनोखा स्नेहबंध जपला.
अनाथ मुली, दिव्यांग भगिनी, महिला स्वच्छता कर्मचारी तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला भगिनींनी लोकभवन, मुंबई येथे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. या वेळी राज्यपालांनी सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. “रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाच्या धाग्याने एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या विविध स्तरांवर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला व मुलींसोबत यंदाचे रक्षाबंधन साजरे करण्याचा मला विशेष आनंद झाला,” अशी भावना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केली. ममता बाल सदनच्या मुलींशी संवाद साधताना राज्यपालांनी केवळ औपचारिकता न राखता अत्यंत आपुलकीने प्रत्येक मुलीचे पूर्ण नाव, ती कोणत्या वर्गात किंवा अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे, तिची आवड आणि भविष्यातील ध्येय याबाबत विचारपूस केली. राज्यपालांनी सर्व मुलींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. यावेळी माईंच्या लेकींनी लोकभवनातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी तसेच संपूर्ण कर्मचारीवृंदालाही राख्या बांधून रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला. माईंच्या लेकींनी तयार केलेला विदर्भाचा प्रसिद्ध गोरसपाक संस्थेचे अध्यक्ष दिपक दादांनी त्यांना भेट दिला.
या प्रसंगी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, खाजगी सचिव अर्चना गायकवाड, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, एडीसी नवदीप अग्रवाल, माईंच्या लेकी कु. मीनल सिंधुताई सपकाळ, कु. साक्षी सिंधुताई सपकाळ, कु. आकांक्षा भगत, कु. पावनी सिंधुताई सपकाळ, कु. श्रावणी कामठे, तसेच पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदन (बालगृह) संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, अधीक्षिका स्मिता अरविंद पानसरे, माई बेकर्सच्या सौ. सुजाता गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी, गोपाल देशी गोशाळेचे व्यवस्थापक प्रसन्न गायकवाड, नाना कुंभारकर यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

www.officeofsindhutai.org

Address

Mamata Bal Sadan, Kumbharvalan
Sasvad
412301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Sindhutai Sapkal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dr. Sindhutai Sapkal:

Shortcuts

Share