23/04/2026
२१ मार्च जागतिक वन दिनानिमित्त दुर्गनाद प्रतिष्ठान, वनविभाग सातारा, कर्म प्रतिष्ठान, ग्रामपंचायत परळी च्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त सज्जनगड अभियान राबविण्यात आले. दरम्यान ट्रॅक्टर भरून प्लास्टिक व इतर कचरा जमा करण्यात आला. तसेच काल २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आज २३ एप्रिल रोजी पुन्हा वनविभाग सातारा तसेच दुर्गनाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम घेऊन उरलेल्या सर्व कचऱ्याची विल्लेवाट लावण्यात आली. खरंतर ही जबाबदारी फक्त वनविभाग किंवा कोणत्या एका संस्था-संघटनेची नसून प्रत्येक व्यक्तीची आहे, प्रत्येक नागरिकांची आहे. आपले गडकिल्ले आपल्याला मंदिराप्रमाणे पवित्र आहेत. त्यांचे पावित्र्य आणि स्वच्छता आपणच राखली पाहिजे. येत्या काळात वनविभाग तसेच दुर्गनाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडावर येणाऱ्या भाविकांना तसेच पर्यटकांना स्वच्छता आणि पावित्र्य राखण्याच्या संबंधित आवहानात्मक, सूचनात्मक फलक लावण्याचेही नियोजन घेण्यात येणारं आहे. तरीही आपण सुद्धा शक्य तितकी काळजी आणि जबाबदारी घेतलीच पाहिजे...
आपला सज्जनगड प्लास्टिक मुक्त सज्जनगड... 🙏🏻
आपला सज्जनगड आपलीच जबाबदारी...🚩