शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना

  • Home
  • India
  • Satara
  • शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक क्षेत्रातील महत्वपूर्ण संघटन

वारकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव कटीबद्ध..! शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना व श्रीमंत माऊली प्रतिष्ठान, मुंबई यांचा संयुक्तिक...
06/07/2026

वारकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव कटीबद्ध..!

शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना व श्रीमंत माऊली प्रतिष्ठान, मुंबई यांचा संयुक्तिक उपक्रम..

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांच्या मार...
05/07/2026

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुनील वलवे यांची जिल्हा समन्व्यक - शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना, नाशिक पदी नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्ती तात्काळ लागू करण्यात आली आहे.

Shivsena - शिवसेना
Harshal Patil Nilesh Gadhave Patil Dwarkanath Mokat

05/07/2026
05/07/2026
05/07/2026

विश्वगुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळा , श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर

विश्वगुरु श्रीनिवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर
Shivsena - शिवसेना

05/07/2026

अक्षयमहाराज ! , काळजी करू नका तात्काळ निधी वितरित होईल व आपणास अपेक्षित शासन निर्णयही निघेल. - उप मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब

विशेष म्हणजे काल पत्र दिले आज कार्यवाही झाली सुद्धा.. याला म्हणतात केवळ शब्द देणे नाही तर कृतीतून उत्तर देणे. भाई आपले मनःपूर्वक आभार.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Shivsena - शिवसेना

श्रीक्षेत्र पैठण येथील सोहळ्यास व्हिडिओ कॉल द्वारे उप मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी शुभेच्छा देत सहभाग दर्शवला...
01/01/2026

श्रीक्षेत्र पैठण येथील सोहळ्यास व्हिडिओ कॉल द्वारे उप मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी शुभेच्छा देत सहभाग दर्शवला. त्याचे शब्द संकलन..

बोला पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल… ||

शरण शरण एकनाथा | पायी माथा ठेविला ||

गुरु–भक्ती–ऐश्वर्य परंपरा सोहळा, पैठण येथे आयोजित या पवित्र उत्सवास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. आज या सोहळ्याची सांगता होत आहे. वास्तविक मी स्वतः या उत्सवास उपस्थित राहणार होतो. आदरणीय योगीराज महाराज गोसावी यांनी प्रत्यक्ष भेटून मला या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. मनापासून येण्याची इच्छा होती; मात्र कार्यबाहुल्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य झाले नाही. तथापि माझे व आपले सर्वांचे प्रतिनिधी म्हणून अक्षय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, याचा मला आनंद आहे.

उपस्थित संत, कीर्तनकार, गायक वादक, लाडके वारकरी आणि लाडक्या बहिणी... सर्वांना माझा राम कृष्ण हरि..

मला आठवतंय ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, तुकाराम महाराज कळस झाले पण या इमारतीचा प्रत्यक्ष आधार व खांब आपल्या सर्वांचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज होते.“जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत |”

वारकरी संप्रदायाच्या वाटचालीत संत एकनाथ महाराज हे एक भक्कम आधारस्तंभ आहेत. त्याच परंपरेचे वारसदार म्हणून योगीराज महाराज गोसावी यांचे कार्य अत्यंत अलौकिक आहे. एकनाथ महाराज मिशनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेले उपक्रम अभिनव असून, संत साहित्याचा संस्कार घरोघरी पोहोचवणारे आहेत. संत एकनाथ महाराजांचे अभंग उन्नत, सात्त्विक आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा देतात. परमार्थ आणि प्रपंच यांचा सुंदर समन्वय महाराजांच्या कार्यातून आम्हाला सतत अनुभवायला मिळतो. देवाने ज्यांच्या घरी सेवा करावी, ते आमचे एकनाथ महाराज अशीच वारकऱ्यांची भावना आहे.

माझे नावही एकनाथ आहे. जसे संत एकनाथ महाराजांवर सर्व संतांनी अपार प्रेम केले, तसेच एकनाथ शिंदे म्हणजे माझ्यावर वारकरी संप्रदायाने भरभरून प्रेम केले. हा अनुभव मी स्वतः मनापासून घेतला आहे.

वारकरी संप्रदायासाठी जे जे आवश्यक होते, ते ते आपण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. इतिहासात प्रथमच वारकरी दिंड्यांना प्रत्येकी ₹२०,००० इतका निधी देण्याचा निर्णय घेतला गेला. यामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा विशेष समावेश होता. आजवर अनेक मुख्यमंत्री पंढरपूरला गेले; मात्र आम्ही एक नवा पायंडा पाडला आमचा पांडुरंग हा वारकऱ्यांच्या चरणांमध्ये आहे. आणि या वारकऱ्यांची सेवा केली, की पांडुरंगालाही आनंद होतो. ज्येष्ठाना एसटी मोफत, महिलांना अर्धे तिकीट... कित्येक योजना आणल्या व त्या सफल झाल्या..संपूर्ण पंढरपूर स्वच्छ, चकाचक आणि सुव्यवस्थित करण्याचे कार्य आपण केले. टोलमाफी, आरोग्य सुविधा, चरणसेवा अशा अनेक सेवाभावी उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.

माझ्या लाडक्या बहिणी देखील हजारोंच्या संख्येत उपस्थित आहेत. अपार कष्ट मेहनत करून त्या प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालतात. या सर्व वारकरी लाडक्या बहिणींना देखील वंदन करतो. तुम्हीच आमच्या मुक्ताई, जनाबाई व माता गिरीजाबाई..

महाराजांचे नावावरून माझे नाव देखील आई-बाबांनी एकनाथ ठेवले. फरक फक्त एवढाच आहे एकनाथ महाराज पूर्णतः शांती ब्रह्म होते. आणि मी देखील महाराजांच्या विचारांवर पाऊल ठेवून त्यांच्या आशीर्वादाने प्रवास करत आहे. पण आपल्याला हे देखील विसरून चालणार नाही प्रसंगी हाती तलवार घेण्याची वेळ आली तर एकनाथ महाराजांनी तेही केले होते. आणि तोही गुण मी घेतलाय. महाराष्ट्र जेव्हा अडचणीत वाटला त्यावेळी आम्ही बंड देखील पुकारलं.. आणि मग महाराष्ट्राने पाहिलं की हा एकनाथ काय करू शकतो.. मग थेट करेक्ट कार्यक्रम होतो..महाराष्ट्राला प्रगतीचे विकासाचे दिवस आले ते केवळ संतांच्या विचारांमुळे.. त्यामुळे एकनाथ महाराजांचे सर्व गुण विचार आत्मसात करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

आज जरी मी प्रत्यक्ष येऊ शकलो नसलो, तरी संत एकनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यास निश्चितच उपस्थित राहीन. पैठणच्या विकासासाठी आजपर्यंत जे कार्य केले आहे, ते पुढेही अधिक जोमाने सुरू राहील हीच ग्वाही देतो. महाराजांच्या समवेत त्यांचा संपूर्ण परिवारा विशेष करुन माई महाराज यांचे देखील मोठे योगदान आहे. या संपूर्ण परिवारास व सोहळ्यास मी शुभेच्छा देतो.

राम कृष्ण हरि..

- उप मुख्यमंत्री ना. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब

Sandipan Bhumare - संदिपानराव भुमरे Vilas Bhumare - विलास संदीपान भुमरे Shivsena - शिवसेना Yogiraj Maharaj Paithankar

Address

Satara

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share