Mahesh Shinde - महेश शिंदे

Mahesh Shinde - महेश शिंदे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahesh Shinde - महेश शिंदे, Satara.

भूमिपुत्र आमदार श्री. महेशदादा शिंदे साहेब फॅन्स क्लब
MLA आमदार,२५७ - कोरेगाव विधानसभा मतदारसंघ
सर्वांगीण विकास हाच ध्यास! राम कृष्ण हरी 🙏🚩

Proudly Created & Managed By:
JAY CHAVAN FOUNDATION
लोककल्याणासाठी व पर्यावरणाकरिता समर्पित!
जय श्रीराम 🙏🚩

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...! राम कृष्ण हरी 🙏🚩
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...! राम कृष्ण हरी 🙏🚩

शास्त्रीय ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानातून पशुपालकांच्या समृद्धीचा संकल्प! श्री सिद्धगिरी संस्थाण मठ, कणेरी येथे 'श्री सिद्ध...
04/09/2026

शास्त्रीय ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानातून पशुपालकांच्या समृद्धीचा संकल्प! श्री सिद्धगिरी संस्थाण मठ, कणेरी येथे 'श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि पशुसर्वचिकित्सालय' भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!

श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालय व श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “लोकार्पण सोहळा व भव्य पशुपालक मेळावा” ४९ वे मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन सान्निध्यात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी मा. ना. पंकजाताई गोपीनाथ मुंडे, मंत्री, पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल, महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी पशुपालकांचे उत्पन्न, पशुधनाचे आरोग्य व उत्पादकता वाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

मेळाव्यात आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, पशुखाद्य व चारा व्यवस्थापन, दुग्धोत्पादन वाढ, आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान तसेच विविध शासकीय योजनांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले. पशुपालकांच्या प्रश्नांचे शंका-समाधानही करण्यात आले.

ज्ञान, तंत्रज्ञान आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी समन्वय साधत पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा मेळावा निश्चितच दिशादर्शक ठरला.

या उपयुक्त व प्रेरणादायी आयोजनाबद्दल पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, श्री सिद्धगिरी संस्थान मठ व संपूर्ण सिद्धगिरी परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार! 🙏

पशुपालकांची समृद्धी — सक्षम ग्रामीण अर्थव्यवस्थेची भक्कम पायाभरणी!

— डॉ. प्रियाताई महेश शिंदे
अध्यक्षा, जिल्हा परिषद, सातारा.
भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष.

#पशुपालकमेळावा #सिद्धगिरीमठ #पशुसंवर्धन #पशुपालक #ग्रामीणविकास #कृषीविकास #कणेरीमठ #कोल्हापूर

कार्यसम्राट आमदार श्री. महेशदादा शिंदे साहेब यांच्या ज्येष्ठ भगिनी, बर्गे नेत्र रुग्णालय व श्री काडसिद्धेश्वर कोविड हॉस्...
02/09/2026

कार्यसम्राट आमदार श्री. महेशदादा शिंदे साहेब यांच्या ज्येष्ठ भगिनी, बर्गे नेत्र रुग्णालय व श्री काडसिद्धेश्वर कोविड हॉस्पिटल टास्क फोर्सच्या प्रमुख, मार्गदर्शिका, समाजसेविका डॉ. सौ. अरुणाताई बर्गे (ताईसाहेब) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक: आमदार श्री. महेशदादा शिंदे साहेब विचारमंच, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ

 #कोरेगाव येथे संघटनात्मक बैठक व कार्यशाळा उत्साहात संपन्न!भारतीय जनता पार्टी, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सरस्...
01/09/2026

#कोरेगाव येथे संघटनात्मक बैठक व कार्यशाळा उत्साहात संपन्न!

भारतीय जनता पार्टी, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सरस्वती विद्यालय, कोरेगाव येथे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. विक्रमजी पावसकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बैठक व कार्यशाळा उत्साहात पार पडली.

यावेळी लोकप्रिय आमदार श्री. महेशदादा शिंदे साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रियाताई महेशजी शिंदे, डॉ. अरुणाताई बर्गे तसेच कोरेगाव मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, BLO, युवा मोर्चा पदाधिकारीव, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान SIR संदर्भात संघटनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. संघटनात्मक बळकटी, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि आगामी कार्याची दिशा निश्चित करणारी ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

#भाजपा #कोरेगाव #संघटनात्मकबैठक #कार्यशाळा #युवामोर्चा

30/08/2026

कोरेगाव तालुक्यात मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियानाचा शुभारंभ!

कोरेगाव येथील शाळा क्रमांक एक मध्ये मुख्यमंत्री 'विषमुक्त स्वयंपाकघर' अभियानांतर्गत घरात घातक रासायनिक पदार्थाचा वापर टाळणे तसेच प्रचार-प्रसार करण्याची शपथ जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे, आमदार महेशदादा शिंदे यांनी दिली.

'विषमुक्त अभियानाचे वॉरियर्स' म्हणून काम करूया - आमदार श्री. महेशदादा शिंदे

कोरेगाव तालुक्याला निरोगी व सुदृद बनविण्यासाठी हे अभियान महत्ताचे पाऊल आहे. खाद्यपदार्थामध्ये वापरल्या जाणान्या कृत्रिम रंगांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम त्यांनी स्पष्ट केले. लग्नसमारंभासद विविध कार्यक्रमांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर टाळण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी 'विषमुक्त अभियानाचे वॉरियर्स' म्हणून काम करूया, असे आवाहन आमदार महेशदादा शिंदे यांनी केले.

भारतीय परंपरेतील आरोग्यदायी अन्नसंस्कार शालेय बालकांच्या मनावर रुजविण्यासह ग्रामीण भागातील कुटुंबांना
रासायनिक घटकांपासून मुक्त आरोग्यदायी आहाराबाबत जागरूक करण्यासाठी कोरेगाव तालुक्यात मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियानाचा शुभारंभ कोरेगाव येथील शाळा क्रमांक एक मध्ये करण्यात आला. यावेळी आमदार महेशदादा शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे उपस्थित होते. दैनंदिन आहारात विषमुक्त अन्नधान्य व भाजीपाल्याचा वापर वाढविणे काळाची गरज आहे.

जिल्हा परिषदेमार्फत 'विषमुक्त स्वयंपाकघर' स्पर्धा घेण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणान्या गावांना विशेष बक्षिसे देणार आहेत. उल्लेखनीय काम करणान्यांच मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गौरव करणार आहे.

प्रियाताई शिंदे म्हणाल्या, वाढत्या आजारांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर दैनंदिन आहारात विषमुक्त अन्नधान्य व भाजीपाल्याचा वापर वाढविणे काळाची गरज आहे. महिला व कुटुंबाचे आरोग्य स्वयंपाक घराशी निगडित आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि 'उमेद' बयत गटांच्या महिलांनी अभियानाची मशाल घराघरापर्यंत पोहोचवावी.

यावेळी कृत्रिम रंगमुक्त अन्नपदार्थाचा वापर, परसबाग
निर्मिती, स्वयंपाकघरात घातक रासायनिक पदार्थाचा वापर
टाळणे तसेच अभियानाचा प्रचार- प्रसार करण्याची शपथ घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हणमंत जगताळे, सारिका फाळके, पंचायत समिती सदस्या डॉ. सुरेखा पाटील, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी बालासाहेब गावडे, शारदा जाधव, प्रसाद धुमाळ, सागर दीरकर, प्रशांत सपकाळ, राजेंद्र भोसले उपस्थित होते.
#विषमुक्त #स्वयंपाकघर #कोरेगाव

'मन की बात’ — लोकांशी थेट संवाद साधणाऱ्या लोकाभिमुख नेतृत्वाचा प्रभावी संवाद!आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्...
30/08/2026

'मन की बात’ — लोकांशी थेट संवाद साधणाऱ्या लोकाभिमुख नेतृत्वाचा प्रभावी संवाद!

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेशी थेट संवाद साधला जातो. जनतेच्या भावना, अपेक्षा आणि देशाच्या विकासाचा संकल्प यांना जोडणारा हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या लोकाभिमुख आणि जनतेशी नाळ जोडलेल्या नेतृत्वाचे प्रतीक आहे.

याच विचारप्रवाहाचा अनुभव घेण्यासाठी सरस्वती विद्यालय, कोरेगाव येथे आदरणीय मोदीजींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण आयोजित करण्यात आले.

यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच BLO मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेशी संवाद, विकासाची दिशा आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प — हाच ‘मन की बात’चा संदेश! 🇮🇳
#मनकीबात #कोरेगाव
#जनसंवाद #राष्ट्रनिर्माण #विकसितभारत

कोरेगाव येथे 'विषमुक्त स्वयंपाकघर' अभियान सुरू....! #विषमुक्त  #स्वयंपाकघर      #कोरेगाव
29/08/2026

कोरेगाव येथे 'विषमुक्त स्वयंपाकघर' अभियान सुरू....!
#विषमुक्त #स्वयंपाकघर #कोरेगाव

हॉकीचे जादूगार पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!भारतीय हॉकीला जागतिक पातळीवर मान-सन्मान आणि नवी ...
29/08/2026

हॉकीचे जादूगार पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

भारतीय हॉकीला जागतिक पातळीवर मान-सन्मान आणि नवी ओळख मिळवून देणाऱ्या या महान क्रीडापटूच्या प्रेरणादायी स्मृतींना विनम्र अभिवादन!

त्यांच्या अतुलनीय क्रीडाकौशल्यातून, समर्पणातून आणि देशभक्तीतून प्रेरणा घेत प्रत्येक क्रीडापटूच्या मनात ऊर्जा, जिद्द, आत्मविश्वास आणि देशासाठी काहीतरी करण्याची नवी उमेद जागृत होवो, हीच सदिच्छा.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#राष्ट्रीयक्रीडादिन
#मेजरध्यानचंद

28/08/2026

लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ,
लहानग्यांसाठी प्रेमळ मोठा भाऊ,
ज्येष्ठांसाठी विश्वासाचा आधार,
तरुणांसाठी आदर्श प्रेरणादायी नेतृत्व,
जनसामान्यांसाठी हक्काचा आपला माणूस, आपला भूमिपुत्र! #जलनायक #कार्यसम्राट #काँक्रिटआमदार

जनतेच्या सुख-दुःखात सदैव सोबत,
विकासासाठी सदैव तत्पर -
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे
लोकनियुक्त आमदार श्री. महेशदादा शिंदे साहेब!
#रक्षाबंधन #भाऊबहिणीचेनाते

Address

Satara
415505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Shinde - महेश शिंदे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share