जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara

  • Home
  • India
  • Satara
  • जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara

जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara MAHARASHTRA GOVERNMENT PUBLICITY THROUGH SATARA OFFICE
Visit Our Twitter A/c- twitter.com/Info_Satara

महाराष्ट्रातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण...
07/09/2026

महाराष्ट्रातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी लिंक 👉🏾
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202609051354473307.pdf

#शासननिर्णय #महाराष्ट्रशासन #भरतीप्रक्रिया #परीक्षापद्धती
#उच्चस्तरीयसमिती

📍 विज्ञान भवन, नवी दिल्लीराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक...
07/09/2026

📍 विज्ञान भवन, नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील ९ शिक्षकांसह देशातील एकूण ८२ शिक्षकांचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्रातील सन्मानप्राप्त शिक्षकांमध्ये सातारा सैनिक स्कूल येथील शिवप्रसाद अरविंद टिंगरे गौरव करण्यात आला.

४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा यात समावेश आहे. पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि ५० हजार रुपये रोख प्रदान करण्यात आले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीस अभिवादन करुन राष्ट्रपतींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर आणि गोपाळबंधू दास यांच्या शैक्षणिक योगदानाचा विशेष उल्लेख केला.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभास केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव देबाश्री मुखर्जी आदी उपस्थित होते.
शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाहीत, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व, चारित्र्याला आणि विचारांना आकार देऊन सशक्त राष्ट्राची पायाभरणी करतात. अंदमान-निकोबारपासून लडाखपर्यंत दुर्गम आणि ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या समर्पण कौतुकास्पद आहे. भारताला जगाची ज्ञान आणि कौशल्याची राजधानी बनविण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
महाराष्ट्रातील सन्मानप्राप्त शिक्षक
🏆 डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे - साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड,
🏆 कुंदा जयवंत बच्छाव - महापालिका शाळा, नाशिक,
🏆 वैभव वसंतराव कुलकर्णी - जवाहर नवोदय विद्यालय, लातूर,
🏆 शिवप्रसाद अरविंद टिंगरे - सैनिक स्कूल, सातारा,
🏆 डॉ. विक्रम विशाल - भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई,
🏆 डॉ. अमर मोहनराव ताकसांडे - जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, दत्ता मेघे संस्था, वर्धा,
🏆 डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे - शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर,
🏆 किरण प्रकाश झरकर - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव,
🏆अर्चना राकेश जाधव - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक

तळबीड येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली पीक पाहणीसातारा दि. 7 :-  कराड तालुक्यातील मौजे तळबीड येथे जिल्हाधिकारी स...
07/09/2026

तळबीड येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली पीक पाहणी

सातारा दि. 7 :- कराड तालुक्यातील मौजे तळबीड येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणीचे प्रात्यक्षिक घेत पाहणी केली. डिजिटल प्रणालीद्वारे पीक पाहणी कशी करावी आणि नोंदणी करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या पाहणी दरम्यान कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे आणि तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार, पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

प्रशासनाकडून पीक पाहणी मोहिमेची अंमलबजावणी अचूक व गतीने व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतात उतरून या प्रक्रियेची माहिती घेतली. पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंद शासकीय अभिलेखात करणे सुलभ होणार असून, भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ही नोंद अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी पहाणी दरम्यान शेतकऱ्यांना सांगितले.
0000

राजकीय धावपळीतही ‘आजी’ दिसली; पालकमंत्र्यांनी ताफा थांबवला!शिवतीर्थाच्या भिंतीलगत बसलेल्या ८० वर्षीय वृद्धेची पालकमंत्री...
06/09/2026

राजकीय धावपळीतही ‘आजी’ दिसली; पालकमंत्र्यांनी ताफा थांबवला!

शिवतीर्थाच्या भिंतीलगत बसलेल्या ८० वर्षीय वृद्धेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आस्थेवाईक चौकशी; पोलिसांना कुटुंबीय शोधून घरी सोडण्याचे अथवा वृद्धाश्रमात दाखल करण्याचे निर्देश

सातारा, दि. ६ : राजकारणाच्या धावपळीत माणुसकी हरवते, अशी टीका नेहमीच केली जाते. मात्र, शनिवारी साताऱ्यात घडलेल्या एका छोट्याशा प्रसंगाने याला वेगळेच उत्तर दिले. जिल्ह्याच्या राजकीय आणि प्रशासकीय कामांच्या व्यापात असतानाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे लक्ष शिवतीर्थाच्या भिंतीलगत एकाकी बसलेल्या सुमारे ८० वर्षीय वृद्धेकडे गेले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला वाहनताफा थांबवला. ताफ्यातून खाली उतरत थेट त्या वृद्धेजवळ जाऊन त्यांनी तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या प्रसंगातून त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडले.

सातारा जिल्हा पोलिसांच्या गणेशोत्सव आयोजनाच्या बैठकीला संबोधित केल्यानंतर पालकमंत्री देसाई शिवतेज हॉल येथून आपल्या निवासस्थानी परतत होते. त्यावेळी शिवतीर्थाच्या भिंतीलगत एक वृद्ध महिला एकटीच बसलेली त्यांना दिसली. वाहन पुढे न नेता त्यांनी तात्काळ ताफा थांबविण्याच्या सूचना दिल्या आणि स्वतः त्या महिलेपर्यंत गेले.
‘आजी, तुम्ही कुठून आला? तुमचे गाव कोणते? तुम्हाला कुठे सोडायचे आहे का?’ अशा आपुलकीच्या शब्दांत त्यांनी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, ‘तुम्हाला काही खायचे आहे का?’ अशीही त्यांनी विचारणा केली. अचानक आपल्या भोवती गर्दी जमल्याने वृद्ध महिला काहीशी बावरली होती.
‘मी शाहूनगरमध्ये जाते... अंबाबाईचे देऊळ... माझा मुलगा डॉक्टर... दवाखान्यात कामाला आहे,’ एवढेच ती महिला सांगू शकली. तिची अवस्था लक्षात येताच देसाई यांनी तेथे उपस्थित पोलिस यंत्रणेला तातडीने सक्रिय केले.

‘या आजीच्या कुटुंबीयांचा शोध घ्या. त्यांना त्यांच्या घरी सुखरूप सोडा; कुटुंबीय सापडले नाहीत तर शासकीय वृद्धाश्रमात तातडीने व्यवस्था करा,’ असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.
दरम्यान, दोन महिला पोलिस कर्मचारी तातडीने तेथे दाखल झाल्या. मात्र, वृद्ध महिलेभोवती पोलिसांचा मोठा गराडा होऊ नये, अशी सूचनाही देसाई यांनी केली. ‘गर्दी करू नका, घरगुती पद्धतीने आजीची चौकशी करा,’ असे सांगत त्यांनी तिच्याशी संवेदनशीलतेने वागण्याच्या सूचना दिल्या. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
महत्त्वाचे म्हणजे, हा प्रसंग कोणत्याही नियोजित कार्यक्रमाचा भाग नव्हता. ना त्यासाठी प्रसिद्धीची तयारी होती, ना कोणताही औपचारिक सोहळा. राजकीय आणि प्रशासकीय कामांच्या धावपळीतून जात असताना रस्त्याकडेला एकटी बसलेली वृद्ध महिला दिसली आणि पालकमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला—इतकाच हा प्रसंग. त्यामुळेच या कृतीची चर्चा साताऱ्यात रंगली.

पालकमंत्री ‘आपल्या दारी’ कार्यक्रम असो, पर्यटन विभागाच्या बैठका असोत किंवा जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि राजकीय कामांचा प्रचंड व्याप असो; या सगळ्या धावपळीतही एखाद्या अनोळखी वृद्धेची व्यथा लक्षात घेऊन ताफा थांबविणे, तिची आपुलकीने चौकशी करणे आणि तिच्या सुरक्षिततेची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश देणे, हा माणुसकीचा वेगळाच पैलू ठरला.
सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची खरी संवेदनशीलता मोठ्या व्यासपीठावरच्या भाषणातून नव्हे, तर रस्त्याकडेला अडचणीत दिसलेल्या माणसासाठी तो किती क्षण थांबतो, यातून दिसते. शिवतीर्थावर घडलेल्या या प्रसंगात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राजकीय व्यस्ततेपेक्षा एका वृद्धेच्या सुरक्षिततेला दिलेले प्राधान्य चर्चेचा विषय ठरले आहे.
००००

06/09/2026
महाविस्तार – एआय … शेतकऱ्यांचा डिजिटल साथी!शेतीसाठी आवश्यक माहिती एका फोनवर! #महाविस्तारएआय    #शेतकरी  #महाराष्ट्रशासन ...
06/09/2026

महाविस्तार – एआय … शेतकऱ्यांचा डिजिटल साथी!

शेतीसाठी आवश्यक माहिती एका फोनवर!

#महाविस्तारएआय #शेतकरी #महाराष्ट्रशासन

04/09/2026

*विशेष मतदार यादी निरीक्षक शितल तेली उगले यांचा सातारा दौरा;*
*मतदान केंद्रांची पाहणी आणि बैठकांचे आयोजन*

सातारा दि ४: भारत निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रारुप मतदारयाद्या भारत निवडणूक आयोगाचे मतदार सेवा पोर्टल https://voters.eci.gov.in मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे संकेतस्थळ https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo तसेच सातारा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळ https://www.satara.gov.in वर नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
या पार्श्वभूमीवर दावे व हरकती स्वीकारण्याच्या टप्प्यात सातारा जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागाच्या आयुक्त शितल तेली उगले यांचा ९ सप्टेंबर रोजी प्रथम भेट जिल्हा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यादरम्यान विविध मतदान केंद्रांची पाहणी करून बीएलओ व मतदारांशी संवाद साधणार आहेत, तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेणार आहेत. प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने तसेच दावे व हरकतींबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास नागरिकांनी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्या निरीक्षकांच्या दौरा कार्यक्रमाच्या ठिकाणी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दौऱ्याचे प्रमुख कार्यक्रम पुढीलप्रमाणे: ३.३० ते ३.५० वा.कराड: इआरओ कराड उत्तर व कराड दक्षिण यांच्यासमवेत आढावा बैठक.
३.५० ते ४.१० वा. उंब्रज: मतदान केंद्र २३० (कन्या विद्यालय) व २३६ (जि. प. शाळा उंब्रज) ची पाहणी, बीएलओ व मतदारांशी चर्चा. ४.१० ते ४.३० वा. अतित: मतदान केंद्र ४० व ४३ (जि. प. शाळा अतित) ची पाहणी.
४.३० ते ५.२५ वा. सातारा
जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यमान खासदार, आमदार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. ५.२५ ते ६ वा. पाचवड:: मतदान केंद्र ३१२, ३१३, ३१४ (जि. प. व महात्मा गांधी विद्यालय पाचवड) मतदान केंद्र पाहणी. बी एल ओ व मतदारांशी चर्चा. ६ ते ६.३० वा.
इआरओ वाई कार्यालयास भेट व एसआयआर पाहणी व आढावा. ६.३० ते ७.१0 पारगाव (ता. खंडाळा)मतदान केंद्र ११४ व ११५ (जि. प. शाळा पारगाव) येथे भेट देऊन पाहणी व मतदारांशी चर्चा. व तेथून पुढे पुण्याकडे प्रयाण.

000

Citizen Service Portal

आले पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ९ सप्टेंबरला शेतकऱ्यांचे विशेष प्रशिक्षण सातारा दि.4: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी त...
04/09/2026

आले पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ९ सप्टेंबरला शेतकऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

सातारा दि.4: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी आले पिकाच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता, सोनगाव तर्फ सातारा, येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणामध्ये आले पिकाविषयी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, आले पीक उत्पादन वाढ ते आले प्रक्रिया व मुल्यवर्धन तसेच आले पिकातील विविध टप्प्यामधील भर नियोजन व मशिनरी प्रात्यक्षिक या तांत्रिक बाबीवर सखोल मार्गदर्शन या बरोबर बायोमिक्स, ट्रायकोडर्मा, सोलर लाइट ट्रॅप, पिवळे निळे चिकट सापळे इ. विषयी उपस्थित शेतक-यांना विशेष तज्ञांकडुन व प्रगतीशील शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


सातारा जिल्ह्यात आले पीक लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदर प्रशिक्षणास उपस्थित राहून तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन सातारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

000

04/09/2026

कल्याण संघटकाचा तालुकानिहाय दौरा

सातारा दि. 4 - माजी सैन‍िक व माजी सैनिंकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबित यांच्या विविध अडीअडचणीणींचा निपटारा करण्यासाठी माहे सप्टेंबर 2026 मध्ये कल्याण संघटकांच्या तालुका निहाय दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर दौरा पुढील प्रमाणे आहे.
तालुका कराड – दिनांक 23 सप्टेंबर 2026 , फलटण तालुका– दिनांक 28 सप्टेंबर 2026
खटाव – दिनांक,24 सप्टेंबर 2026 कोरेगाव – दिनांक – 7 सप्टेंबर 2026 खंडाळा – दिनांक, 8 सप्टेंबर 2026
पाटण – 15 सप्टेंबर 2026 वाई - दिनांक, 17 सप्टेंबर 2026,
माण - दिनांक 22 सप्टेंबर 2026, महाबळेश्वर - 30 सप्टेंबर 2026 या पेरणे आयोजित करण्यात आला आहे.
तरी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांनी केले आहे.
०००००

प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करा- पालकमंत्री शंभूराज देसाईसातारा दि. ४- जिल्ह्यात प्रादेशिक पर्यटन अराख...
04/09/2026

प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करा
- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. ४- जिल्ह्यात प्रादेशिक पर्यटन अराखड्यातील कामांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या आराखड्यातील कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील सुरु असलेल्या कामांचा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवन संरक्षक अमोल सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या सह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करावीत. ही कामे पूर्ण झाल्यामुळे जिल्ह्यात स्थानिकांना रोजगाच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच पर्यटकांची संख्या ही वाढणार आहे. आराखड्यातील कामे वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने करून ही कामे येत्या मार्च पर्यंत पूर्ण करावीत. जल पर्यटन कामेही तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या
०००००

Address

HAJERI MAL SADAR BAZAR
Satara
415001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share