सत्य सह्याद्री

सत्य सह्याद्री Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सत्य सह्याद्री, Shop No. 19, Ramakant Towers, Yadogopal Peth, Behind Gol Maruti mandir, Satara.

सातारा येथून प्रकाशित होणारे अस्सल सातारी दैनिक
सातारा जिल्ह्यासह राज्यातील तसेच देशातील महत्त्वाच्या घडामोडी,
ताज्या अपडेट्स साठी लगेच फॉलो करा
तुम्हालाही तुमच्या ब्रँडचे प्रमोशन करायचे आहे ?
तर आजच आम्हाला संपर्क साधा.
7030253030

सातारा स्टँड बाहेरची स्थिती, फूटपाथही पुरेनात पसारा रस्त्यावर त्यापुढे रिक्षा स्टँड.. खरंतर पोवईनाका ते भूविकास बँकेपर्य...
05/09/2026

सातारा स्टँड बाहेरची स्थिती, फूटपाथही पुरेनात पसारा रस्त्यावर त्यापुढे रिक्षा स्टँड.. खरंतर पोवईनाका ते भूविकास बँकेपर्यंतचा रस्ता पूर्ण बंद करून बांधकाम खात्याने हा पूर्ण हॉकर्स झोन करणे उचित ठरेल.. काय म्हणता सातारकर. पाहिजे तर स्टँड दुसरीकडे केले तरी चालेल

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सात जणांच्या टोळीला सातारा...
05/09/2026

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सात जणांच्या टोळीला सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण निखील पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये हा आदेश दिला.

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख ऋषिकेश उर्फ दादा शशिकांत पवार (वय २२, रा. काळोशी, कोडोली), जितेंद्र दिपक सुर्वे (२२, धनगरवाडी, श्रीकृष्ण कॉलनी, कोडोली), पृथ्वीराज भीमराव साळुंखे (रा. कोडोली), संदिप दादा वलेकर (२२, महाराजाची बाग, धनगरवाडी, कोडोली), अनिकेत दादा वलेकर (२२, महाराजाची बाग, धनगरवाडी, कोडोली), प्रेम उर्फ बबलु विलास पार्टे (२४, मेढा, ता. जावली) आणि सिद्धार्थ विवेक महाडिक (१८, श्रीकृष्ण कॉलनी, कोडोली) यांचा समावेश आहे.

05/09/2026

कराड स्टँड बाहेरचे फूटपाथ हॉकर्सनी गिळले..प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक..कराडकर व्यक्त व्हा

04/09/2026

साताऱ्यात जन्माष्टमीचा उत्साह. स्थळ मुरलीधर मंदिर यादोगोपाळ पेठ सातारा 4 सप्टेंबर

04/09/2026

सातारा: युवती आत्महत्या प्रकरणी वायसी कॉलेज वसतिगृह अधीक्षक सक्तीच्या रजेवर, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा

सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध धा...
04/09/2026

सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी सातारा जिल्ह्यात संपन्न झाला.यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी चे औचित्य राखून अनेक कृष्ण भक्तांनी उपवासाचे व्रत केले. रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या जन्माचे कथन करत ..भगवान गोपाल कृष्ण की जय, राधे, राधे,.. जय श्री कृष्ण ..अशा मोठ्या घोषणा देत हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा शेकडो कृष्ण भक्तांनी मोठ्या उत्साहात साजरा केला .
छायाचित्र: दिवशीकर कृष्ण मंदीर यादोगोपाळ पेठ, सातारा. (छायाचित्र:अतुल देशपांडे)

04/09/2026

नियम पाळू,पण व्यवसाय बंद नको..साऊंड वाजवण्यास परवानगी देण्याची व्यावसायिकांची मागणी;मंत्री शिवेंद्रसिंहराजेंसह प्रशासनाला निवेदन..

सातारा आणि कराडमध्ये पहिल्यांदाच सातारा वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने समन...
04/09/2026

सातारा आणि कराडमध्ये पहिल्यांदाच सातारा वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने समन्वय साधत एकाच वेळी कारवाईचा धडाका लावला. जप्त केलेले मॉडिफाय सायलेन्सर कराडच्या विद्यानगर येथे बुलडोझरखाली अक्षरशः चिरडून नष्ट करण्यात आले. साताऱ्यातही पोवई नाका येथे जप्त सायलेन्सर अशाच पद्धतीने नष्ट करण्यात आले.

पालिकेचे जावई...छे कर भरणारे व्यापारी...स्थळ: सातारा भवानी पेठ. खण आळी. हा फोटो पाहून तुम्हाला हे रस्त्यावर अतिक्रमण वाट...
04/09/2026

पालिकेचे जावई...छे कर भरणारे व्यापारी...
स्थळ: सातारा भवानी पेठ. खण आळी. हा फोटो पाहून तुम्हाला हे रस्त्यावर अतिक्रमण वाटेल. पण पालिकेचा कर भरून व्यावसायिक वाढीसाठी राबवलेला तो एक उपक्रम आहे. खरं तर सातारा केव्हाच अतिक्रमणमुक्त झालंय..

क्षेत्र महाबळेश्वर परीसरात गव्याचे दर्शन...रस्त्याकडेला चरतानाचा देखणा रुबाब कॅमेऱ्यात कैद.छायाचित्र शेखर कदम.
04/09/2026

क्षेत्र महाबळेश्वर परीसरात गव्याचे दर्शन...रस्त्याकडेला चरतानाचा देखणा रुबाब कॅमेऱ्यात कैद.
छायाचित्र शेखर कदम.

Address

Shop No. 19, Ramakant Towers, Yadogopal Peth, Behind Gol Maruti Mandir
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when सत्य सह्याद्री posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share