सरस्वती अभ्यासिका शाहूनगर गोडोली सातारा

  • Home
  • India
  • Satara
  • सरस्वती अभ्यासिका शाहूनगर गोडोली सातारा

सरस्वती अभ्यासिका शाहूनगर गोडोली सातारा खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते

17/09/2025
08/04/2025

सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला.* वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही त्या साठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावा विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे. मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी. आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहीजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहीजे. माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे. त्यांने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे. पण आता तोच थकला आहे. मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत. आई-वडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत, हा विलक्षण प्रकार आहे. *आईवडिलांना न साभांळणाऱ्या नालायक अवलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपराक आहे.* जज साहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा जमाना असताना तेथे ही श्रावणबाळे कशी जन्माला आली? जजला निकाल देता येइना. त्यांनी आईवडिलानाच विचारले, आपली काय ईच्छा आहे? तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते. तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला. आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले. तसा मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावणार याचे त्याला खुप दु:ख झाले. धन्य ते आईवडिल, ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले. या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणारे जन्माला आले आहेत. *आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय.आय.टी. इजिनियर्स आहेत, सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्चभ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत.* या देशात शिकून परदेशात नोकरी करणारे महाभाग आहेत. जे देशसेवा करायची सोडून परकियांचे नोकरदार झाले आहेत. परत आईवडीलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रिकांसारखी झालेली आहे. शेतकरी आत्महत्या करतात पण आईवडिलांना सांभाळतात. पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत. कृतघ्न झाल्या आहेत. आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत. *वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे.* *वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी अधोगती आहे.* 🙏🫡🥹😢 💐🌸💐🌸💐🌸💐🌸

*टेन्शन घ्यायचंच नाही*...कोणासाठी किती काहीही करा,काही ऊपयोग नाही.आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... क...
06/04/2025

*टेन्शन घ्यायचंच नाही*...
कोणासाठी किती काहीही करा,काही ऊपयोग नाही.
आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... कुणाचे वाईट चिंतायचे नाही... कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं... काही कमी पडत नाही... आणि फरक तर अजिबात पडत नाही... कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही... लोकांची विविध रूपे असतात... सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात... *ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो*...
आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण?...

कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो... आपण त्याच्या विषयी तसेच इतरां विषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे... बोलण्यात स्पष्ट वक्ते पणा ठेवायचा...
कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही... आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही...
फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे... कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही...

"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."
सामान्य लोकांचा प्रामाणिक पणाचा दरारा खुप मोठा असतो ....

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
😄😄 *_नेहमी हसत रहा_* 😄😄

⚜ *_हा सुंदर जन्म पुन्हा नाही_*⚜

Address

Aai Bunglow Shivneri Colony Ajinkyatara Road Shaunagar Godoli Sarara
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when सरस्वती अभ्यासिका शाहूनगर गोडोली सातारा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category