Amhi Kumthekar - आम्ही कुमठेकर

Amhi Kumthekar - आम्ही कुमठेकर कुमठे गावच्या माहितीसाठी अधिकृत फेसबुक पेज

11/08/2026
श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा 2026 🙏🚩सर्व कुमठे ग्रामस्थांना कळविण्यात येते की,कुमठे येथे श्री संत सा...
10/08/2026

श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा 2026 🙏🚩

सर्व कुमठे ग्रामस्थांना कळविण्यात येते की,
कुमठे येथे श्री संत सावता महाराजांचा पवित्र संजीवन समाधी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे.

📅 दि. 10 ऑगस्ट 2026 (सोमवार)
🕕 सायं. 06 ते 09 – वारकरी दिंडी सोहळा

📅 दि. 11 ऑगस्ट 2026 (मंगळवार)
🕙 सकाळी 10 ते 12 – कीर्तन सेवा

🎤 कीर्तनकार : ह.भ.प. रोहिदास महाराज मालुसरे

📍 स्थळ : श्री संत सावता महाराज मंदिर, कुमठे

🙏 या पवित्र सोहळ्यास आपण सर्वांनी उपस्थित राहून भक्तीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

🚩 आयोजक : समस्त माळी समाज पंचक्रोशी व ग्रामस्थ, कुमठे

#सावता_महाराज #समाधी_सोहळा #कुमठे #वारकरी #भक्ती महाराष्ट्र durgvedarohit amhikumthekar 🚩

🚩 माझं राज छत्रपती झालं जी...! 🚩सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमठे नं. १ येथील विद...
27/06/2026

🚩 माझं राज छत्रपती झालं जी...! 🚩
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमठे नं. १ येथील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन २०२५–२०२६ मध्ये "माझं राज छत्रपती झालं जी" या शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील गीतावर सादर केलेला अप्रतिम नृत्याविष्कार मन जिंकणारा आहे. ❤️

छोट्या-छोट्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनय, नृत्य आणि उत्साहातून छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची प्रेरणा आणि अभिमान अत्यंत सुंदर पद्धतीने सादर केला आहे. हा सुंदर सादरीकरणाचा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. 🙏🚩

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार, सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत आणि आनंदाने भारलेले वातावरण… या स्नेहसंमेलनाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणि अभिमानाची भावना निर्माण केली.

या यशस्वी कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐
#वार्षिक_स्नेहसंमेलन Shivrajyabhishek ChhatrapatiShivajiMaharaj

🇮🇳 देशाचा आणि कुमठे गावाचा सार्थ अभिमान! 🇮🇳कुमठे गावचे सुपुत्र वेदांत विजय चव्हाण यांनी भारतीय वायुसेनेत Flying Officer ...
26/06/2026

🇮🇳 देशाचा आणि कुमठे गावाचा सार्थ अभिमान! 🇮🇳

कुमठे गावचे सुपुत्र वेदांत विजय चव्हाण यांनी भारतीय वायुसेनेत Flying Officer पद मिळवून कुमठे गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
त्यांच्या या यशस्वी वाटचालीस समस्त कुमठेकरांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केल्याबद्दल सलाम! 🇮🇳🔥

👉 आम्हा कुमठे वासियाना अभिमान आहे तुझा वेदांत!

जयहिंद 🇮🇳

🎉 हार्दिक अभिनंदन! कुमठे गावचे सुपुत्र श्री. रामदास इंगवले साहेब यांची सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पदावर गडहिंग्लज वरून प...
24/06/2026

🎉 हार्दिक अभिनंदन!

कुमठे गावचे सुपुत्र श्री. रामदास इंगवले साहेब यांची सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पदावर गडहिंग्लज वरून पुणे शहर येथे झालेल्या बदलीबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐

आपल्या कर्तृत्वाने आणि प्रामाणिक सेवाभावाने आपण आजवर प्रत्येक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. पुणे शहरातही आपल्या कार्याची छाप नक्कीच उमटेल, याची आम्हाला खात्री आहे. 🚔

आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! आपण असेच यशाच्या शिखरावर पोहोचत राहा, हीच सदिच्छा… 🙏

शुभेच्छुक –
रामदास इंगवले मित्रपरिवार, कुमठे

#अभिनंदन Inspiration

पुंडलिक वरदे…हरी विठ्ठल 🚩🙏
24/06/2026

पुंडलिक वरदे…हरी विठ्ठल 🚩🙏

गावच्या पारावरील कीर्तन सेवा 🙏🚩
18/06/2026

गावच्या पारावरील कीर्तन सेवा 🙏🚩

दि. 14 जून 2026  रोजी या मंगल दिवशी आपल्या कुमठे गावचे ग्रामदैवत श्री. ज्योतिर्लिंग देवाचे नयनरम्य, मन मोहून टाकणारे दिव...
14/06/2026

दि. 14 जून 2026 रोजी या मंगल दिवशी आपल्या कुमठे गावचे ग्रामदैवत श्री. ज्योतिर्लिंग देवाचे नयनरम्य, मन मोहून टाकणारे दिव्य रूप पाहण्याचे भाग्य लाभले… ही पावन क्षणं जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवोत हीच प्रार्थना…🌼

#कुमठेगाव #ग्रामदैवत #ज्योतिर्लिंगदेव

16/05/2026

🚩 श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज

स्वराज्याचे स्वप्न पाहणारा राजा…
जनतेसाठी जगणारा नेता…
आणि शौर्य, धैर्य, स्वाभिमान यांचा जाज्वल्य इतिहास! 🔥

आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आजही जिवंत आहे छत्रपतींची प्रेरणा 🙏

॥ जय शिवराय ॥ 🚩

Address

At Post Kumthe Tel-Koregaon Dist-Satra
Satara
415501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amhi Kumthekar - आम्ही कुमठेकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category