ShivaBhavani

ShivaBhavani The pacifying words
ALL PATHS MEET AND END AT TRUTH. UNITY UNDERNEATH DIVERSITY.

24/03/2024

कशाचे वावडे
देवा मज नाही
वावगे ना काही
तुझे मज

तुझ्या नामासह
संपूर्ण तू माझा
गोविंद मी तुझा
मुकुंद तू

तुझे सर्व काही
आहे माझे देवा
मी तुझा केशवा
पूर्णपणे

🙏
होळी पौर्णिमा
ॐ गं गणपतये नमः
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
राम कृष्ण हरी पांडुरंगा
खंडेराया मल्हारी मार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
आईराजा उदोउदो
देवा तू माझा व मी तुझा
हरि ॐ तत्सत्
सोहं

24/03/2024

एक भिक्षू व्याख्यान देण्यासाठी आला.आणि काहीच न बोलता थोड्या वेळाने निघून गेला. लोकांनी विचारले. भन्ते, आपण व्यक्त नाही झालात. तो हसून म्हणाला मी तर तुम्हाला सांगायचे ते सर्व सांगितले. तुम्हाला समजले नाही का?
मौन हेच ज्ञान आहे. जेव्हा व्यक्त होण्याचा खटाटोप, अट्टाहास संपतो तिथेच शुद्ध ज्ञानाची अभिव्यक्ती सुरू होते.
ज्ञानोबा माऊलींची संजीवन समाधी म्हणजे स्वानंद साम्राज्य चक्रवर्ती शब्दसम्राटाचे महामौन आहे.
🙏
होळी पौर्णिमा
ॐ गं गणपतये नमः
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
राम कृष्ण हरी पांडुरंगा
खंडेराया मल्हारी मार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
आईराजा उदोउदो
देवा तू माझा व मी तुझा
हरि ॐ तत्सत्
सोहं

24/03/2024

मुक्ति म्हणजे काय
मुक्ति का पाहिजे
मुक्तिचे प्रयोजन, कार्य, हेतू काय आहे
सरळ, साधे, सोपे, निष्पाप, निर्मळ जीवन का जगू नये
मुक्तिचा व्यर्थ आटापिटा का करावा
त्यामुळे कुणाचे भले होईल
इथला कोकणी माणूस घरालगतच्या झऱ्यात दररोज एक मासा पकडतो. भात, नारळ, मिरी, काजू घराच्या सभोवती मुबलक असतो.
त्याला जगण्यासाठी काही आटापिटा करावा लागत नाही. तो मुक्तच जन्मतो. मुक्त जगतो. मुक्तच मरतो. पण त्याच्या शब्दसंग्रहात मुक्ति किंवा बंधन हा शब्द नसतो. फार सुंदर, आनंदी, मनमोकळे, नैसर्गिक जगणे आहे इथे.
खटाटोप संपला आहे इथे. वहात्या झऱ्याचे आयुष्य सगळ्यांचेच आहे. खरे सुखी लोक आहेत हे. सुशेगाद, पुढच्या दिवसाचा विचार न करणारे लोक. इथे येऊन आपल्याही आशा तृष्णा संपून जातात.
🙏
होळी पौर्णिमा
ॐ गं गणपतये नमः
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
राम कृष्ण हरी पांडुरंगा
खंडेराया मल्हारी मार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
आईराजा उदोउदो
देवा तू माझा व मी तुझा
हरि ॐ तत्सत्
सोहं

सकाळ जावी पाखरांसवेदुपार घरंगळत ही जावीसंध्याकाळ कलंडून जावीरात्र लोचनांवर उतरावीपांघरण्यासी सुख ओढावेनिशीदिन ऐसे व्यतीत...
11/02/2024

सकाळ जावी पाखरांसवे
दुपार घरंगळत ही जावी
संध्याकाळ कलंडून जावी
रात्र लोचनांवर उतरावी

पांघरण्यासी सुख ओढावे
निशीदिन ऐसे व्यतीत व्हावे
सगळ्यांसाठी शुभंकर व्हावे
तुझे नाम देवा आळवावे

अती मुलायम सुखी जीवना
किती तुझी मी स्तुती करावी
वाऱ्यावरी लकेर फिरावी
नित्यमुक्त पाखरे उडावी

योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।
पाहातां पाहातां मना नपुरे धणी ॥१॥
देखिला देखिला माये देवाचा देवो ।
फ़िटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥
अनंतरुपें अनंतवेषें देखिलें म्यां त्यासी ।
रखुमादेविवरीं खुण बाणली कैसी ॥३॥
- ज्ञानेश्वर माऊली

।। पांडुरंगार्पण।।

ॐ गं गणपतये नमः
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
राम कृष्ण हरी पांडुरंगा
खंडेराया मल्हारी मार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
आईराजा उदोउदो
देवा तू माझा व मी तुझा
हरि ॐ तत्सत्
सोहं

ऐसा महात्मा दुर्लभज्यासी परमार्थ सुलभजे उच्चारे त्याची जीभतेचि नाम लक्ष्मीवल्लभअगणित जीव आलेगेलेक्वचित रामपददल पावलेअखंड...
10/02/2024

ऐसा महात्मा दुर्लभ
ज्यासी परमार्थ सुलभ
जे उच्चारे त्याची जीभ
तेचि नाम लक्ष्मीवल्लभ

अगणित जीव आलेगेले
क्वचित रामपददल पावले
अखंड रामनामरस प्याले
ध्यान समाधीत निमग्न झाले

स्मरा रे जरा जगद्व्यापका
घालीतसे तो भक्तांसी हाका
अनाहत गुंजन नाद सोहं ऐका
पहा अंतर्यामी ज्योतिर्मय सखा

हरि ॐ तत्सत्
माघ मासारंभ
ॐ गं गणपतये नमः
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
राम कृष्ण हरी पांडुरंगा
खंडेराया मल्हारी मार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
आईराजा उदोउदो
देवा तू माझा व मी तुझा

मन शांत शांतनाही लोभ रागसुख दुःख भोगनाही मजश्रीमंत गरीब ऐसा नाही भाव देई मज देवमुखी घासप्रेम देई रामभक्ती देई रामभिक्षा ...
02/02/2024

मन शांत शांत
नाही लोभ राग
सुख दुःख भोग
नाही मज

श्रीमंत गरीब
ऐसा नाही भाव
देई मज देव
मुखी घास

प्रेम देई राम
भक्ती देई राम
भिक्षा देई राम
भिकारी मी

राम मज देतो
सुखाने मी खातो
आनंदे भोगतो
आत्मसुख

भक्त मी रामाचा
संतुष्ट सतत
किर्तनी नाचत
गातो गुण

स्वानंदाधीश मी
तोषचक्रवर्ती
मी जगाची आर्ति
काय जाणू

स्वामी विवेकानंद जयंती
(तिथीपूजा)
ॐ गं गणपतये नमः
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
राम कृष्ण हरी पांडुरंगा
खंडेराया मल्हारी मार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
आईराजा उदोउदो
देवा तू माझा व मी तुझा
हरि ॐ तत्सत्
सोहं

काय तो विचारकरावा पुढचाकेवळ रामाचाध्यास असोनको नको देवाअन्य तो विषयरामाचे मी पायस्मरो नित्यफार रामा त्रासऐहिकाचा होतोतुल...
22/01/2024

काय तो विचार
करावा पुढचा
केवळ रामाचा
ध्यास असो
नको नको देवा
अन्य तो विषय
रामाचे मी पाय
स्मरो नित्य
फार रामा त्रास
ऐहिकाचा होतो
तुला मी पहातो
हेच बरे
आदि स्थिती अंत
यांच्या पैल राम
आत्मसुखधाम
सदा स्थिर
हरि ॐ तत्सत्
अयोध्या राम प्राणप्रतिष्ठा

भवतापावरऔषध हे नेकरामनाम एकह्रदयातज्वलज्जहालनको हालहालश्रीराम कृपालुह्रदयातशांत रामे मनआनंदे तोषलेसुखाला ओतलेह्रदयातरामा...
17/01/2024

भवतापावर
औषध हे नेक
रामनाम एक
ह्रदयात

ज्वलज्जहाल
नको हालहाल
श्रीराम कृपालु
ह्रदयात

शांत रामे मन
आनंदे तोषले
सुखाला ओतले
ह्रदयात

रामात आराम
विघ्नास विराम
राम पूर्णकाम
ह्रदयात

।। पांडुरंगार्पण।।

ॐ गं गणपतये नमः
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
राम कृष्ण हरी पांडुरंगा
खंडेराया मल्हारी मार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
आईराजा उदोउदो
देवा तू माझा व मी तुझा
हरि ॐ तत्सत्
सोहं
गुरू गोविंदसिंह जयंती

सर्व झगडा मिटून गेलादृष्टी माझी निवळलीप्रपंचाचा व्याप गेलाथंड झाली सावलीकृपा अवघी गणेशा तव कपट कारस्थान नाहीस्वस्थ सुत्र...
16/01/2024

सर्व झगडा मिटून गेला
दृष्टी माझी निवळली
प्रपंचाचा व्याप गेला
थंड झाली सावली

कृपा अवघी गणेशा तव
कपट कारस्थान नाही
स्वस्थ सुत्रे हालवी तू
खेळवीतो बाहुली

संकटा अस्तित्व नाही
फक्त ती माया तुझी
तू सख्या प्रसन्न झाला
ज्ञानज्योती उजळली

रे प्रभो मिटल्यात चिंता
जव तुझ्या पायावरी
ठेविता मम मस्तकाला
सुखे सारी गावली

गुणातीतमानं चिदानन्दरूपं
चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम्।
मुनिध्येयमाकाशरूपं परेशं
परब्रह्मरूपं गणेशं भजेम॥
-- श्री आदि शंकराचार्य

ॐ गं गणपतये नमः
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
राम कृष्ण हरी पांडुरंगा
खंडेराया मल्हारी मार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
आईराजा उदोउदो
देवा तू माझा व मी तुझा
हरि ॐ तत्सत्
सोहं
संक्रांत करिदिन
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन

पुण्यात असताना एके दिवशी संध्याकाळी डॉल्बी वॉलचा भयंकर दणाणून टाकणारा आवाज सुरू झाला, " शेजारची ही काळी मैना लागली डोलाय...
03/01/2024

पुण्यात असताना एके दिवशी संध्याकाळी डॉल्बी वॉलचा भयंकर दणाणून टाकणारा आवाज सुरू झाला, " शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला "
माझ्या डोळ्यांतून दिव्य प्रेमाश्रूधारा वहायला लागल्या. काही अष्टसात्विक भाव प्रकट झाले.
मला बोलावणे आले हे मला माहीत झाले. परंतु त्या गोंगाटानेच मला बोलावून घेतले आहे असे मला वाटले नाही. मी इतर मंदिरात जाऊन आलो. परंतु चंद्र ग्रहण असल्याने ती मंदिरे बंद होती. मी रस्त्यावर हुंदके देत चाललो होतो. कोणाला दिसू नये म्हणून मी तळहातांनी तोंड झाकून गदगदून रडत चाललो होतो. अधिकाधिक अधीर होत चाललो होतो पण कोठे जावे ते कळत नव्हते. परंतु वळून त्या आवाजाकडे अखेर पोहोचलो. गर्दीत वाट काढत देवीच्या रथापुढे उभा राहिलो. हात जोडले व रडू थांबले. परमात्म्याचे व आत्म्याचे मिलन झाले. स्तब्ध शांत आनंदी झालो. त्या मुलांचा धांगडधिंगा नाचगाण्याचा मदहोश बेधुंद धिंगाणा चालूच होता.
ज्यांनी ब्रह्मानंदाची चव चाखली नाही त्यांना या पवित्र सुखाश्रुंची गोडी काय कळणार ? त्यांना हे अश्रू म्हणजे depression, negativity, दु:ख, यांचे लक्षण वाटणार. असो, ते अज्ञानी मायाधीन आहेत. मातेश्वरी, त्यांचाही उद्धार कर.
पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी |
परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोस्तुते ||
ॐ गं गणपतये नमः
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
राम कृष्ण हरी पांडुरंगा
खंडेराया मल्हारी मार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
आईराजा उदोउदो
देवा तू माझा व मी तुझा
हरि ॐ तत्सत्
सोहं
कोजागिरी पौर्णिमा
२८ऑक्टोबर २०२३

माझे सुख फक्तमाझ्यासाठी आहेदुसऱ्या कोणाला सुख देऊ कसे सांगज्याचा त्याचा मार्गवेगवेगळा आहेकोणालाही सद्बुद्धीदेऊ कशी सांगक...
18/12/2023

माझे सुख फक्त
माझ्यासाठी आहे
दुसऱ्या कोणाला सुख
देऊ कसे सांग
ज्याचा त्याचा मार्ग
वेगवेगळा आहे
कोणालाही सद्बुद्धी
देऊ कशी सांग
कोणाचाही सुखावर
विश्वास बसत नाही
कोणासाठी काय करू
तेच कळत नाही
असो देवा माझे तरी
सुख टिकून राहो
आणखी काय मागू तुला
सगळ्यांचे भले होवो
मिळालेला घास तुकडा
पुरा पडो देवा
राम नाम सदा ओठी
मन भरो देवा
दु:खाचा ना कोणावर
डोंगर कोसळो देवा
तुझ्या पायी रूजू व्हावी
वेडीवाकडी सेवा
🙏
हरि ॐ तत्सत्
चंपाषष्ठी
🙏
खंडेराया मल्हारी मार्तंडा
कडेपठारच्या राजा
येळकोट येळकोट
जय मल्हार
सदानंदाचे चांगभले
आई राजा उदो उदो
देवा तू माझा मी तुझा
🙏
राम कृष्ण हरी
पांडुरंगा विठ्ठला
🙏
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏
ॐ गं गणपतये नमः
सोहं

निर्मळ हे मनआनंद साधनव्यथा ती पळूनदूर गेलीपावन हे नामपांडुरंग रामचिंतेसी विरामअवघ्याचिदत्ताचे वदनप्रसन्नता पूर्णसाईचे चर...
16/12/2023

निर्मळ हे मन
आनंद साधन
व्यथा ती पळून
दूर गेली

पावन हे नाम
पांडुरंग राम
चिंतेसी विराम
अवघ्याचि

दत्ताचे वदन
प्रसन्नता पूर्ण
साईचे चरण
वरदायी

हरि ॐ तत्सत्
विनायक चतुर्थी

Address

Saikripa Complex
Savantvadi

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShivaBhavani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category