Sourabh Raju Shetti Official

Sourabh Raju Shetti Official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sourabh Raju Shetti Official, Social service, Shetti mala, arjunwad Road, shirol, Shirol.

20/03/2026
अनेक दिवसांच्या धावपळी नंतर…आंदोलनं, सभा, दौरे, बैठकांची लगबग… या सगळ्या चळवळीच्या वादळात कधी कधी स्वतःसाठी आणि कुटुंबास...
28/02/2026

अनेक दिवसांच्या धावपळी नंतर…
आंदोलनं, सभा, दौरे, बैठकांची लगबग… या सगळ्या चळवळीच्या वादळात कधी कधी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ द्यायचा राहूनच जातो.

मी,
खूप दिवसांपासून एका क्षणाची वाट पाहत होतो. साहेब, आई आणि समृद्धी… आपण सगळे एकत्र निवांत वेळ घालवावा, गप्पा माराव्यात, जुन्या आठवणी काढाव्यात, हसावं, थोडं मन मोकळं करावं… आणि आज तो क्षण अखेर आला.

कर्नाटक–महाराष्ट्र सीमाभागातील आमचे कुलदैवत दरगोबा (दर्याप्पा) मंदिर येथे आज सहपरिवार दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. देवासमोर उभं राहिल्यावर एक वेगळीच शांतता लाभते. साहेबांची सर्वसामान्य जनतेसाठी केलेली चळवळ, संघर्ष, जनतेच्या प्रश्नांतून जाताना जी धावपळ होते, ती जणू काही त्या पवित्र स्थळी क्षणभर थांबली…

साहेबांच्या चेहऱ्यावरही आज वेगळंच समाधान दिसत होतं. संघर्षात कणखर असलेले साहेब, पण कुटुंबासोबत असताना अगदी साधे, हसरे, मोकळे… हा क्षण माझ्यासाठी अनमोल होता.

त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जत तालुका अध्यक्ष व आधुनिक द्राक्ष शेती करणारे मा. चिक्कू माळी यांच्या घरी भेट दिली. शेतकरी, शेती, नवनवीन प्रयोग, बाजारभाव, भविष्यातील योजना. या सगळ्यावर मनमोकळ्या गप्पा झाल्या. चळवळ ही फक्त रस्त्यावरची घोषणा नसते, तर ती शेतातल्या प्रत्येक वेलीशी, प्रत्येक घामाच्या थेंबाशी जोडलेली असते याची पुन्हा जाणीव झाली.

आजचा दिवस मला एक गोष्ट शिकवून गेला. संघर्ष कितीही मोठा असो, जबाबदाऱ्या कितीही असोत… पण कुटुंब, संस्कार आणि कुलदैवताचा आशीर्वाद हीच खरी ऊर्जा आहे.

चळवळ सुरूच राहील…
संघर्षही सुरूच राहील…
पण अशा क्षणांतूनच पुढच्या लढाईची ताकद मिळत राहील.

Sourabh Shetti

06/02/2026

Udgav ZP
Hasur gav bhet

आदरणीय खासदार शाहू महाराज यांसोबत भादोले जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांचे प्रचार शुभारंभ करतानाचे क्षण.
25/01/2026

आदरणीय खासदार शाहू महाराज यांसोबत भादोले जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांचे प्रचार शुभारंभ करतानाचे क्षण.

आज कसबा सांगाव ता. कागल येथे कसबा सांगाव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उभे असलेल्या जिल्हा प...
24/01/2026

आज कसबा सांगाव ता. कागल येथे कसबा सांगाव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उभे असलेल्या जिल्हा परिषद उमेदवार प्रतिभा हेगडे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंचायत समिती उमेदवार सुप्रिया मयुर भंडारी, व श्री. राज कांबळे यांच्या प्रचार शुभारंभ हनुमान मंदिर येथून करून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी माझ्यासोबत मा.वीरेंद्र संजय मंडलिक, अविनाश मगदुम, दीपक हेगडे, प्रभू भोजे, राहुल हेरवाडे,ओंकार भोजे, राजू झांजगे, संतोष मगदुम, अनिल माळी उपस्थित होते.

स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कट्टर कार्यकर्तासुयश राजगोंडा पाटील,निमशिरगाव (भरकडे) वय ...
10/01/2026

स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कट्टर कार्यकर्ता
सुयश राजगोंडा पाटील,निमशिरगाव (भरकडे) वय वर्ष 27 याचं आज शनिवार सकाळी आकस्मिक निधन झालं. अत्यंत कर्तबगार व मनमिळावू स्वभावाचा राजू शेट्टी साहेबांच्या विचाराचा पाईक असणारा तरुण हरपला.
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐

स्वाभिमानी विद्यार्थी परिषद
व स्वाभिमानी परिवार.

Address

Shetti Mala, Arjunwad Road, Shirol
Shirol
416106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sourabh Raju Shetti Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category