21/08/2026
🗓️ २१-०८-२०२६ 📍 श्रीरामपूर
स्व. आकाश दुबैय्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच संघटित टोळीवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या ७ दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन पोलीस प्रशासनातर्फे लेखी स्वरूपात देण्यात आलेल्या ग्वाहीनंतर स्थगित करण्यात आले.
संघटित टोळीवर ६ सप्टेंबर पर्यंत मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असून गुन्हेगारी समूळ उखडून टाकण्यासाठी प्रशासन योग्य ती कार्यवाही करत असल्याची माहिती यावेळी पोलीस प्रशासनाने दिली. तसेच गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी कृतीशील काम करावे अशी आग्रही मागणी यादरम्यान केली.
या बेमुदत धरणे आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व श्रीरामपूर वासियांचे मनापासून आभार.
🚨अहिल्यानगर पोलीस 🚨 Rahul Gandhi INC Maharashtra INC Maharashtra Ramesh Chennithala Harshwardhan Sapkal