17/04/2026
आज लोकसभेत अत्यंत विचित्र दृश्य पाहायला मिळाले.
नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी आवश्यक असलेले संविधान दुरुस्ती विधेयक काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि समाजवादी पक्ष यांनी मंजूर होऊ दिले नाही. महिलांना 33% आरक्षण देणारे हे विधेयक पाडणे, त्याचा आनंद साजरा करणे आणि जयघोष करणे हे खरोखर निंदनीय आणि कल्पनेपलीकडचे आहे.
आता देशातील महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% आरक्षण, जे त्यांचा हक्क होता, ते मिळू शकणार नाही. काँग्रेस आणि तिच्या सहयोगींनी हे प्रथमच केलेले नाही, तर वारंवार असेच केले आहे. त्यांची ही भूमिका ना महिलांच्या हिताची आहे, ना देशाच्या.
मी त्यांना सांगू इच्छितो की, नारी शक्तीचा अपमान येथेच थांबणार नाही, तर दूरपर्यंत जाईल. विरोधकांना ‘महिलांचा आक्रोश’ केवळ 2029 च्या लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर प्रत्येक स्तरावर, प्रत्येक निवडणुकीत आणि प्रत्येक ठिकाणी सहन करावा लागेल..