Office of Umesh Patil

Office of Umesh Patil स्वाभिमानी...

प्रदेश प्रवक्ता, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश,
कार्यकारी जिल्हाध्यक्ष, सोलापूर जिल्हा,
जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन मंडळ सदस्य, सोलापूर

13/01/2026

जाहीर पक्ष प्रवेश...!

मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे, माजी जिल्हा परिषद व मोहोळ पंचायत समितीचे माजी सभापती विजयराजे दादा डोंगरे, लोकशक्ती परिवार तसेच अक्कलकोटचे माजी आमदार कैलासवासी सिद्धाराम आप्पा पाटील यांचे संपूर्ण कुटुंब—जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक मा. शिवानंदजी पाटील, अक्कलकोट पंचायत समितीचे माजी सभापती, स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयजी पाटील आणि स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भव्य पक्षप्रवेश शेटफळ येथे आयोजित कार्यक्रमात होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या सर्व अनुभवी आणि समाजाशी घट्ट नाते असलेल्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोलापूर जिल्ह्यात नवे बळ, नवी ऊर्जा आणि व्यापक जनसमर्थन मिळेल, तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, असा मला ठाम विश्वास आहे.

बुधवार 14 जानेवारी 2026

ठिकाण : ग्रामपंचायत कार्यालया शेजारील मैदान, शेटफळ ता. मोहोळ

वेळ : सकाळी 10 वाजता

उमेश दादा पाटील यांच्या जिद्दीला सलाम!मोहोळ तालुक्यात अनेक वर्षांपासून प्रस्थापित झालेल्या राजन पाटील अनगरकर यांच्या मजब...
04/12/2025

उमेश दादा पाटील यांच्या जिद्दीला सलाम!

मोहोळ तालुक्यात अनेक वर्षांपासून प्रस्थापित झालेल्या राजन पाटील अनगरकर यांच्या मजबूत राजकीय साम्राज्याला थेट भिडून, जिद्द, प्रामाणिकपणा आणि धडाडीच्या नेतृत्वाच्या जोरावर उमेश दादांनी दिलेली टक्कर ही ऐतिहासिक आहे.

जे बोलतो ते करून दाखवणारा नेता..

सत्तेची ताकद, पैशांची ताकद आणि दशकानुदशकं रुजलेली जुनी राजकीय यंत्रणा या सर्वांच्या विरोधात निर्भयपणे उभं राहणं हेच मोठं आव्हान.
पण हे आव्हान डोळ्यात डोळे घालून स्वीकारणारा नेता म्हणजे उमेश पाटील.

खरा नेता पदावरून मोठा नसतो;
संघर्षातून मोठा असतो आणि हे कोणतेही पद नसताना राजीनामा देऊन उमेश दादांनी सिद्ध करून दाखवलं.

अनगर येथील एक विधवा भगिनी संघर्ष करीत असतना त्या भगिनीला न्याय देण्यासाठी खंबीर असनारा नेता..

मोहोळ तालुक्यात ५० वर्षांची सत्ता हलवणारा क्षण

मोहोळमध्ये तब्बल ५० वर्षं बिनबोभाट अन्याय अत्याचार करून सत्ता गाजवणाऱ्या राजन पाटील अनगरकर गटाला आज जशी अभूतपूर्व टक्कर बसली आणि पुढे पण बसताना दिसत आहे, तशी मोहोळने कधीच पाहिली नव्हती.
वेगवेगळ्या स्टॅटर्जी आखून विरोधकाला घाम फोडणारा नेता.

पहिल्यांदा या प्रस्थापित गटाला
गल्लीबोळात फिरून मत मागावं लागलं
जे दृश्य लोकांनी कधीच पाहिलं नव्हतं.

दशकांपासून चालत आलेली मग्रूरी आणि दडपशाही
जनतेसमोर कोसळताना मोहोळने प्रथमच पाहिली.

यातून एक गोष्ट स्पष्ट झाली
नेतृत्व सक्षम पर्याय तयार करतं, घडवते आणि त्याला बळ देते!
आज मोहोळचे राजकारण एकतर्फी राहिलेलं नाही…
पर्यायाची ताकद दमदारपणे उभी राहिली आहे.

प्रस्थापित अहंकाराला दिलेलं थेट उत्तर

गेल्या दीर्घ वर्षांपासून “सत्ता आमचीच” असा अहंकार बाळगणाऱ्या
प्रस्थापितांना
मोहोळच्या जमिनीवर पहिल्यांदा कुणीतरी
धाडसानं, डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं

तो नेता म्हणजे उमेश पाटील. Umesh Patil

निवडणूक विकासावर लढवण्याऐवजी
प्रस्थापित गटाने टीका, टोलाटोली आणि आरोप प्रत्यारोपांचा आधार घेतला.

पण उमेश दादांनी रात्रीचा दिवस करून
जनतेवर झालेल्या अन्यायांची, अत्याचारांची आणि भीतीची
वस्तुस्थिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली.

मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी ठोस व्हिजन,
नवीन नेतृत्व आणि बदलाची ताकद
यावर त्यांनी आपली लढाई उभी केली.

मोहोळकर जनता ही लढाई विसरणार नाही.

मोहोळ बदलाच्या मार्गावर
आज मोहोळने दाखवून दिलं
जनता जागी झाली की
दशकानुदशकं रुजलेली सत्ता देखील डळमळते.

आता मोहोळमध्ये
पर्यायाचं राजकारण अधिक बळकट होणार,
यात कोणतीही शंका नाही.

फैसला क्या होगा वो वक्त को मंजूर है,
लेकिन संघर्ष में कोई कमी नहीं छोड़ेंगे…!

उमेश पाटील मोहोळ तालुक्याचा ढाण्या वाघ!

01/12/2025
15/11/2025

अकलूज नगरपरिषद राष्ट्रवादी स्वबळावर लढविणार…

Address

Solapur

Telephone

+919850006767

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Office of Umesh Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Office of Umesh Patil:

Share