Barshi Nagarparishad

Barshi Nagarparishad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Barshi Nagarparishad, Public & Government Service, Barshi Nagarpalika, Solapur.

25/01/2025
बार्शी नगरपरिषद, बार्शीआज दिनांक 30/09/2023 रोजी, मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री बाळासाहेब चव्हाण यांच्या सुचनेनुसार ...
03/10/2023

बार्शी नगरपरिषद, बार्शी
आज दिनांक 30/09/2023 रोजी, मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री बाळासाहेब चव्हाण यांच्या सुचनेनुसार बार्शी नगरपरिषद आणि काम फौंडेशन पुणे यांच्या सौजन्याने नगरपरिषदेच्या जगदाळे मामा समिती सभागृह येथे सफाई मित्रांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. या कार्याशाळेमध्ये सफाई मित्रांना त्यांच्या दैनंदिन काम करावयाच्या पद्धती व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर कार्यशाळेस काम फौंडेशनचे श्री प्रसन्न येवलकर, आरोग्य विभाग प्रमुख श्री शब्बीर वस्ताद, सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम, सुपरवायझर, सफाई मित्र व शहरसमन्वयक इ. उपस्थित होते.











केंद्र आणि राज्य सरकार यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त "स्वच्छता ही सेवा"...
30/09/2023

केंद्र आणि राज्य सरकार यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त "स्वच्छता ही सेवा" या अंतर्गत दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान मोहीम संपूर्ण देशात राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने बार्शी नगरपरिषदेने सुभाष नगर येथील गणेश तलाव व गाडेगाव रोड येथील राऊत तलाव परिसरामध्ये दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी आपणास जाहीर आवाहन करण्यात येते कि, आपण आपल्या मित्र- परिवारासह या स्वच्छता मोहिमेसाठी सहभागी होऊन बार्शी शहर स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करावे हि नम्र विनंती.












गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..!बार्शी नगरपरिषदेच्या वतीने गणेशोत्सव 2023 यशस्वीपणे संपन्न.शहरातील सर्व नागरि...
28/09/2023

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..!

बार्शी नगरपरिषदेच्या वतीने गणेशोत्सव 2023 यशस्वीपणे संपन्न.

शहरातील सर्व नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नगरपरिषद अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी/कर्मचारी व पत्रकार बंधू यांचे नगरपरिषदेच्या वतीने खूप खूप आभार..!












आज दिनांक 28/09/2023 अनंत चतुर्दशी व श्री गणेश विसर्जन निमित्ताने बार्शी नगरपरिषदेकडून प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. बा...
28/09/2023

आज दिनांक 28/09/2023 अनंत चतुर्दशी व श्री गणेश विसर्जन निमित्ताने बार्शी नगरपरिषदेकडून प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये 10 ठिकाणी गणपती विसर्जन पथकाची नेमणूक करण्यात आली होती. यावेळी शहरातील श्री गणेश भक्तांकडून गणेश मूर्तींचे व निर्माल्य यांचे संकलन करून नगरपरिषदेच्या गणेश तलाव जवळील गणपती विसर्जन हौदामध्ये पर्यावरण पूरक पद्धतीने श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.












आज दिनांक 28/09/2023 अनंत चतुर्दशी व श्री गणेश विसर्जन निमित्ताने बार्शी नगरपरिषदेच्या गणेश विसर्जन पथकाचे उद्घाटन बार्श...
28/09/2023

आज दिनांक 28/09/2023 अनंत चतुर्दशी व श्री गणेश विसर्जन निमित्ताने बार्शी नगरपरिषदेच्या गणेश विसर्जन पथकाचे उद्घाटन बार्शी तालुक्याचे आमदार श्री. राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी श्री. बाळासाहेब चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री. संतोष गिरीगोसावी, नगरपरिषद अधिकारी/ कर्मचारी यांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाची आरती करून करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पाचे पर्यावरण पूरक पद्धतीने कृत्रिम जलकुंडात विसर्जन करण्यात आले.












बार्शी शहरातील सर्व गणेश भक्तांना कळविण्यात येते कि, नगरपरिषदेकडून श्री गणेश मूर्ती व निर्माल्य संकलनासाठी शहरामध्ये 10 ...
27/09/2023

बार्शी शहरातील सर्व गणेश भक्तांना कळविण्यात येते कि, नगरपरिषदेकडून श्री गणेश मूर्ती व निर्माल्य संकलनासाठी शहरामध्ये 10 ठिकाणी गणेश विसर्जन पथकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी नगरपरिषदेच्या गणेश तलाव येथील कृत्रिम जलकुंडात गणपती विसर्जन करून जलप्रदूषण रोखण्यासाठी नगरपरिषदेस सहकार्य करावे.








Cracking the Code Uncover the Meaning Behind Recycling Symbols! Let's demystify those little icons on your products and ...
21/09/2023

Cracking the Code Uncover the Meaning Behind Recycling Symbols! Let's demystify those little icons on your products and embrace the power of recycling for a greener, cleaner planet.

पुनर्चक्रीकरणाच्या चिन्हांमध्ये दडलेला अर्थ जाणून घेऊ! हिरव्यागार आणि स्वच्छ पृथ्वीसाठी पुनर्वापर शक्तीचा स्वीकार करू.

सौजन्य:- Maharashtra Pollution Control Board












बार्शी नगरपरिषद, बार्शीस्वच्छता हि सेवा
20/09/2023

बार्शी नगरपरिषद, बार्शी
स्वच्छता हि सेवा










19/09/2023

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी यांनी आयोजित केलेल्या 'पर्यावरण पूरक शालेय गणेशोत्सव स्पर्धा २०२३' या स्पर्धेत इयत्ता ४ ते ८ वी च्या शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी व्हा.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उत्सवाची संपूर्ण माहिती, ५ फोटो, तुमचे नाव, पत्ता
+९१ ८६९१८१६८६७ या व्हॅट्सएप क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेल वर २७ सप्टेंबर २०२३ च्या आधी पाठवा.

चला एक संकल्प करूया, पर्यावरणपूरक गणेशोस्तव साजरा करूया.
सौजन्य :- Maharashtra Pollution Control Board

#पर्यावरण_पूरक_गणेशोत्सव
#गणपती_बाप्पा_मोरया

तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! 🌺गणपती बाप्पा मोरया!🌺
19/09/2023

तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
🌺गणपती बाप्पा मोरया!🌺

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन1.  ---- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ -----जय महाराष्ट्र वृत्त वाहि...
19/09/2023

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन

1. ---- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ -----जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी (लोगो)

पर्यावरण पूरक शालेय गणेशोत्सव स्पर्धा - २०२३
सहभागी विद्यार्थी : इयत्ता ४ ते ८ वी
आवश्यक माहिती;
विद्यार्थ्याचे नाव
पत्ता
पर्यावरणपूरक उत्सवाची संपूर्ण माहिती
५ फोटो
सहभागी होण्यासाठी संपर्क
व्हॅट्सएप क्रमांक : +९१ ८६९१८१६८६७
ईमेल आयडी : [email protected]
सहभागी होण्याचा अंतिम दिवस : २७ सप्टेंबर, २०२३

2. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ-----एबीपी माझा वृत्त वाहिनी (लोगो)

घरगुती इको फ्रेंडली स्पर्धा - २०२३
आवश्यक माहिती;
नाव
पत्ता
पर्यावरणपूरक उत्सवाची संपूर्ण माहिती
बाप्पाच्या सजावटीचे ३ फोटो
सहभागी होण्यासाठी संपर्क
ईमेल आयडी : [email protected]
सहभागी होण्याचा अंतिम दिवस : २७ सप्टेंबर, २०२३
चला तर मग आजच बाप्पाच्या चरणी संकल्प करूया, गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करूया.

Address

Barshi Nagarpalika
Solapur
413401

Telephone

18002332787

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Barshi Nagarparishad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share