15/07/2026
*राज्यातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या(NGP-5825)च्या पाठपुराव्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी घेतली सकारात्मक भुमिका*..
सविस्तर वृत्तांत असे की महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने आज दि. १४ जुलै २०२६ रोजी व गेली दोन महिन्यांमध्ये तीन ते चार वेळेस राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.ना. श्री.जयकुमार गोरे साहेब यांची त्यांच्या निवास स्थानी व मंत्रालय येथे अनेक वेळा भेटी घेतल्या.तसेच *विधान परिषदेचे उपसभापती मा. सचिन भाऊ आहेर साहेब यांनी सुध्दा ग्राम विकास मंत्री व प्रधान सचिव मा.श्री.चंद्रकांत पुलकुंडवार साहेब यांच्याशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर जवळपास एक ते दीड तास बैठक घेऊन यावर सखोल चर्चा करण्यात आली*.त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्यावर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे निष्पन झाले व
बैठकीत सर्वाधिक महत्त्वाचा विषय असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित फाईल लवकरच मंजूर होणार असल्याची माहिती विधान परिषदेचे उपसभापती सचिन भाऊ आहेर यांना व ग्रामपंचायत कामगार सेनेच्या शिष्टमंडळात दिली. त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बैठकीत प्रामुख्याने 1)ERP लॉगिन या अनेक वर्षांपासून प्रलंबित विषयावरही मंत्री महोदयांनी स्पष्ट भूमिका मांडली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन भविष्यात थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी कार्यपद्धती राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
2)वयोमर्यादा वाढल्यामुळे शासकीय सेवेत संधी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही मोठा दिलासा देताना जिल्हा परिषदेचे १०% टक्के पदभरतीमध्ये अशा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करणार असल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली.
याशिवाय,3) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अडचणीचे कारण ठरत असलेल्या वसुलीची अट आज शिथील केली परंतु या निर्णयामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना फारसा फायदा होत नसल्याचे शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री यांच्या निदर्शनात आणून दिले तरी वसुलीच्या अटीबरोबर उत्पन्नाची अटी कायम रद्द झाल्याशिवाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना फायदा होणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली त्यावर ग्रामविकास मंत्री व प्रधान सचिव यांनी सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून,ही अट रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्यात आल्याचे मंत्री महोदयांनी व सचिवानी सांगितले.
या सर्व विषयांवर तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले 4) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नवीन दरानुसार किमान वेतनातील लवकरात लवकर वाढ करण्यात यावी यावर सुद्धा चर्चा झाली माननीय मंत्री महोदय व ग्रामविकास विभागाचे सचिव यांनी कामगार विभाग यांच्याकडून नवीन दराचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाला सादर प्राप्त झाल्या बरोबर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना (NGP-5825) च्या वतीने सांगण्यात आले की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे.
राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर विविध संघटनांनी सातत्याने आश्वासने दिली; मात्र प्रत्यक्षात अपेक्षित तोडगा न निघाल्याने राज्यातील सुमारे ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना (NGP-5825) ने हे सर्व प्रश्न शासन स्तरावर ठामपणे मांडत सातत्याने पाठपुरावा केला.
आज झालेल्या बैठकीत वेतनवाढ, ERP लॉगिन, १० टक्के पदभरती, तसेच वसुली व उत्पन्नाच्या अटीसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
संघटनेच्या मते, ही केवळ एका संघटनेची नव्हे, तर राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या एकजुटीची आणि सातत्यपूर्ण लढ्याची ताकद आहे.आगामी काळात या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला न्याय मिळावा,हीच सर्व कर्मचाऱ्यांची अपेक्षा असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.यावेळी राज्यातील सुमारे ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री,मा. ना.श्री.सचिनभाऊ अहीर उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानपरिषद, मा.ना.श्री. जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.*तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यासाठी मा.आमदार प्रसाद भाऊ लाड साहेब व फिरोज भाई मासूलदार यांनी सुद्धा शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला आहे* या बैठकीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून,संघटनेने शासनाकडून लवकरच या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
या वेळी
मा.श्री.विलासभाऊ कुमरवार राज्याध्यक्ष
श्री. दयानंदजी एरंडे सरचिटणीस
श्री.नवनाथजी नरवडे मराठवाडा विभागीय अध्यक्ष
श्री.कृष्णाजी होडे जिल्हा अध्यक्ष रत्नागिरी
श्री.सतीश भाऊ मस्के जिल्हाध्यक्ष लातूर
श्री.सुरेशजी हिंगे पुणे विभागीय अध्यक्ष
श्री. गणेशजी कोळसे राज्य प्रसिद्धी प्रमुख
श्री.मंगेश विलास चिंचोलकर अध्यक्ष तालुका कोरपना
श्री.गंगाराम भाऊ जुमनाके कोषाध्यक्ष तालुका कोरपना
श्री. नंदू पावडे वरोरा सचिव
श्री. दिपेश नारकर संपर्क प्रमुख
श्री. सुशेन जाधव
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना NGP - 5825 चे इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .