06/08/2026
पाठपुराव्याला यश; मोहितेवाडी पंपहाऊसमध्ये पाणी सोडले!
उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेत शिरापूर उपसा सिंचन योजनेतून उजनी धरणाचे पाणी मोहितेवाडी पंपहाऊसमध्ये सोडण्यात आले आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, खरीप हंगामात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात चार तर दुसऱ्या टप्प्यात तीन पंप कार्यान्वित करण्यात आले असून, शिरापूर उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. यामुळे कालवा प्रणालीद्वारे नियोजनबद्ध पाणीपुरवठा होऊन उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंचनाची उपलब्धता वाढल्याने खरीप पिकांना आधार मिळेल, उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल आणि शेती अधिक सक्षम होईल.
शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून मोहितेवाडी पंपगृहातील मोटारी सुरू करून कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. उत्तर सोलापूरच्या शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचा हा प्रयत्न असून, शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढेही अशाच प्रकारे सातत्याने काम सुरू राहील.
#उत्तर_सोलापूर #मोहितेवाडी_पंप_हाऊस #शिरापूर_उपसा
Devendra Fadnavis
CMOMaharashtra
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Sunetra Ajit Pawar
Ravindra Chavan
Jaykumar Gore
BJP Maharashtra