समाज सेवेशी तत्पर

समाज सेवेशी तत्पर समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्ट

समाज सेवेशी तत्पर ट्रस्ट चा अधिकृत कार्यकर्ते बनून समाजसेवेत सहभागी व्हा 🙏
05/08/2026

समाज सेवेशी तत्पर ट्रस्ट चा अधिकृत कार्यकर्ते बनून समाजसेवेत सहभागी व्हा 🙏

🌱 वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न 🌱आज समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दांडगुरी हायस्कूल आणि जसवली ह...
11/07/2026

🌱 वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न 🌱
आज समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दांडगुरी हायस्कूल आणि जसवली हायस्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमासाठी आमचे मार्गदर्शक श्री. दशरथ कातकर सर, समाजसेवक श्री. महेश पवार साहेब (साहेबांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ वृक्ष भेट दिले), तसेच श्री. सुधीर राणे साहेब व श्री. अविनाश भाऊ पारधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
याशिवाय दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालकवर्ग आणि सर्व सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी केला.
या उपक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मनःपूर्वक आभार व हार्दिक धन्यवाद! 🙏🌿
"झाडे लावा, झाडे जगवा – पर्यावरण वाचवा." 🌳

आपले सहकार्य अपेक्षित आहे आणि या उपक्रमात आपण उपस्थित रहावे ही विनंती 🙏
02/07/2026

आपले सहकार्य अपेक्षित आहे आणि या उपक्रमात आपण उपस्थित रहावे ही विनंती 🙏

नमस्कार 🙏समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीवर्धन यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा, वेळास आगर येथील विद्यार्थ्य...
01/07/2026

नमस्कार 🙏

समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीवर्धन यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा, वेळास आगर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (वही, पेन, पेन्सिल इ.) वाटप करण्यात आले.
या उपक्रमामागील उद्देश केवळ साहित्य वाटप नसून, प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाला बळ देणे, त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणे आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा निर्माण करणे हा आहे.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हेच आमच्या कार्याची खरी पावती आहे. समाजातील प्रत्येक गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न पुढेही अविरत सुरू राहील.
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, पालक, ट्रस्टचे सर्व विश्वस्त, कार्यकर्ते, सदस्य आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.
"समाजासाठी... शिक्षणासाठी... उज्ज्वल भविष्यासाठी..."
समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्ट, वावे पंचतन
🙏 सेवाच आमची ओळख, समाजहित हाच आमचा संकल्प! 🌿📚

कु. माधुरी नथुराम पारदुले ( निरंजन वाडी, मामवली ) हिची नवी मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तिचा तिचे आई वडील आणि गावात...
11/05/2026

कु. माधुरी नथुराम पारदुले ( निरंजन वाडी, मामवली ) हिची नवी मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तिचा तिचे आई वडील आणि गावातील लोकांच्या सहकाराने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. समाजातील नवतरुणांना तसेच पालकांना आदर्शमय प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा गौरव सोहळा संपन्न झाला.
यावेळी समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री. शांताराम मोहित साहेब, विश्वस्त श्री. अजित कांबळे साहेब, ट्रस्टचे सल्लागार श्री. महादेव भुवड साहेब, सहकारी प्रमोद दादा तसेच मार्गदर्शक कातकर सर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी कु. माधुरी हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील यशस्वी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
समाजातील मुलींनी शिक्षण, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे कु. माधुरी पारदुले होय.

आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित अन्नदान उपक्रम होळीतील धुळवड (धुळीवंदन) च्या पवित्र दिवशी यशस्वीरित्या संपन्न झाला.य...
05/03/2026

आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित अन्नदान उपक्रम होळीतील धुळवड (धुळीवंदन) च्या पवित्र दिवशी यशस्वीरित्या संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत निराधार व गरजू बांधवांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम ट्रस्टचे विश्वस्त विजय येसवारे साहेब यांच्या हस्ते, तसेच ट्रस्टचे संस्थापक युवराज मोहित साहेब आणि ट्रस्टच्या विश्वस्त मंडळं आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक गावातील आशाबाईंनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः वैदेही मोहित, जिज्ञासा करंदिकर, सपना अवेरे आणि दीपाली पागडे मॅडम तसेच ट्रस्टचे स्वयंसेवक, गोखले कॉलेजचे विद्यार्थी स्मित सचिन पागडे यांचे विशेष सहकार्य लाभले.


🙏 सर्वांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला. समाजसेवेची ही वाटचाल अशीच अखंड सुरू राहो, हीच सदिच्छा.

समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्ट निराधार आणि गरजू लोकांसाठी ग्रोसरी (किराणा सामान) डोनेशन उपक्रम राबवित आहोत.या उपक्रमा...
10/02/2026

समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्ट निराधार आणि गरजू लोकांसाठी ग्रोसरी (किराणा सामान) डोनेशन उपक्रम राबवित आहोत.या उपक्रमात सामील होऊन
खालील यादीप्रमाणे यथाशक्ती ( 3 किलो, 5 किलो ) आपण सहकार्य करून उपक्रमात सहभाग घ्यावा ही विनंती 🙏

🧮 *100 किटसाठी एकूण खरेदी यादी*

तांदूळ – 300 किलो
डाळ – 100 किलो
पोहा - 100 किलो
साखर- 100 किलो
चहा पावडर- 25 किलो
हळद - 100 पाकीट
मसाला- 100 पाकीट
गोडेतेल- 100 पाकीट
खोबरेलतेल- 100 बॉटल
साबण =
आंघोळीचे - 200
कपड्याचे - 300

टिप : बजेट प्रमाणे यादी मध्ये थोडा फार बदल होऊ शकतो.

समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्ट कडून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा 💐
10/02/2026

समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्ट कडून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा 💐

नमस्कार 🙏काल रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी आपल्या समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्टच्या कॅलेंडरचे अधिकृत प्रकाशन कर...
29/12/2025

नमस्कार 🙏

काल रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी आपल्या समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्टच्या कॅलेंडरचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले. ट्रस्टचे खजिनदार श्री. दत्ताराम रामाणे साहेब आणि सल्लागार श्री. शांताराम कांबळे साहेब यांच्या हस्ते गणरायाला वंदन करून कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ट्रस्टच्या टी-शर्टचेही आणि नवीन ओळखपत्र चे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त श्री. प्रसाद पारधी, श्री. अजित कांबळे, श्री. विजय येसवारे तसेच सचिव श्री. हितेश साळवी यांनी ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेत, आपल्या अनुभवांतून समाजसेवेबाबत मनोगत व्यक्त केले. ट्रस्ट विद्यार्थ्यांसाठी, निराधार व गरजू घटकांसाठी किती आवश्यक आहे, हे त्यांनी उपस्थितांना स्पष्ट केले.
तसेच श्री. संतोष तांबे साहेब, सौ योगिता साळवी ताई यांनीही आपले मनोगत व्यक्त करून ट्रस्टच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी ट्रस्टचे संस्थापक श्री. युवराज मोहित साहेब यांनी ट्रस्टच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांचे तसेच कॅलेंडर २०२६ साठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. ट्रस्टच्या उभारणीसाठी व कार्यविस्तारासाठी ज्यांनी-ज्यांनी मोलाचे सहकार्य केले, त्या सर्वांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी कै. श्री. कृष्णा कोबनाक साहेब यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांनी केलेले सहकार्य अत्यंत मोलाचे होते, असे श्री. युवराज मोहित साहेब यांनी नमूद केले. तसेच सल्लागार श्री. महादेव भुवड,विश्वनाथ पारधी साहेब, समाजसेवक श्री. महेश पवार साहेब, उद्योजक श्री. सुधीर राणे साहेब, मा. आमदार श्री. तुकाराम सुर्वे साहेब, मा. श्री. बाबुराव चोरगे साहेब आणि मा. श्री. सुरेश मिरगळ साहेब यांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सचिव हितेश साळवीनी कार्यक्रमाचा समारोप केला. तसेच वेळोवेळी समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय सेवेत रक्तपुरवठा करणाऱ्या प्रतिष्ठानांच्या रक्तदान शिबिरात ट्रस्टचे सदस्य सक्रियपणे सहभागी होऊन रक्तदान करण्यात आले.त्यामध्ये स्वयंसेवक कुमार. मिनेश विजय येसवारे दादांनी प्रथमच रक्तदान करून कौतुकास्पद समाजसेवा केली.

धन्यवाद!!!

नमस्कार 🙏इयत्ता दहावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. चालू वर्षी परीक्षांमध्ये हॉलोक्राफ्ट व बारकोड...
02/12/2025

नमस्कार 🙏

इयत्ता दहावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. चालू वर्षी परीक्षांमध्ये हॉलोक्राफ्ट व बारकोड ही नवी प्रणाली असल्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका भरताना थोडा गोंधळ होण्याची शक्यता असते.

या पार्श्वभूमीवर समाज सेवेशी तत्पर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी उत्तरपत्रिका वाटप करण्यात आल्या तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Address

Srivardhan
402110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when समाज सेवेशी तत्पर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category