20/08/2026
देवेंद्रजींची जलयुक्त ते जलसंजीवनी… जलदूतच
जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ ला मंजुरी!
देवेंद्रजी फडणवीस यांची २०१४-२०१९ पर्यंत दोन महत्वकांक्षी प्रकल्प होते
१) मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष
२) जलयुक्त शिवार अभियान
पहील्या योजनेतून लाखो लोकांना मोफत उपचार देऊन सामान्य लोकांना जीवदान देण्यात त्यांना यश आले… लाखो लोकांच्या आशिर्वादाची संपत्ती त्यांच्या पाठीशी आहे…
२) जलयुक्त शिवार अभियान राबवून भूगर्भातील पाणी पातळीत प्रचंड वाढ करत लाखो शेतकरी समृद्ध करण्याची लिलया त्यांनी करूनच दाखविली…
दि १८.०८.२६ रोजी घेतलेल्या कॅबिनेट बैठकीत मराठवाड्यातील महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पाना ६४७७ कोटी रूपयाचा निधी उपलब्ध केला. ह्या महत्वपूर्ण निर्णयामुळे मराठवाडयातील ५ जिल्ह्यांमध्ये १३१६५२ हेक्टर क्षेत्र सिंचन होणार आहे..
मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांतील १,३१,६५२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
₹६,४७७.८८ कोटींच्या पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी
मंत्रिमंडळ बैठकीत जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ साठी ₹६,४७७.८८ कोटींच्या पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळणार आहे.
प्रकल्पात काय समाविष्ट?
* ४५४ द.ल.घ.मी. साठवण क्षमतेचे माजलगाव धरण
* माजलगाव (लोणी सावंगी) उपसा योजना
* साळींबा ठिबक उपसा सिंचन योजना
* शिरस मार्ग निम्नपातळी बंधारा
* रोशनपुरी उच्चपातळी बंधारा
* १४८ किमी लांबीचा माजलगाव उजवा कालवा
* गल्हाटी, धोंड, उकडगांव, मुरंबी, पेंडू व सुभाषनगर हे ६ मार्गस्थ जलाशय
* माजलगाव मासोळी प्रकल्पाची उंची वाढविण्याचे काम
१,३१,६५२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
पैठण उजवा कालवा
* छत्रपती संभाजीनगर – १,७३२ हेक्टर
* अहिल्यानगर – १,६९० हेक्टर
* बीड – ३८,२६० हेक्टर
एकूण – ४१,६८२ हेक्टर
माजलगाव उजवा कालवा
* बीड – २९,१०५ हेक्टर
* परभणी – ४४,४०८ हेक्टर
* नांदेड – ११,३३७ हेक्टर
एकूण – ८४,८५० हेक्टर
साळींबा ठिबक उपसा सिंचन योजना
* बीड – ५,१२० हेक्टर
एकूण सिंचन लाभ
१,३१,६५२ हेक्टर
कामांसाठी निधी
* पैठण उजवा कालवा – ₹८६०.२३ कोटी
* माजलगाव धरण (उर्वरित कामे) – ₹१,२२३.४५ कोटी
* माजलगाव उजवा कालवा – ₹४,३९४.२० कोटी
मराठवाड्याच्या शेतीला नवी जीवनदायी दिशा!
सिंचनाचा विस्तार • शेतकऱ्यांना दिलासा • शेतीच्या समृद्धीला बळ
Devendra Fadnavis
CMOMaharashtra