29/03/2023
महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या स्वच्छतोत्सव २०२३ उपक्रमांतर्गत तासगाव नगरपालिकेच्या वतीने बुधवारी २९ मार्च रोजी तासगाव शहरांमध्ये प्रभाग निहाय स्वच्छता मशाल मार्च रॅली काढण्यात आली. सदर स्वच्छता मशाल मार्च रॅली तासगाव नगरपरिषद प्रशासक समीर शिंगटे साहेब , तासगाव नगर परिषद मुख्याधिकारीसो पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यालय अधीक्षक श्वेता कुंडले मॅडम यांच्या सूचनेनुसार सकाळी 8:30 ते 10:00 या वेळेत सिद्धेश्वर चौक ते बस स्टॅन्ड, बस स्टँड ते गणपती मंदिर, गणपती मंदिर ते जोशी गल्ली, जोशी गल्ली ते तासगाव नगरपरिषद या मार्गावरून स्वच्छ मशाल फेरी पार पाडली. या रॅलीमध्ये शून्य कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि कचरा मुक्त शहरांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी स्वच्छता शपथ घेण्यात आल्या. या रॅलीचे नियोजन आरोग्याधिकारी आयुब मनेर, शहर समन्वयक सुहास करळे यांनी केले. या रॅलीमध्ये सामाजिक संस्था, नागरिक, पदाधिकारी, शाळेचे विद्यार्थी तसेच स्वच्छता कर्मचारी असे 442 जणांनी सहभाग घेतला.
, ,