Thane against Domestic Violence

Thane against Domestic Violence This is group of protection officers , and stakeholders in dist thane who works under domestic violence act 2005. pls help us to help u.

any aggrieved woman can directly approach us for reliefs . let's pledge to stop the violence and break the silence .

21/01/2022

13/11/2021

मा. कर्जत न्यायालय यांचे आदेश घेऊन पिडीत महिला दिनांक 11/11/2021 रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय ठाणे अधिनस्त संरक्षण अधिकारी कार्यालय मुरबाड येथे आली. संरक्षण अधिकारी श्री युवराज वडेकर यांनी त्याच दिवशी दिनांक 11/11/2021 रोजी धानिवली ता. मुरबाड येथे पोलीस स्टेशन मुरबाड यांच्या सहाय्याने पिडीत महिलेस तिच्या कागदपत्रांचा ताबा देऊन मा. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून पिडीत महिलेस सहाय्य केले.







02/11/2021

दि. 27/10/2021 रोजी मा. भुसावळ न्यायालय यांनी पिडीत महिलेस व तिच्या मुलीस घराचा ताबा मिळण्याचा आदेश दिला सदर चा आदेश टपाल मार्फत पाठवण्यात वेळ वाया न घालवता संबंधित भुसावळ संरक्षण अधिकारी श्री. पाटील सर स्वतः दि.27/10/2021 रोजी रात्री निघाले व दि. 28/10/2021 रोजी सकाळी 10 वाजता आदेश व महिलेस घेऊन संरक्षण अधिकारी कल्याण यांच्या कार्यालयात आले तद्नंतर संबंधित संरक्षण अधिकारी श्रीमती. बच्छाव मॅडम यांनी सदर अर्ज अनुषंगाने खडकपडा पोलीस स्टेशन यांना पत्र देऊन प्रकरण सांगितले मा. पोलीस निरीक्षक श्री. झिगे सर यांनी अगदी त्यांची रोज ची कामे बाजूला ठेऊन अगदी मनापासून मार्गदर्शन केले सदर पत्त्यावर महिले सोबत कल्याण, व भुसावळ येथील संरक्षण अधिकारी तसेच सहाय्यक श्री मंगेश जेजुरकर तसेच पोलीस कर्मचारी गेले मात्र प्रतिवादीचे घर बंद असल्याचे आढळून आले नंतर पुन्हा सर्व कर्मचारी पोलीस स्टेशन येथे आले व सदर प्रतिवादीस श्री. चौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी फोन करून पोलीस स्टेशन ला येण्यास सांगितले मात्र प्रतिवादी मी बाहेर आहे संध्याकाळी 5 ला येतो असे सांगितले तरी देखील सदर प्रतिवादी हजर झाले नाही बराच कालावधी गेला सर्व थांबून वाट बघत राहिलो यावरून असे लक्षात आले प्रतिवादी सदर कामात टाळाटाळ करीत आहे
त्यानंतर संरक्षण अधिकारी कल्याण श्रीमती . बच्छाव यांनी शेवटचा प्रयत्न करावा या उद्देशाने फोन करून बघितला व सदर आदेश आपण पालन नाही केले तर आपण कोर्ट आदेश चे अवमान करत आहात असे कोर्टाला कळवण्यात येईल असे प्रतिवादी यांना सांगितले ते ऐकून प्रतिवादी येण्यास तयार झाले
संबंधित प्रतिवादी रात्री 8 वाजता पोलीस स्टेशन येथे दाखल झाले पोलीस अधिकारी व संरक्षण अधिकारी यांनी शांततेत प्रतिवादी यांना आदेशाबाबत समजावले पुन्हा पूर्ण टीम रात्री 9 वाजता महिलेस घरी सोडण्यास गेली
अशा प्रकारे महिलेस मा. भुसावळ न्यायालय यांच्या आदेशानुसार घराचा ताबा देण्यात आला यामध्ये पोलीस कर्मचारी, संरक्षण अधिकारी श्रीमती बच्छाव तसेच सहाय्यक श्री मंगेश जेजुरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.






दिनांक २९/१०/२१ रोजी मा. जिलहाधिकारी राजेशजी नारवेकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार कळवा- मुंबरा भागामधील भटके, रस्त्याव...
31/10/2021

दिनांक २९/१०/२१ रोजी मा. जिलहाधिकारी राजेशजी नारवेकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार कळवा- मुंबरा भागामधील भटके, रस्त्यावर वसतु विकनारी बालके यांना २०२०-२१ कोविड कालावधीत रेशन वाटप करनयात आले होते . त्यावेळेस केलेया पाहणीतून या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे नागरिकत्व शाबीत करनारे शासकीय पुरावे नाहीत , मुले शिक्षण न घेतां दिवसभर भटकेन, भिक मागणे, पालक कचरा वेचने काही महिला देह विक्रय सारखे काम करत आहेत असे दिसुन आले. याबाबत मा. जिलहाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करुन या लोकांची माहीती घेतली असतां जवळपास १५०/१८० कुटुंब आढळून आली. त्या कुटुबांतील बालकाना राष्ट्रीय बाल मजदुर अभियाना अंतर्गत शिक्षण योजना सुरु करनयास यश मिळाले.पुढचा भाग म्हणजे या कुटुंबाना शासकीय ओळख मिळवेन त्यासाठी अहिरेसाहेब जिलहा उपनियंतरक शिधावाटप ठाणे यांचयाशी संपर्कसाधुन वस्तुस्थिती सांगितली असतां बाल संरक्षण कक्ष ठाणे यांनी केलेल्या सर्वेक्षण ग्राह्य मानुन या कुटुंबाना शिधा पत्रिका देनयाचे मान्य केले. तयानुसार आज मा.बाल कल्याण समिती ठाणे, सामाजिक कार्यकर्ते खान यांच्या उपस्थितीमधे शिधापत्रिका वाटप करनयात आले. या शिधापत्रिका घेताना लाभार्थ्यांना अश्रु अनावर झाले होते. सर्वांनी मा. राजेशजी नारवेकर साहेब, जिलहाधिकारी ठाणे यांचे आभार मानले.



23/10/2021


कल्याण प्रतिनिधी (संजय कांबळे) कल्याण -समाजात वाढत असलेल्या भिक्षेकरी प्रथेस आळा घालून त्यांना स्वतः च्या पायावर...

दिनांक 17/10/2021 रोजी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालय, ठा...
18/10/2021

दिनांक 17/10/2021 रोजी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सापगाव ता. शहापूर जिल्हा ठाणे येथे विधी सेवा शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ठाणे कार्यालय यांच्यामार्फत कौटुंबिक हिंसचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, सखी सेंटर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष इ कायदे व योजनांबाबत सर्व सामान्यांना माहिती देण्यात आली व त्यासंदर्भात पत्रके वाटण्यात आली. सदर कार्यक्रमाला मा. न्यायमूर्ती श्री अ. अ. सय्यद साहेब वरिष्ठ न्यायाधीश उच्च न्यायालय, मुंबई व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मा. श्री राजेश नार्वेकर साहेब जिल्हाधिकारी ठाणे, मा. श्री दिनेश सुराणा सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व मा. श्री अनिल पानसरे मुख्य न्यायमूर्ती जिल्हा सत्र न्यायालय ठाणे व अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे इ मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोविड मध्ये एक पालक गमावलेल्या बालकाला बाल संगोपन योजने अंतर्गत प्रती महिना 1,100/- रुपये एवढे अनुदान मंजूर करण्यात आले असून त्याचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पासबुक चे वितरण करण्यात आले.






दिनांक 15/10/2021 रोजी के. बी. पी. महाविद्यालय, वागळे इस्टेट  येथे राजे संस्कार प्रतिष्ठान, ठाणे यांच्या मार्फत आयोजित क...
16/10/2021

दिनांक 15/10/2021 रोजी के. बी. पी. महाविद्यालय, वागळे इस्टेट येथे राजे संस्कार प्रतिष्ठान, ठाणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या सत्कार नवदुर्गाचा या कार्यक्रमात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयामार्फत राबवल्या जाणार्‍या योजना तसेच कौटुंबिक हिंसाचार कायद्याची माहिती संरक्षण अधिकारी श्रीमती. रेखा हिरे यांनी दिली.



08/03/2021










दिनांक - 28/10/2020 रोजी mat. Kashiben motilal patel college of commerce and science thakuri ( east ) या कॉलेजने आयोजित ...
28/10/2020

दिनांक - 28/10/2020 रोजी mat. Kashiben motilal patel college of commerce and science thakuri ( east ) या कॉलेजने आयोजित वेबिनार मध्ये महिलांचे व बालकांचे कायदे या विषयावर रिसोर्स पर्सन म्हणुन श्रीम. निकिता नांदुरकर यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 ची व श्रीम आशा सूर्यवंशी यांनी पॉकसो ऍक्ट व कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ याविषयी माहिती दिली. सदर कार्यक्रममध्ये 100 विद्यार्थी जॉईन होते.


आज दिनांक २६/१०/२०२० रोजी कायद्याच्या अमंलबजावणीची सुरूवात होऊन १४ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वांगणी येथे घरेलु क...
26/10/2020

आज दिनांक २६/१०/२०२० रोजी कायद्याच्या अमंलबजावणीची सुरूवात होऊन १४ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वांगणी येथे घरेलु कामगार युनियन संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमात कौटुंबिक हिंसाचारा पासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ बाबत माहिती देण्यात आली. तसेच सखी केंद्र व बालसंगोपन योजना बाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रमास श्रीमती संजीवनी नांगरे मॅडम ( समन्वयक घरेलू कामगार युनियन ) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




Sharda Education Society’s Anand Vishwa Gurukul College of Law, Thane Legal Aid Clinic for Women, in co-ordination with ...
17/07/2020

Sharda Education Society’s Anand Vishwa Gurukul College of Law, Thane Legal Aid Clinic for Women, in co-ordination with District Legal Services Authority, Thane, organizes a webinar on “Understanding the Challenges Faced and Success Stories in Responding to Domestic Violence Cases during COVID - 19 lockdown” on “Saturday, 18th July, 2020 at 11:30 am.”

Participants should Register at:

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdYba-ZZ4lHsd3-z0bVgGAsIAcfqMZDs4cplydaS4WdgE9tng/viewform

Last Date for Registration: 17th July 2020 before 7:00 pm

E-certificates shall be provided to all the registered participants only if they attend the webinar and submit the feedback form.

Link will be shared with all registered participants only if they attend the webinar and submit the feedback form.

Link for the webinar will be shared with the registered candidates only, one day prior to the Webinar

In case of any queries, you may WhatsApp only on the following numbers:

+91 9819340610
+91 87672 50161
+91 97699 83352

We look forward for your participation

Address

Thane
400602

Telephone

+912225330752

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thane against Domestic Violence posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Thane against Domestic Violence:

Share