09/08/2026
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागील ५ वर्षापासून अंबिका नगर (प्रभाग क्र. १७) येथील आरोग्य समस्या व आरोग्य सुविधांचा अभाव या कारणांसाठी कित्येक वर्षांपासून पडीक व्यायामशाळेच्या जागेवर आरोग्य केंद्र किंवा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे बाबत स्थानिक नगरसेवक व ठाणे महानगरपालिकेस निवेदन/ पत्रव्यवहार करीत मागणी करीत आहोत. परंतु सुचविलेल्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम होत असल्याचे निदर्शनास येताच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्य विभागास विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची मंजुरी सदर बांधकामास मिळाल्याची अद्यापही पुष्टी मिळाली नाही. लोकोपयोगी असलेल्या कोणत्याही जागेवर अतिक्रमण होऊ देणार नाही, याबाबत वंचित बहुजन आघाडी कटिबध्द असून संबंधित विभागाने चौकशीअंती योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती करीत आहोत. ✊✊
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Jayashri Mahendra Shinde Balasaheb Ambedkar Sujat Ambedkar Sarvjeet Bansode
राजू नारायण डावरे
सचिव-ठाणे शहर