28/01/2016
महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रामध्ये कामावर असलेल्या संघटीत व असंघटीत अशा सर्व कामगार बंधू व भगिनींना मी असे कळवू इच्छितो की, आपल्या मुलभूत गरजांबाबत तसेच कामावर असलेल्या कामगार व व्यवस्थापन यांच्याशी निगडीत अशा अडीअडचणींबाबत आपली गाऱ्हाणी सरकारी तसेच निमसरकारी संस्थापुढे मांडण्यासाठी आपली एक संघटना असणे आवश्यक आहे.
अशी संघटना आपण स्थापन केली तर त्या संघटनेमार्फत आपण आपले निरनिराळे प्रश्न तडीस नेऊ शकतो. तसेच आपल्या परिसरात असणारे आपले असंख्य कामगार बंधू व भगिनींना त्यांच्या कामाच्या ठिकाणी होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी संघटनेमार्फत प्रयत्न करता येतील.
सदर संघटनेमध्ये कामगारांविषयी आपुलकी असणाऱ्या इतर नागरिकांनाही व उद्योजकांनाही सहभागी करून घेता येईल.
या बाबतीत सविस्तर माहितीसाठी या पेजला लाईक करून मेसेज मध्ये आपला मजकूर लिहावा........
या संघटनेचा सभासद बनण्यासाठी पुढील प्रमाणे माहिती पाठवून द्यावी....
नाव : ( संपूर्ण नाव लिहा.... )
राहण्याचा पत्ता : ( आता तुम्ही राहत असलेला सविस्तर पत्ता )
कायमचा पत्ता : ( उदा. जो आधार कार्ड, रेशनकार्ड, किंवा मतदान कार्डावर असेल तो. )
शिक्षण : ( जे असेल ते )
कामाचा पत्ता : ( ऑफिस, किंवा तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणाचा )
टेलीफोन नं. : ( असेल तर नसेल तरी चालेल )
मोबाइल नं. : ( असणे जरुरी आहे )
धन्यवाद आपला
विश्वासू
संतोष पवार
टीप : माहिती मेसेज बॉक्स मधीलच स्वीकारली जाईल.......