09/05/2023
कौशल्य, रोजगार ,उद्योजगता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठाणे वागळे इस्टेट मार्फत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रमात ठाणे शहरातील तरुण मुला-मुलींना करिअर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन कोकण पदवीधर विद्यार्थी संघांचे आमदार ॲड. मा.श्री. निरंजन डावखरे यांच्या हस्ते पार पडला. शिबिरात ठाणे उपजिल्हाधिकारी मा. श्री. गोपीनाथ ठोंबरे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वागळे इस्टेट ठाणे प्राचार्या श्रीमती माने मॅडम, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी ठाणे श्री. जाधव साहेब, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी पालघर श्री. सिद्दाम साहेब, लाईफ कोच श्रीमती पवित्रा सावंत, माजी वायू सेना अधिकारी श्री. उतेकर साहेब, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक श्री. विमलेश शिरकर, अण्णासाहेब पाटील महामंडळचे ठाणे जिल्हा समन्वयक श्री. साहिल मुल्ला, MCC यंग प्रोफेशनल श्री. आशुतोष साळी व अन्य मान्यवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
Thane Rojgar Life Coach Pavitra