Block No 8 Thana City Central Congress Committee.

Block No 8 Thana City Central Congress Committee. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Block No 8 Thana City Central Congress Committee., Political organisation, Thana Congress Central Office, Thane.

26/10/2025
रबोडीमध्ये उंदरांचा हैदोस; अॅड. जावेद शेख यांची तत्काळ कारवाईसाठी ठाणे महापालिकेकडे तक्रारठाणे – रlबोडी परिसरात उंदरांचा...
05/10/2025

रबोडीमध्ये उंदरांचा हैदोस; अॅड. जावेद शेख यांची तत्काळ कारवाईसाठी ठाणे महापालिकेकडे तक्रार

ठाणे – रlबोडी परिसरात उंदरांचा प्रचंड उपद्रव वाढला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रबोडीमधील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना उंदरांनी चावा घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. रlबोडी जनरल कब्रस्तान, बापूजी नगर, क्रांती नगर आणि रुस्तमजी या भागांमध्ये उंदीर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. काही ठिकाणी ५ ते १० मजल्यांपर्यंत उंदरांचा उपद्रव झाल्याची माहिती मिळाली आहे.

रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये व कार्यालयांमध्येही उंदीर घुसून मालसामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूर्वीही ब्लॉक क्रमांक ८ चे अध्यक्ष अॅड. जावेद शेख यांनी ठाणे महानगरपालिकेकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर पुन्हा दिनांक ३०/०९/२०२५ रोजी देखील तक्रार दाखल करण्यात आली; मात्र आजपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही.

या पार्श्वभूमीवर ठाणे काँग्रेसचे नेते अॅड. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नागरिक रस्त्यावर उतरतील, अशी माहिती अॅड. जावेद शेख यांनी दिली आहे. उंदरांच्या चावण्यामुळे कोणी जखमी झाले, तर त्यास ठाणे महानगरपालिका जबाबदार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे

Address

Thana Congress Central Office
Thane
400601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Block No 8 Thana City Central Congress Committee. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share