NCP Youth Thane District

NCP Youth Thane District official Account NCP Youth Congress Thane District NA

आज ठाणे येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष ...
28/03/2022

आज ठाणे येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांनी भेट घेऊन कुशिवली गावात तनिष स्टोन क्रशर कंपनी असून कंपनीच्या स्फोटामुळे कुशिवली गावांतील मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या शेकडो ग्रामस्थांच्या घरांना तडे पडले आहेत. तसेच विहिरी व बोरिंगचे पाणी पूर्णपणे नाहीसे झाले आहे. त्यामुळे गावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

या विषयावर जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांनी पत्र दिले. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांनी लगेचच अंबरनाथ तहसीलदार माने मॅडम यांना संपर्क साधून क्रशर कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावर तहसीलदार यांनी सांगितले की, क्रशर कंपनी बंद करण्यासाठी शासनास अहवाल दिला आहे. तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी तहसीलदारांना कुशिवली गावाची पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

Jayant Patil - जयंत पाटील Ajit Pawar Nationalist Congress Party - NCP Supriya Sule Jitendra Awhad

महाराष्ट्रात कबड्डी हा खूप लोकप्रिय असा खेळ आहे .आदरणीय पवार साहेबांनी कबड्डी या खेळाला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून...
09/03/2022

महाराष्ट्रात कबड्डी हा खूप लोकप्रिय असा खेळ आहे .आदरणीय पवार साहेबांनी कबड्डी या खेळाला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून दिली. अशाच प्रकारे पावार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष सुधीर दादा पाटील कल्याण मधील अनेक कबड्डी संघना कुठलाही गाजावाजा मोठेपणा न मिरवता मदत करत असतात.

कल्याण शहरातील कल्याण कबड्डी युवा संघ येणाऱ्या काळात जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धामध्ये उतरण्यासाठी कसून सराव करीत आहेत. येणाऱ्या काळात हा संघ कल्याणचे नाव देश पातळीवर गाजवेल. राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण डोंबिवली चे जिल्हा आध्यक्ष सुधिर दादा वंडारशेठ पाटील यांचे सहकारी कू कल्पेश अशोक अहिरे यांच्या तर्फे कल्याण युवा कबड्डी संघातील सर्व खेळाडूंना

जिल्हाध्यक्ष सुधीर दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टी शर्ट वाटप करून त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी राकेश आंधळे, चेतन पाठक, सुमित पाटील उपस्थित होते.

Ajit Pawar Jayant Patil - जयंत पाटील Supriya Sule Sudhir Vandarsheth Patil Nationalist Congress Party - NCP

आपल्या मधुर स्वरांनी करोडोंच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानकोकिळा,भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...
06/02/2022

आपल्या मधुर स्वरांनी करोडोंच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानकोकिळा,भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !🙏💐

*राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न...*     आज ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बै...
08/01/2022

*राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न...*

आज ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक ठाणे येथे पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील ६ महानगरपालिका व १८ विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांच्यासोबत येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकी संदर्भात संघटनात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख यांनी युवकांना मार्गदर्शन करताना युवक हाच उद्याच्या समाजाचे नेतृत्व करणारा घटक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी पक्षात आणून आपले विचार त्यांच्यामार्फत सामान्य जनतेपर्यंत पोहोवले पाहिजे. तसेच महेबुबभाई शेख यांनी माझ्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्ह्यात जोमाने काम करेल असा विश्वास देखील व्यक्त केला.
तसेच ठाणे जिल्हा निरीक्षक अभिषेक बोके साहेब यांनी मार्गदर्शन करताना युवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्याचबरोबर आगामी काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आता काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पक्षश्रेष्ठी युवकांना मोठ्या संख्येवर सहभागी करून पक्ष मोठी जबाबदारी आपल्या युवकांना देण्यात येणार आहे, युवक लोकप्रतिनिधी उद्याच्या समाजाचा विकास अधिक जलदगतीने करतील असा विश्वास वाटतो. त्यामुळे आपण सर्वांनी आता या नवीन वर्षाच्या पहिल्याच बैठकीत संकल्प करून कामाला लागले पाहिजे. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सोबत मी तळागाळात जाऊन काम करणार आहे. आपल्या सर्वांच्या साथीमुळे नक्कीच ठाणे जिल्ह्यात युवक संघटना उभारी घेईल,असे मत या बैठकीमध्ये मी मांडले.
याप्रसंगी ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, नवी मुंबई अध्यक्ष अनु आंग्रे, मीरा-भाईंदर अध्यक्ष साजिद पटेल, भिवंडी अध्यक्ष आसिफ शेख, प्रदेश सरचिटणीस बिरू वाघमारे, प्रमोद सरोदे, कल्याण डोंबिवली समन्वयक प्रशांत नगरकर, विश्वास आव्हाड, उल्हासनगर अध्यक्ष नरेश साळवे आदी ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.
Nationalist Congress Party - NCP Sharad Pawar Ajit Pawar Jitendra Avhad Fans Mahebub Shaikh
Supriya Sule Jayant Patil - जयंत पाटील

१९६७ मध्ये ओडिशामध्ये इंदिरा गांधी प्रचाराला गेल्या होत्या. प्रचारसभेत एकाने त्यांच्यावर दगड भिरकावला. त्यात त्यांना मार...
07/01/2022

१९६७ मध्ये ओडिशामध्ये इंदिरा गांधी प्रचाराला गेल्या होत्या. प्रचारसभेत एकाने त्यांच्यावर दगड भिरकावला. त्यात त्यांना मार लागला होता. मात्र त्या तेथून वापस गेल्या नाहीत. लोकांच्या रोषाला सामोरे गेल्या. त्यांचा राग ऐकून घेतला आणि त्यांची समजूत काढली होती.

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Youth Thane District posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share