Namrata Bhosale-Jadhav

Namrata Bhosale-Jadhav Official page of Namrata Bhosale-Jadhav.
(1)

लोकनेते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🚩आज वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जयंती. या...
27/01/2026

लोकनेते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🚩

आज वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जयंती. या निमित्ताने शक्तिस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

साहेबांनी आपल्याला शिकवले की ‘सत्ता ही केवळ समाजकारणाचे साधन आहे.’ सामान्यांपर्यंत धावून जाणे, अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहणे आणि “२०% राजकारण व ८०% समाजकारण” या सूत्राची अंमलबजावणी करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. साहेबांनी दाखवलेल्या लोकसेवेच्या मार्गावर चालण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.


आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. १८ तसेच प्रभागातील आनंद कृपा सोसायटी , आनंद कृपा टॅावर...
26/01/2026

आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. १८ तसेच प्रभागातील आनंद कृपा सोसायटी , आनंद कृपा टॅावर, परम टॅावर, हजुरी जनसंपर्क कार्यालय , शिवसेना शाखा सुर्वेवाडी, रघुनाथ नगर , गौतम नगर व सेवालाल नगर येथे ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी शालेय चिमुकल्यांशी संवाद साधला आणि विविध क्षेत्रांतील सन्माननीय व्यक्तींचा यथोचित सत्कारही करण्यात आला.

वैयक्तिक कारणास्तव माझे सहकारी नगरसेवक श्री. विकासजी रेपाळे उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

देशाचा भविष्यकाळ असणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील चमक बघून एक वेगळीच ऊर्जा मिळाली.
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा मन:पूर्वक

शुभेच्छा!
जय हिंद! जय महाराष्ट्र! 🚩



#शिवसेना #विकासरेपाळे #युवासेना

माघी गणपती उत्सवाच्या निमित्ताने नगरसेविका सौ. मिनल संख्ये  व प्रभागातील कार्यकर्त्यांच्या घरी तसेच आत्पेष्टांकडे जाऊन ग...
24/01/2026

माघी गणपती उत्सवाच्या निमित्ताने नगरसेविका सौ. मिनल संख्ये व प्रभागातील कार्यकर्त्यांच्या घरी तसेच आत्पेष्टांकडे जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतला.
गणपती बाप्पाच्या कृपेने प्रभागातील नागरीकामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचा संकल्प आज मी केला.
🚩🙏 गणपती बाप्पा मोरया!🙏🏻 🚩




#शिवसेना #विकासरेपाळे #युवासेना


19/01/2026

चौकार, षटकारांची आतिषबाजी आणि तरुणाईचा जल्लोष!

साईकृपा सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शानदार क्रिकेट स्पर्धेला मी आणि माझ्या सहकारी सौ. नम्रता भोसले- जाधव यांनी उपस्थिती लावली. मैदानावरील खेळाडूंचा उत्साह आणि स्थानिक रहिवाशांचा कल्ला पाहून मन प्रसन्न झाले.

खेळाडूंना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी अशी हक्काची व्यासपीठे उपलब्ध होणे, ही काळाची गरज आहे. आमच्या प्रभागातील या उगवत्या ताऱ्यांचा खेळ पाहून खात्री पटली की, आपल्याकडे प्रतिभेची कमतरता नाही.

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धेत हिरीरीने सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूचे मनःपूर्वक अभिनंदन! आपण असेच खेळत राहा आणि प्रभागाचे नाव उज्ज्वल करा.


#प्रभाग१९

भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा संगम! 'जागृती सार्वजनिक माघी गणेशोत्सव' मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून बाप्...
19/01/2026

भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा संगम!

'जागृती सार्वजनिक माघी गणेशोत्सव' मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून बाप्पाच्या मंडप पूजनात सहभागी झाले. आपल्या संस्कृतीतील हे सण आणि उत्सव समाजाला एकत्र आणण्याचे काम करतात. मंडळाच्या सर्व सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेले नियोजन खरोखरच कौतुकास्पद आहे.

#नावात_नम्रता_पण_कामात_वाघ #प्रभाग१९

लोकसंस्कृती आणि स्नेहसंमेलनाचा आनंद! 'मुंबई नागाव मंडळ-महाड' यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनास उपस्थित राहून सर...
19/01/2026

लोकसंस्कृती आणि स्नेहसंमेलनाचा आनंद!

'मुंबई नागाव मंडळ-महाड' यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनास उपस्थित राहून सर्व उपस्थितांशी संवाद साधला. साठेवाडी येथील गणेश गल्ली येथे पार पडलेल्या सोहळ्यात नागरिकांचा उत्साह आणि आपुलकी मनाला स्पर्शून गेली.

तसेच, आकांक्षा अश्विन अंगत यांच्या हळदी-कुंकू समारंभास उपस्थित राहून महिला भगिनींशी संवाद साधला आणि सण-उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. आपल्या सर्वांचे हे प्रेम आणि विश्वासच मला सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा देतो.

#नावात_नम्रता_पण_कामात_वाघ #प्रभाग१९

जनतेचे आशीर्वाद!आज प्रभागातील माझ्या लाडक्या माता-भगिनी आणि नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून जे मला व माझे सहकारी श्री. विकास ...
18/01/2026

जनतेचे आशीर्वाद!

आज प्रभागातील माझ्या लाडक्या माता-भगिनी आणि नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून जे मला व माझे सहकारी श्री. विकास कृष्णा रेपाळे यांना आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी आपली सदैव ऋणी राहीन. नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर तुमची ही आपुलकीची भेट मला अधिक जबाबदारीने काम करण्याची ऊर्जा देऊन गेली.

#नावात_नम्रता_पण_कामात_वाघ #प्रभाग१९

मैदानावर पुन्हा एकदा तरुणाईचा कल्ला! साईकृपा सोसायटीमध्ये पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आज स्थानिक खेळाडू ...
18/01/2026

मैदानावर पुन्हा एकदा तरुणाईचा कल्ला!

साईकृपा सोसायटीमध्ये पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आज स्थानिक खेळाडू आणि रहिवाशांशी मी आणि माझे सहकारी श्री. विकास कृष्णा रेपाळे यांनी संवाद साधला. आपल्या प्रभागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन होणे कौतुकास्पद आहे.

विजेत्यांचे आणि सहभागी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन!

#नावात_नम्रता_पण_कामात_वाघ #प्रभाग१९

जनतेची साथ, जनतेचा विश्वास!नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आज प्रभागातील नागरिकांनी आणि विशेषतः माझ्या माता-भगिनींनी माझ...
18/01/2026

जनतेची साथ, जनतेचा विश्वास!

नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आज प्रभागातील नागरिकांनी आणि विशेषतः माझ्या माता-भगिनींनी माझी व माझे सहकारी श्री. विकास कृष्णा रेपाळे यांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. त्यांचे हे प्रेम आणि विश्वास पाहून मनाला खूप आनंद झाला. हे यश माझे एकटीचे नसून, प्रभाग १९ मधील माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचे आहे.

#नावात_नम्रता_पण_कामात_वाघ #प्रभाग१९

ऋणानुबंधाच्या गाठी आणि हळदीकुंकवाचा सण!साठेवाडीतील माता-भगिनींच्या उत्साहात सहभागी होता आले, याचा मनस्वी आनंद आहे. या स्...
18/01/2026

ऋणानुबंधाच्या गाठी आणि हळदीकुंकवाचा सण!

साठेवाडीतील माता-भगिनींच्या उत्साहात सहभागी होता आले, याचा मनस्वी आनंद आहे. या स्नेहसोहळ्याबद्दल सर्व भगिनींचे मनापासून आभार!

#नावात_नम्रता_पण_कामात_वाघ #प्रभाग१९

सौभाग्याचा सण, आपुलकीचा सोहळा! धर्मवीर नगर येथे आयोजित हळदीकुंकू समारंभाला उपस्थित राहून सर्व माता-भगिनींशी संवाद साधला....
18/01/2026

सौभाग्याचा सण, आपुलकीचा सोहळा!

धर्मवीर नगर येथे आयोजित हळदीकुंकू समारंभाला उपस्थित राहून सर्व माता-भगिनींशी संवाद साधला. आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारा हा सोहळा आणि तुमचं हे प्रेम पाहून मन भरून आलं.

#नावात_नम्रता_पण_कामात_वाघ #प्रभाग१९

Address

Thane
400604

Telephone

+919967602222

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Namrata Bhosale-Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Namrata Bhosale-Jadhav:

Share

Category