Shreerang Ganeshotsav Mandal

Shreerang Ganeshotsav Mandal नमस्कार...
श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ
Founded in the year 1971, at Shreerang Society, Thane

श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव २०२६ या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी दिलेल्या उस्फूर्...
20/03/2026

श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव २०२६ या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. गुढी पाडवा व नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा !!

या दीपोत्सवाचा प्रारंभ भाजप महाराष्ट्र सरचिटणीस सौ. माधवी संजय नाईक, ठाण्याचे उपमहापौर श्री. कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेविका सौ. नंदा कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेवक श्री. दीपक जाधव आणि श्रीरंग वृंदावन परिसरातील मान्यवर यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांबरोबर तरुणाईचा सुद्धा उत्साह पाहायला मिळाला. श्रीरंग सहनिवास गणेशोत्सवातर्फे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या”सीड बॉम्ब” या प्रकल्पाला १० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मान्यवरांना मंडळाकडून एक स्मृतिचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे स्वरमधुर म्युझिकल ग्रुप यांनी सादर केलेली कराओके गाणी. या गाण्यांनी कार्यक्रमात अजून रंगत आणली.
कार्यक्रमास श्री. अशोक समेळ तसेच राबोडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक, श्री.हेमंत पाटील सर, श्री. संजय तरे, सौ. माहेश्वरी तरे, श्री. विक्रांत तावडे श्री. किरण जोशी, श्री. सुमित सुर्वे, श्री. मिलिंद साटम यांनी विशेष शुभेच्छा दिल्या.

गणपती बप्पा मोरया !! मंगलमूर्ती मोरया !!



Maharashtra Pollution Control Board
Pramod Sawant Vikrant Chandrahas Tawde Milind Satam Sumeet Surve Shreerang Ganeshotsav Mandal Brindavan Ganesh Utsav Mandal, Thane Harshada Chavan Chandrahas Tawde Niraj Khopkar Lalita Malli Varsha Kamat

Address

Shreerang Vidyalaya, Shreerang Society
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreerang Ganeshotsav Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shreerang Ganeshotsav Mandal:

Share