Niranjan Davkhare

Niranjan Davkhare MLC Vidhan Parishad, Maharashtra State | General Secretary, BJP, Maharashtra | President of Samanvay Pratishthan | Ex-BJP Thane President
(1)

Advocate Niranjan Vasant Davkhare, is a MLC, Vidhan Parishad, Maharashtra State, represents the Konkan Graduate Constituency. He studied at Symbiosis School in Pune and graduated from Mulund College of Commerce in the year 2000. His inborn ability to get others to willingly follow, got him unanimous support from the students council and led to his appointment as the General Secretary of the Mulund

College of Commerce Academic year 1999-2000. Adv Niranjan V Davkhare has done his Law Graduation from Government Law College. Shri Niranjan Davkhare is known in the Political and Social circle to be one of the most modest and temperate Youth striving to bring about a refreshing change. We Define Niranjan As:
N-atural
I- ntelligent
R-esponsible
A-lert
N-eighborly
J-oking
A-ccessible
N-everending

ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण बैठक! ठाणे शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील प्रस...
04/09/2026

ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण बैठक!

ठाणे शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील प्रस्तावित ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात लोकप्रतिनिधी आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक संपन्न झाली.

या बैठकीत प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा, प्रकल्पाच्या मार्गिकेखालील डी.पी. रस्ते, मेट्रो कारशेडसाठी आवश्यक क्षेत्राचे संपादन तसेच प्रकल्पाच्या पुढील अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. ठाणे शहराच्या भविष्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करणारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प वेळेत आणि प्रभावीपणे मार्गी लागावा, यासाठी आवश्यक बाबींवर विचारविनिमय केला.

यावेळी परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक, खासदार श्री. नरेश म्हस्के, ठाणे शहर आमदार श्री. संजय केळकर, आमदार ॲड. माधवीताई नाईक, महापौर शर्मिला पिंपळोळकर, उपमहापौर श्री. कृष्णा नाईक, नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

📍 ठाणे
🗓️ ४ सप्टेंबर २०२६

04/09/2026
काँग्रेसकडून २.६% विकासदराचा दावा करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अधिकृत आकडेवारीचा संदर्भ घेतला तर...
04/09/2026

काँग्रेसकडून २.६% विकासदराचा दावा करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अधिकृत आकडेवारीचा संदर्भ घेतला तर भारताची अर्थव्यवस्था मजबूत वेगाने पुढे जात असल्याचे स्पष्ट होते. उत्पादन, निर्यात, गुंतवणूक, वाहनविक्री आणि औद्योगिक क्षेत्रातील वाढ ही देशाच्या आर्थिक प्रगतीची ठोस उदाहरणे आहेत.

खोटा प्रचार नव्हे, तर वस्तुनिष्ठ आकडेवारीच जनतेसमोर यायला हवी!

ठाणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गतिमान करणाऱ्या वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित ...
04/09/2026

ठाणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गतिमान करणाऱ्या वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीस आज उपस्थित राहून प्रकल्पाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली.

ठाणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाच्या मार्गिका, भूसंपादन, मेट्रो कारशेड तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

यावेळी चेंदणी कोळीवाडा कोळी समाज अध्यक्ष श्री. अमरीश ठाणेकर, श्री. सचिन ठाणेकर, श्री. निशिकांत कोळी, श्री. आनंद कोळी, श्री. संदीप ठाणेकर, आर्किटेक्ट असोसिएशन च्या वतीने आर्किटेक्ट श्री. संदीप प्रभू आणि आर्किटेक्ट श्री. मकरंद तोरस्कर उपस्थित होते.

ठाणे शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि नागरिकांना जलद, सुरक्षित व सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

📍 ठाणे
🗓️ ४ सप्टेंबर २०२६

04/09/2026
भारतीय जनता पक्ष, ठाणे शहर (जिल्हा) पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ व आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने आयोजित करण...
04/09/2026

भारतीय जनता पक्ष, ठाणे शहर (जिल्हा) पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ व आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडी महोत्सव २०२६च्या तयारीची आज पाहणी केली.

गेली २१ वर्षे सातत्याने सुरू असलेल्या या दहीहंडी महोत्सवाने यंदा २२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदाचा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात होणार असून मराठी व हिंदी लोकनृत्यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम, ‘मानाची दहीहंडी’ फोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी ₹१,११,१११ रोख पारितोषिक व आकर्षक चषक, तसेच निवृत्त सैनिकांचा विशेष सन्मान ही यंदाची प्रमुख आकर्षणे आहेत.

यावेळी संस्थापक श्री. रमेश आंब्रे तसेच मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

📍ठाणे
🗓️ ४ सप्टेंबर २०२६



ठाणे (पूर्व) येथील कोपरी कॉलनी परिसरात  SRA प्रकल्पांतर्गत नीलकंठ एंटरप्रायझेसच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या गृहसंकुलाच्य...
04/09/2026

ठाणे (पूर्व) येथील कोपरी कॉलनी परिसरात SRA प्रकल्पांतर्गत नीलकंठ एंटरप्रायझेसच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या गृहसंकुलाच्या गणेश पूजन व भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी ठाणेकर परिवार, विष्णू मंजुळा ठाणेकर सहकारी गृहसंस्था, कमिटी व सदस्य तसेच नीलकंठ एंटरप्रायझेसचे भागीदार श्री. राजेंद्र साळवी, श्री. नितीन पाटील आणि श्री. हर्षद साळवी यांच्यासह उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. आधुनिक जीवनशैली, गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि सुविधांनी परिपूर्ण असा हा प्रकल्प परिसराच्या विकासात निश्चितच सकारात्मक भर घालेल, असा विश्वास व्यक्त केला.

श्रीगणेशाच्या कृपेने या प्रकल्पाचे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होवो आणि भविष्यात अनेक कुटुंबांच्या सुखी, सुरक्षित व समृद्ध जीवनाचे स्वप्न साकार होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

📍 ठाणे
🗓️ ४ सप्टेंबर २०२६

दृष्टीची काळजी, संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्यसेवेला नवी दिशा देणाऱ्या ‘शेखर आय रिसर्चच्’या उद्घाटन ...
04/09/2026

दृष्टीची काळजी, संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्यसेवेला नवी दिशा देणाऱ्या ‘शेखर आय रिसर्चच्’या उद्घाटन सोहळ्यास आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला.

अत्याधुनिक नेत्रसेवा, संशोधन व नवोन्मेष, प्रशिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या केंद्रामुळे ठाणे व परिसरातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होईल. दृष्टी, विज्ञान आणि संवेदनशीलतेच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा!

📍 ठाणे
🗓️ ४ सप्टेंबर २०२६

04/09/2026
जिल्हा परिषद ठाणे आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक गुणवंत पुरस्कार सोहळा २०२६-२७ या कार्यक्रमास आज उपस्थित राहून शिक्षण क्षेत्...
04/09/2026

जिल्हा परिषद ठाणे आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक गुणवंत पुरस्कार सोहळा २०२६-२७ या कार्यक्रमास आज उपस्थित राहून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात सहभागी झालो.

यावेळी ठाणे शहराचे आमदार श्री. संजय केळकर, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणजित यादव, नगरसेवक श्री. विकास पाटील तसेच शिक्षक वृंद व अन्य मान्यवर यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानदानासोबतच संस्कार, मूल्ये आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी आहे. शिक्षकांच्या योगदानाला प्रोत्साहन देत त्यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या अशा उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्राला निश्चितच नवी ऊर्जा मिळते.

📍 ठाणे
🗓️ ४ सप्टेंबर २०२६

Address

Giriraj Heights, Hari Niwas Circle
Thane
400602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Niranjan Davkhare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Niranjan Davkhare:

Shortcuts

Share