Shabda Maniche.

Shabda Maniche. HII Friends this is my page i m not a poet but give me more replies as well as feedback to me for more Growth in my poems... M Waiting

तुला काहीच क्षण सोबत घालवायचे असतात नी मला संपूर्ण आयुष्य..!!--ज्योत
26/03/2018

तुला काहीच क्षण
सोबत घालवायचे
असतात नी मला
संपूर्ण आयुष्य..!!
--ज्योत

तुझ्या स्पर्शाने मोहरते तुलाच येउन बिलगतेओढ़च तुझी अशी कीमीचं माझी न रहाते...--ज्योत
26/08/2017

तुझ्या स्पर्शाने मोहरते
तुलाच येउन बिलगते
ओढ़च तुझी अशी की
मीचं माझी न रहाते...
--ज्योत

22/08/2017

प्रतिबिंब माझे न्याहाळते
तुझ्या बोलक्या डोळ्यात..

माझीचं "मी" न राहीले
हलकेच तु हसता मनात..

--ज्योत

16/08/2017

तु तीथे मी इथे जगतो आहोतच दोघेही
पण त्या जगण्यालाही कहीं अर्थ नाहीं
कारण तुझ्या वाट्याला आलाय तो प्राजक्त
अन् मी इथे झुरतो त्या निवडुंगा सारखा विरक्त..
--ज्योत
#ज्योति नरळकर

सगळ काही सांगायलाच हव अस काही नसतं... पण प्रत्येक गोष्ठ तु समजुन घेशील इथेच मन फसतं...--ज्योत
23/05/2017

सगळ काही सांगायलाच हव
अस काही नसतं...
पण प्रत्येक गोष्ठ तु समजुन घेशील
इथेच मन फसतं...
--ज्योत

आज जन्माला आलय तुझं नी माझं नातं पारदर्शी ... साक्षिदार आहेच तो चांदवा अन सप्तर्षि ...
26/04/2017

आज जन्माला आलय तुझं नी माझं नातं पारदर्शी ... साक्षिदार आहेच तो चांदवा अन सप्तर्षि ...

23/03/2017

ओरखडा तु दिलेल्या जखमेचा
अजुनही ओला होत आहे ..

रक्ताळलेल्या आठवणींमुळे
पुन्हा पुन्हा तो वाहतो आहे ..
--ज्योत

तुझ्या अस्तित्वाची फुले अजुनही इथे गंधाळत असतात.. अन् माझ्या कोमेजलेल्या मनाला तुझ्या असण्याचा आभास करुन जातात..--ज्योत
12/02/2017

तुझ्या अस्तित्वाची फुले
अजुनही इथे गंधाळत असतात..
अन् माझ्या कोमेजलेल्या मनाला
तुझ्या असण्याचा आभास करुन जातात..
--ज्योत

प्रिय कान्हा तुझ्या प्रेमाची सावळ बाधा झाली आहे रे...
27/11/2016

प्रिय कान्हा तुझ्या प्रेमाची सावळ बाधा झाली आहे रे...

19/10/2016
प्रेम म्हणजे नक्की काय ? लग्न करुन एकत्र रहाणं की दूर राहुन दोघांची मनं जुळणं..         प्रेम म्हणजे नक्की काय ? मी इथे ...
16/10/2016

प्रेम म्हणजे नक्की काय ?
लग्न करुन एकत्र रहाणं की
दूर राहुन दोघांची मनं जुळणं..

प्रेम म्हणजे नक्की काय ?
मी इथे तुझाच विचार करावा
अन तुला त्याचा सुगावा लागावा..

प्रेम म्हणजे नक्की काय ?
मी तुझ्या सोबत असणं की,
मी समोर नसताना तुझे मला मिस करणं

प्रेम म्हणजे नक्की काय ?
तु हृदयातुन आर्त साद घालावी
अन् मला इथे उचकी लागावी..

प्रेम म्हणजे तुझ्या नजरेंत मी
स्वतःला पहावे आणि लाजेन
चूर चूर व्हावे..

ए सांग ना रे प्रेम म्हणजे नक्की काय ?
-ज्योत

Address

Thane

Telephone

8698302293

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shabda Maniche. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category