Vishwajit Shrirang Barne

Vishwajit Shrirang Barne Corporator, Pimpri Chinchwad Municipal Corporation |
Secretary, Yuva Sena (W.

Maharashtra)
Committed to modern development and public service for a smart, progressive city.

शिवसेनेच्यावतीने भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन; दिव्यांग बांधवांनाही मिळणार रोजगाराची संधी - विश्वजीत बारणे
20/08/2026

शिवसेनेच्यावतीने भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन; दिव्यांग बांधवांनाही मिळणार रोजगाराची संधी - विश्वजीत बारणे

19/08/2026

युवकांच्या रोजगारासाठी एक मोठा संकल्प… आता प्रत्यक्षात!

पिंपरी-चिंचवड शहरातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आयोजित ‘भव्य नोकरी मेळावा २०२६’ ची आज पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करण्यात आली.

यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांशी नोकरी मेळाव्याची संकल्पना, त्यामागील उद्देश आणि नियोजनाबाबत संवाद साधला.

युवकांच्या हाताला काम आणि त्यांच्या कर्तृत्वाला योग्य संधी मिळावी, हाच या उपक्रमामागचा केंद्रबिंदू!

#शिवसेना #पिंपरीचिंचवड #भव्यनोकरीमेळावा #रोजगार #युवाशक्ती #विश्वजीतबारणे

18/08/2026

प्रभाग क्र. २४ मधील विकासकामांचा आढावा

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत प्रभाग क्र. २४ मधील विविध विकासकामांबाबत बैठक पार पडली.

प्रभागातील सुरू असलेली व प्रस्तावित विकासकामे, त्यांची सद्यस्थिती तसेच पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कामांना आवश्यक गती देऊन नागरिकांशी संबंधित विकासकामे वेळेत मार्गी लावण्यावर यावेळी भर देण्यात आला.

याप्रसंगी नगरसेवक निलेश दादा बारणे उपस्थित होते.

#विश्वजीतबारणे #श्रीरंगआप्पाबारणे #निलेशबारणे #प्रभाग२४ #विकासकामे

15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्याचा अभिमान… राष्ट्राप्रती कृतज्ञतेचा दिवस!

स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन, क्रांतिवीर चाफेकर खिवंसरा पाटील शाळा, श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था दत्तनगर, शिव कॉलनी–गणेशनगर वाकड रोड, १९ ग्रँड वेस्ट सोसायटी तसेच भक्ती-शक्ती येथे आयोजित ध्वजवंदन सोहळ्यांना उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

विविध ठिकाणी नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ आणि तरुणांच्या उपस्थितीत साजरा झालेला स्वातंत्र्याचा उत्सव हा आपल्या समाजात रुजलेल्या राष्ट्रप्रेमाची सुंदर अनुभूती देणारा होता.

स्वातंत्र्याचा अभिमान मनात, राष्ट्रहिताचा संकल्प कृतीत! 🇮🇳

जय हिंद! 🇮🇳

#स्वातंत्र्यदिन #ध्वजवंदन #राष्ट्राभिमान #पिंपरीचिंचवड #विश्वजीतबारणे

13/08/2026

📍 संत तुकाराम महाराज पादुका झाड मंदिर, वाकसई
‘शिवसेना आपल्या दारी’ गावागावात संघटन, घराघरात शिवसेना! 🚩
मावळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक व्यापक आणि मजबूत करण्याच्या निर्धाराने ‘शिवसेना आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ संत तुकाराम महाराज पादुका झाड मंदिर, वाकसई येथून करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे ,जिल्हा संघटक अंकुश देशमुख ,तालुकाप्रमुख रामभाऊ सावंत युवासेना लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे ,युवा सेना उपजिल्हाप्रमुख दत्ताभाऊ केदारी, युवा सेना तालुकाप्रमुख विशाल लोखंडे ,शिवसेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, नवनाथ हरपुडे,मदन शेडगे, धनंजय नवघणे,विभागप्रमुख सहादू बडेकर,शहरप्रमुख संजय भोईर,सतिश इंगवले,विशाल पाठारे,मनिषा भांगरे,मंगेश हुलावळे, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच शिवसैनिकांच्या उपस्थितीत आगामी संघटनात्मक वाटचालीबाबत सविस्तर चर्चा झाली.
आता बैठकांपुरते मर्यादित न राहता प्रत्येक गावात पोहोचायचे, स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांशी थेट संवाद साधायचा, नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यायचे आणि गावपातळीवरील संघटन अधिक सक्षम करायचे, हा या अभियानामागचा स्पष्ट संकल्प आहे.

#शिवसेनाआपल्यादारी #शिवसेना #मावळविधानसभा #संघटन #विश्वजीतबारणे

📍 संत तुकाराम महाराज पादुका झाड मंदिर, वाकसई‘शिवसेना आपल्या दारी’ गावागावात संघटन, घराघरात शिवसेना! 🚩मावळ विधानसभा मतदार...
13/08/2026

📍 संत तुकाराम महाराज पादुका झाड मंदिर, वाकसई

‘शिवसेना आपल्या दारी’ गावागावात संघटन, घराघरात शिवसेना! 🚩

मावळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक व्यापक आणि मजबूत करण्याच्या निर्धाराने ‘शिवसेना आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ संत तुकाराम महाराज पादुका झाड मंदिर, वाकसई येथून करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे ,जिल्हा संघटक अंकुश देशमुख ,तालुकाप्रमुख रामभाऊ सावंत युवासेना लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे ,युवा सेना उपजिल्हाप्रमुख दत्ताभाऊ केदारी, युवा सेना तालुकाप्रमुख विशाल लोखंडे ,शिवसेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, नवनाथ हरपुडे,मदन शेडगे, धनंजय नवघणे,विभागप्रमुख सहादू बडेकर,शहरप्रमुख संजय भोईर,सतिश इंगवले,विशाल पाठारे,मनिषा भांगरे,मंगेश हुलावळे, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच शिवसैनिकांच्या उपस्थितीत आगामी संघटनात्मक वाटचालीबाबत सविस्तर चर्चा झाली.

आता बैठकांपुरते मर्यादित न राहता प्रत्येक गावात पोहोचायचे, स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांशी थेट संवाद साधायचा, नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यायचे आणि गावपातळीवरील संघटन अधिक सक्षम करायचे, हा या अभियानामागचा स्पष्ट संकल्प आहे.

YuvaSena - युवासेना Shivsena - शिवसेना Purvesh Parisha Pratap Sarnaik 🇮🇳 Shrirang Appa Barne Dr. Shrikant Lata Eknath Shinde Eknath Shinde - एकनाथ शिंदे
#शिवसेनाआपल्यादारी #शिवसेना #मावळविधानसभा #संघटन #विश्वजीतबारणे

एक तस्वीर, एक मुलाक़ात, और आगे बढ़ने की नई प्रेरणा।🇮🇳 Narendra Modi Shrirang Appa Barne
10/08/2026

एक तस्वीर, एक मुलाक़ात, और आगे बढ़ने की नई प्रेरणा।🇮🇳 Narendra Modi Shrirang Appa Barne

रस्त्यांची दुर्दशा आणि धोकादायक पुलांवर विश्वजीत बारणे यांचा पाठपुरावा; प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
07/08/2026

रस्त्यांची दुर्दशा आणि धोकादायक पुलांवर विश्वजीत बारणे यांचा पाठपुरावा; प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

06/08/2026

🗓️ ६ ऑगस्ट २०२६
📍 पिंपरी-चिंचवड

डांगे चौक - दत्त मंदिर (वाकड पोलीस स्टेशन) मार्गावरील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजनांसाठी बैठक

दत्त मंदिर (वाकड पोलीस स्टेशन) मार्गावरील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी गंभीर समस्या बनत आहे. वाढती लोकसंख्या, निवासी प्रकल्प, आयटी क्षेत्र आणि दैनंदिन वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे.

याच अनुषंगाने निलेश दादा बारणे, पिंपरी चिंचवड BRTS प्रमुख श्री. सुनील पवार, Consultants आणि Architects यांच्यासमवेत सविस्तर बैठक घेऊन विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत दत्त मंदिर मार्गावरील चौकाचे रुंदीकरण तसेच औंध–रावेत मार्गाला जोडणारा नवीन बायपास विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या माध्यमातून वाहतुकीचा ताण कमी करून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

YuvaSena - युवासेना Shivsena - शिवसेना
#विश्वजीतबारणे

🗓️ ६ ऑगस्ट २०२६📍 पिंपरी-चिंचवडडांगे चौक - दत्त मंदिर (वाकड पोलीस स्टेशन) मार्गावरील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजनां...
06/08/2026

🗓️ ६ ऑगस्ट २०२६
📍 पिंपरी-चिंचवड

डांगे चौक - दत्त मंदिर (वाकड पोलीस स्टेशन) मार्गावरील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजनांसाठी बैठक

दत्त मंदिर (वाकड पोलीस स्टेशन) मार्गावरील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी गंभीर समस्या बनत आहे. वाढती लोकसंख्या, निवासी प्रकल्प, आयटी क्षेत्र आणि दैनंदिन वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे.

याच अनुषंगाने निलेश दादा बारणे, पिंपरी चिंचवड BRTS प्रमुख श्री. सुनील पवार, Consultants आणि Architects यांच्यासमवेत सविस्तर बैठक घेऊन विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत दत्त मंदिर मार्गावरील चौकाचे रुंदीकरण तसेच औंध–रावेत मार्गाला जोडणारा नवीन बायपास विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या माध्यमातून वाहतुकीचा ताण कमी करून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

𝐍𝐢𝐥𝐞𝐬𝐡 𝐇𝐢𝐫𝐚𝐦𝐚𝐧 𝐁𝐚𝐫𝐧𝐞 🇮🇳 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
YuvaSena - युवासेना Shivsena - शिवसेना
#विश्वजीतबारणे PimpriChinchwad

Address

Thergaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwajit Shrirang Barne posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category