19/08/2026
धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, #श्री_संजयमामा_निंबाळकर यांचा शिवसेना UBT पक्षामध्ये जाहिर प्रवेश.
मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते संजयमामा निंबाळकर, भाजपचे रामेश्वर शेटे, रामभाऊ पडवळ, अतुल बागल, भीमराव साळुंखे, शिवशंकर शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये बबन सुरवसे, नानासाहेब जमदाडे, बाळासाहेब नरवडे, कृष्णा पवार, शेषेराव राठोड, प्रकाश पडवळ, महेश पडवळ, सुरेश गंगावणे, प्रदीप सूर्यवंशी, श्रीहरी माळी, रामा जंगाले, हरीश सुरवसे, नरसिंग जगताप, दौलत गाढवे, गणेश गडकर, विलास वीर, तानाजी भोपे, व्यंकट धाराव, रमेश गादेकर, अनिल बागल, रणजीत वरपे, मारुती शिंपले, किरण खोसे, अश्रूबा गाढवे, रमेश कोळगे, गणेश सावळकर, संदीप झांबरे, औदुंबर कोल्हे, जयंत पाटोळे, विश्वजित पडवळ, मनोज घोगरे यांचा समावेश आहे..
जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणारी विचारधारा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे नेतृत्व आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या शिवसेनेवर विश्वास व्यक्त करत या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे..
यावेळी यावेळी जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलासदादा पाटील, आमदार प्रवीण स्वामी, सहसंपर्क प्रमुख मकरंद (नंदुभैय्या) राजेनिंबाळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते..
#पक्ष_प्रवेश