01/09/2026
आज दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ रोजी येरली या गावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कार्याध्यक्ष मा.प्रफुलभाई पटेल,राज्यसभा सदस्य मा.राजेंद्रजी जैन व तुमसर - मोहाडी क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.राजु भाऊ कारेमोरे यांच्या मार्गदर्शनात येरली जिल्हा परिषद क्षेत्र आढावा बैठक विधानसभा अध्यक्ष मा.देवचंदजी ठाकरे यांच्या नेतृत्वात ग्रा.पं.येरली उपसरपंच डॉ.श्री.सुनीलजी पटले यांच्या निवासस्थानी घेण्यात आली.
या आढावा बैठक निमित उपस्थिती दिली व मार्गदर्शन केले.
या आढावा बैठकीत पक्ष एकजुट संबंधित मार्गदर्शन करण्यात आले व येरली जि.प.क्षेत्रात प्रत्येक गावात बूथ संबंधित चर्चा करण्यात आली.तसेच या आढावा बैठक निमित तहसील कार्यालय,पंचायत समिती,रुग्णालय व इतर संबंधित येणाऱ्या लोकांचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत करण्याचे मार्गदर्शन उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता गण यांना करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष श्री.उमेशजी तुरकर,ओबीसी सेल अध्यक्ष श्री.राजकुमारजी माटे, मा.जि.प.सभापती श्रीमती रेखा ताई ठाकरे, मा.जि.प.सदस्य श्री.सुरेशजी रहांगडाले,मा.जि.प.सदस्य श्री.विठ्ठलजी रहमतकर, ग्रा.पं.येरली सरपंच श्री.मदनजी भगत,ग्रा.पं.डोंगरला सरपंच श्रीमती मीना ताई रहांगडाले, ग्रा.पं.सीतेपार सरपंच श्रीमती भारती ताई बंसोड, मा.सरपंच श्री.गजानन भाऊ लांजेवार, मा.पं.स.सदस्य श्री.यादोरावजी पटले,जेष्ठ नेते श्री. गोसाईजी भगत,येरली सोसायटी अध्यक्ष श्री.राजेंद्रजी भगत व गावकरी गण उपस्थित होते.