11/07/2026
📢 घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
आदरणीय नगरवासीयांनो
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात शहरामध्ये काही चुकीची माहिती व गैरसमज पसरविले जात आहेत. त्यामुळे वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडणे आवश्यक आहे.
घनकचरा व्यवस्थापनाचा विद्यमान करार सुमारे दोन महिन्यांपूर्वी संपलेला आहे. नवीन निविदा (टेंडर) प्रक्रिया वेळेत सुरू करण्यासाठी करार संपण्यापूर्वीपासूनच नगर परिषदेमध्ये माननीय नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मासिक सभांमध्ये सातत्याने विषय मांडण्यात आला होता. मात्र, मागील तीन महिन्यांपासून मासिक सभा होऊ न दिल्यामुळे या विषयावर आवश्यक निर्णय घेता आला नाही. जर त्या सभा वेळेत झाल्या असत्या, तर नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागला नसता.
अलीकडेच नगराध्यक्षांनी विशेष सभा घेऊन या अत्यावश्यक विषयाला मंजुरी देण्यात आली असून घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे.
सध्या काही व्यक्ती विनाकारण बदनामी करण्याच्या उद्देशाने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही आंदोलनांमागेही वैयक्तिक स्वार्थ असल्याची वस्तुस्थिती नागरिकांनी लक्षात घ्यावी. संबंधित जुन्या कंत्राटाची मुदत संपलेली असून. न.प. लवकरच सर्व समस्येचे निराकरण करण्याच्या प्रयत्न करेल.
*यासोबतच नागरिकांनी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी की, संबंधित कंत्राटदाराचा करार सुमारे दोन महिन्यांपूर्वीच संपलेला आहे. सध्या त्या कंत्राटदाराकडे घनकचरा व्यवस्थापनाचे कोणतेही वैध कंत्राट अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत नगर परिषदेसमोर आंदोलन करून त्या कंत्राटदारासंदर्भात मागण्या करणे अथवा त्याच्याकडून कोणत्याही अपेक्षा ठेवणे व्यवहार्य नाही आणि यात नगर परिषदेचा काही संबंध नाही*
*नगर परिषदेची भूमिका केवळ नियमानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राट देण्यापुरती मर्यादित असते. त्यानंतर संबंधित कंत्राटदार आपल्या व्यवस्थापनानुसार कर्मचारी नियुक्त करणे, त्यांचे कामकाज व इतर प्रशासकीय बाबी हाताळतो. त्या निर्णयांची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते*
*त्यामुळे कराराची मुदत संपल्यानंतरही त्याच विषयावर आंदोलन करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी वस्तुस्थिती सर्व नगरवासीयांनी लक्षात घ्यावी. कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण