21/03/2026
देऊळवाडी येथे कै. त्र्यंबकआप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीर तर्फे आयोजित भव्य सर्व रोग निदान तपासणी शिबिर उत्साहात संपन्न 🙏
या शिबिरामध्ये तब्बल ३९२ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. जनरल मेडिसिन, ऑर्थोपेडिक (हाडांचे आजार), स्त्रीरोग, बालरोग, दंत तपासणी अशा विविध विभागांतील तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची सखोल तपासणी करण्यात आली.
रक्तदाब, शुगर, हाडांचे आजार, महिलांचे आरोग्य, लहान मुलांचे आजार तसेच दंत समस्या यांसारख्या विविध आजारांवर तपासणी करून प्रत्येक रुग्णाला योग्य मार्गदर्शन व आवश्यक औषधोपचार देण्यात आले.
गाव भागात एकाच ठिकाणी इतक्या विविध तपासण्या व उपचारांची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला व शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या यशस्वी उपक्रमासाठी सर्व तज्ञ डॉक्टर, मान्यवर व सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार 🙏
आपल्या पाठबळामुळेच आम्हाला समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करता येत आहे. पुढेही प्रतिष्ठानतर्फे असे उपक्रम सातत्याने राबविले जातील 👍