23/10/2024
दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सरकारी इमारती आणि सार्वजनिक मालमत्ता असलेल्या ठिकाणचे सुमारे 5,21,000 पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, कटआऊट आणि वॉल पेंटिंग हटवण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या काळात होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्स इ. लावण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांची / आस्थपनांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडून हटवले जातील, त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यासाठी cVIGIL हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे.
cVIGIL अॅप डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या
Android: https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil
ios: https://apps.apple.com/in/app/cvigil/id1455719541