सेवास्पर्श फाऊंडेशन उंब्रज महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Umbraj
  • सेवास्पर्श फाऊंडेशन उंब्रज महाराष्ट्र

सेवास्पर्श फाऊंडेशन उंब्रज महाराष्ट्र समाजकार्यासाठी तत्पर l माणुसकी जिवंत आहे
सेवास्पर्श फाऊंडेशन उंब्रज,महाराष्ट्र

मनःपूर्वक आभार! 🙏❤️तळवडे येथे आढळून आलेल्या फुलाबाई आजी अखेर त्यांच्या नातेवाईकांना सुखरूप भेटल्या असून त्यांना सुरक्षित...
06/07/2026

मनःपूर्वक आभार! 🙏❤️

तळवडे येथे आढळून आलेल्या फुलाबाई आजी अखेर त्यांच्या नातेवाईकांना सुखरूप भेटल्या असून त्यांना सुरक्षितपणे पुणे, देहू येथून त्यांच्या घरी नेण्यात आले आहे.

ही आनंदाची बातमी म्हणजे सोशल मीडियाच्या ताकदीचे जिवंत उदाहरण आहे. पोस्ट शेअर होताच अनेकांनी ती पुढे पाठवली. आजींचे माहेर मसूर-निगडी असल्यामुळे गावातील नातेवाईकांच्या नजरेस ही पोस्ट पडली. त्यांनी तात्काळ पुण्यातील कुटुंबीयांना माहिती दिली आणि अवघ्या तीन-चार तासांत आजी आपल्या माणसांपर्यंत पोहोचल्या.

गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. आजींची मुलगी आणि नातू त्यांची अतिशय प्रेमाने व काळजीपूर्वक देखभाल करतात. दोघेही दिवसभर कामावर गेल्यानंतर आजी चुकून घराबाहेर पडल्या आणि हरवल्या होत्या.

ही घटना एका गोष्टीची जाणीव करून देते.सोशल मीडियाचा योग्य आणि जबाबदारीने वापर केला, तर अनेक कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्याचे मोठे काम होऊ शकते.

ही पोस्ट शेअर करणारे, फोन करून माहिती देणारे, शोधकार्य करणारे आणि प्रत्येक प्रकारे मदतीचा हात पुढे करणारे सर्व मित्र, नागरिक, नातेवाईक आणि शुभचिंतक यांचे मनःपूर्वक आभार! 🙏

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे एका कुटुंबाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला.धन्यवाद! ❤️

सेवास्पर्श फाऊंडेशन उंब्रज.

01/07/2026

तो थोडा डिप्रेशन मध्ये होता.
त्याला मुली आहेत.
वाघोली गाव आहे.
पैसे देऊ का तर नको म्हटला.
जेवण नको म्हटला.
दारू पिलेला नव्हता.
तरुण आणि काम करून खाईल असा होता पण टेन्शन मध्ये असल्याने, घरी कोणीतरी त्याची वाट बघत असेल असे वाटले म्हणून त्याला गाडीला बसवून दिले.
देव त्याला योग्य रस्ता दाखवेल अशी प्रार्थना.
सेवास्पर्श फाऊंडेशन उंब्रज

Address

Umbraj Tal. Karad , Dist. Satara
Umbraj
415109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सेवास्पर्श फाऊंडेशन उंब्रज महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category