Sanjay Khodke - A Vision.

Sanjay Khodke - A Vision. General Secretary - Nationalist Congress Party मा . संजय विनायकराव खोडके अमरावती पदवीधर मतदारसंघाची प्रथम पसंती.

*मजीप्रा कंत्रादारांची थकीत देयकांसाठी १४.६६ कोटीची रक्कम मजीप्राच्या एसबीआय खात्यात जमा* *आ.संजय खोडके यांच्या प्रयत्ना...
19/05/2026

*मजीप्रा कंत्रादारांची थकीत देयकांसाठी १४.६६ कोटीची रक्कम मजीप्राच्या एसबीआय खात्यात जमा*

*आ.संजय खोडके यांच्या प्रयत्नाने मजीप्रा कंत्राटदारांना मोठा दिलासा*

*अमरावती(प्रतिनिधी )दिनांक -१८ मे अमरावती अमरावती जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने मागील वर्षभरापासून रखडलेल्या कामांच्या देयकांसाठी अखेर १४ कोटी ६६ लाखांची रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावतीच्या एसबीआय बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या बाबत महाराष्ट्र विधान परिषद आमदार संजय खोडके यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असल्याने मजीप्रा कंत्राटदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमरावती जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने मागील वर्ष २०२५-२०२६ च्या १५.३१ कोटींची देयके मागील वर्षभरापासून रखडली असल्याने कंत्राटदारांनी मजीप्रा कार्यालयावर आंदोलन पुकारले होते. सतत आठवडाभर आंदोलन करण्यात आल्याने मजीप्राची कामे प्रभावित होऊन अमरावती शहरातील पाणी पुरवठा सुद्धा विस्कळीत होण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान गेल्या १४ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी मजीप्रा कंत्राटदारांच्या काम बंद आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील कंत्राटदारांनी केलेल्या कामांचे मोबदले गेल्या एक वर्षापासून शासनाकडे थकीत होते. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने कंत्राटदार बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत संपाचे हत्यार उपसले होते. 'आम्ही केलेल्या कामाचे हक्काचे पैसे आम्हाला मिळावेत' आणि 'प्रलंबित देयकांशिवाय नवीन काम करणार नाही' अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली होती. या गंभीर पेचप्रसंगात महाराष्ट्र विधान परिषद सदस्य - संजय खोडके यांनी लक्ष घालून कंत्राटदारांच्या मागण्या लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांच्या प्रभावी मध्यस्थीमुळे मजीप्रा कंत्राटदारांनीं आपले आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले. दरम्यान आ.संजय खोडके यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला असता प्रशासकीय हालचालींना वेग आला असल्याने अशातच आता मजीप्रा कंत्राटदारांची वर्षभरापासूनची थकीत देयके अदा करण्यासाठी १४.६६ कोटीची रक्कम मजीप्राच्या एसीबीआय खात्यात जमा करण्यात आली आहे. या संदर्भात आ.संजय खोडके यांच्या प्रयत्नाने मजीप्रा कंत्राटदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण🙏🙏
13/05/2026

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण🙏🙏

02/05/2026
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून ...
30/04/2026

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे आणि ज्येष्ठ नेते मा. श्री. छगनराव भुजबळ साहेब उपस्थित होते. श्रध्येय अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादीची युवा पिढी आता नव्या जोमाने मैदानात उतरली आहे, याचा मला मनापासून आनंद आहे.

शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा जपत श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे कृषि ...
10/04/2026

शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा जपत श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे कृषि विकास व शैक्षणिक विकासात भरीव कार्य सुरू आहे. आपणही शिवपरिवाराचा एक सदस्य असून संस्थेच्या प्रत्येक जनहिताच्या कार्याला आपली पूर्णपणे साथ राहणार असल्याचा विश्वास आ.संजय खोडके यांनी व्यक्त केले. भाऊसाहेबांच्या पावन स्मृतींचे स्मरण करून आज डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्य आ. संजय खोडके यांनी भाऊसाहेबांना पुष्पांजली वाहून मानवंदना अर्पण केली.यावेळी उपस्थित अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख व कार्यकारणी मंडळ तसेच शिवपरिवार

आज दिनांक २६ मार्च २०२६ रोजी माननीय आमदार श्री संजयजी खोडके साहेब यांनी आकाशवाणी अमरावतीच्या निमंत्रणास प्रतिसाद देत निय...
26/03/2026

आज दिनांक २६ मार्च २०२६ रोजी माननीय आमदार श्री संजयजी खोडके साहेब यांनी आकाशवाणी अमरावतीच्या निमंत्रणास प्रतिसाद देत नियोजित वेळेत केंद्राला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रभावी अशी मुलाखत दिली. मुलाखतीत "महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आणि अमरावतीच्या विकासाचे व्हिजन " या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल व विचारप्रवर्तक संवाद साधण्यात आला. त्यांच्या स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे श्रोत्यांना दिशादर्शक माहिती मिळेल. भेटीदरम्यान त्यांनी आकाशवाणी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांची जिव्हाळ्याने विचारपूस केली. या संस्मरणीय भेटीतील काही निवडक क्षणचित्रे...

*अमरावतीच्या एमआयडीसीतील औद्योगिक प्रकल्प ठराविक काल मर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली ?-आ...
24/03/2026

*अमरावतीच्या एमआयडीसीतील औद्योगिक प्रकल्प ठराविक काल मर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली ?-आ. संजय खोडके*

*शासनाच्या औद्योगिक धोरणांमध्ये उद्योगांना पायाभूत सुविधा व सवलती मिळाल्यास गुंतवणुकीला चालना मिळेल -आ. संजय खोडके*

*मेगा टेक्स्टाईल पार्क व भारत डायनॅमिक्स प्रकल्प रखडल्याने औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीवर प्रतिकूल परिणाम-आ.संजय खोडके*

*सर्व उद्योग प्रकल्प मार्गी लावण्याबाबत अमरावती येथे बैठक लावून निर्णय घेऊ -उद्योगमंत्री ना. उदय सामंत*

*मुंबई (प्रतिनिधी )दिनांक २४ मार्च महाराष्ट्र राज्यातील इतर महसूल विभागांच्या तुलनेत अमरावती विभागातील औद्योगिक स्थिती अत्यंत चिंताजनक असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील औद्योगिक घटक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांची संख्या संपूर्ण राज्यात या एकट्या अमरावती विभागात सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. अमरावतीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये नामांकित उद्योगांना पोषक सर्व स्थिती जमीन , वीज, पाणी व पायाभूत सुविधा अश्या सर्व बाबी उपलब्ध असतांना सुद्धा अमरावतीमध्ये उद्योजक गुंतवणुकीसाठी पुढे येत नाही. तसेच जे प्रकल्प सुरु केले ते अजूनही पूर्णत्वास येऊ शकले नसल्याने त्याचा अमरावतीच्या औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीवर प्रतिकूल परिणाम झाला असल्याचे सांगून आ. संजय खोडके यांनी अमरावतीच्या एमआयडीसीतील औद्योगिक प्रकल्प ठराविक काल मर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली , असा खडा सवाल महाराष्ट्र विधान परिषदेतून उपस्थित केला.

राज्यविधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विधानपरिषदेतील कामकाजामध्ये सहभागी होत असतांना आ. संजय खोडके यांनी अमरावती मधील उद्योगांबाबतचे मागासलेपण तसेच याबाबतची कारणे आणि उपाययोजना संदर्भात अनेक विषयांचे निवेदन सादर करून सभागृहाचे लक्ष वेधले.

देशातील सात मेगा टेक्सटाईल पार्कपैकी एक वस्त्रोद्योग उद्यान अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत गेल्या मार्च, २०२३ मध्ये स्थापन करण्यात आला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत विकसित करण्यात येणार असल्याने सदर प्रकल्पासाठी भूसंपादन, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, पाणी, सांडपाणी प्रक्रिया, ड्रेनेज व लॉजिस्टिक सुविधा वेळेत उपलब्ध झाली नसल्याने पायाभूत सुविधांची कामे अपुरी आहेत.
दरम्यान अमरावती येथील वस्त्रोद्योग उद्यानासाठी खरेदी केलेल्या जमिनीची किंमत इतर सहा राज्यांतील मेगा टेक्सटाईल पार्कसाठी खरेदी केलेल्या जमिनींच्या किंमतींपेक्षा जास्त असल्याने उद्योजक या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास उत्सुक नाहीत, त्यामुळे शासनाने इतर टेक्सटाईल मधील जमिनीचे दर तपासून नांदगांव पेठ येथील पीम -मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क मधील जमिनीचे दर निश्चित करावे, जेणेकरून उद्योजकांना या पार्क मध्ये गुंतवणूक करणे सोयीचे होईल.असे सुद्धा आ.संजय खोडके यांनी अधिवेशनात बोलतांना सांगितले. मेगा टेक्स्टाईल पार्कमध्ये जमिनीचे रेट १,२५१ प्रति चौ.मी. रुपयांवरून ५,९० रुपयांवर आणले असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. पण तेव्हाच शासनाने एक पत्र काढून उद्योगांना एका वर्षाची मर्यादा निश्चित केली. ज्यामध्ये एक वर्षात ज्या कंपनी अर्ज करतील व तीन वर्षात विकास करण्याचे करार करतील , त्यांनाच ५,९० रुपये नुसार प्लॉट देण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे केवळ तीन -चार महिन्यासाठी रेट कमी करून चालणार नाही, तर याबाबत एक सुयोग्य धोरण ठरविण्याचे गरज असल्याचे आ. संजय खोडके यांनी सांगून याबाबत एखादी पीएमसी किंवा तत्सम विशेष तज्ज्ञ यंत्रणेची नेमणूक करून सचिव, आयुक्त व सीईओ यांची एक बैठक घेऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे सुद्धा त्यांनी अधिवेशनात बोलतांना सांगितले.
अमरावतीच्या औद्योगिक वसाहतींमधील मोठ्या प्रकल्पांच्या दिरंगाईबाबत सुद्धा आ. संजय खोडके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. नांदगांव पेठ एमआयडीसीमध्ये रेमंड कंपनीला प्लांटसाठी ५०० एकर जागा देण्यात आली असून त्यापैकी केवळ ३८ एकरवर काम सुरू आहे. तसेच ठरल्याप्रमाणे ३ शिफ्टमध्ये काम अद्याप सुरू न झाल्याने ते तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.

अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्क मधील उद्योगांना ६७ रुपये दराने पाणी दिले जात असतांना हा रेट इतर एमआयडीसीच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसत आहे. त्यांना सांडपाणी प्रक्रिया पुनर्वाटर प्लांट प्रक्रियेतून पाणी देण्यात येत आहे. उद्योगांना १०० टाके पाणी रिसायकल करून मिळत असतांना ६० पाणी वापरात ये असून बाकीचे ४० टक्के पाणी उपयोगात पडत नाही. यासंदर्भात वर्ष २०२३ मध्ये टेक्स्टाईल पार्क मधील उद्योगांना पाण्याचे रेट अर्धे करण्यासंदर्भात सुद्धा मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. ज्यामध्ये आधीच्या पैशामध्ये ५० टक्के एमआयडीसी माफ करेल, ५० टक्के इंडस्ट्रीजने बिअर करण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु त्याचा निर्णय अजून पर्यंत होऊ शकला नाही. यासंदर्भात उद्योगांचे जुने पैसे कॅरी फॉरवर्ड न करता उलट उद्योजकांवर पेनाल्टी लावण्यात आली. या संदर्भात सुद्धा आमदार संजय खोडके यांनी सभागृहाला अवगत करून पाण्याच्या दरामध्ये उद्योजकांना सवलत देण्याची गरज असल्याचे सांगून आ. संजय खोडके यांनी उद्योगमंत्री ना. सामंत यांचे ध्यानाकर्षण केले.

त्याचप्रमाणे, भारत डायनॅमिक्सला ४०० एकर जागा देऊनही तो प्रकल्प अद्याप सुरू झाला नसल्याने स्थानिक विकासाचे उद्दिष्ट साध्य होण्यात अडथळे येत आहे. संरक्षण खात्याचा प्रकल्प बीडीएल प्रकल्पासाठी केवळ तेथे वॉल कंपाऊंड बांधण्यात आले. मात्र या प्रकल्पाला मोठे चार्जेस लावले जात असल्याने हा प्रकल्प मार्गी लागू शकला नाही. म्हणून उद्योगांना काय सवलती पाहिजे आहेत, यासंदर्भात सुद्धा उद्योग समूहांचे म्हणणे लक्षात घेणे महत्वाचे आहे. भारत डायनॅमिक्स हा प्रकल्प मार्गी लागल्यास अमरावतीच्या औद्योगिक विकासाला नवे स्वरूप मिळणार असल्याचे त्यांनी सभागृहा समक्ष सांगितले.
अमरावती विभागातून मालवाहतुकीसाठी येणारा मोठा खर्च कमी करण्यासाठी या भागात 'एक्स्पोर्ट कंटेनर डेपो टर्मिनल' उभारणे ही उद्योजकांची जुनी मागणी असून त्यावर सुद्धा आज विचार करण्याची गरज असल्याचे आ. संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष स्पष्ट केले.

अमरावतीच्या औद्योगिक विकासाबाबत अनेक प्रश्न असून याबाबत सखोल संशोधन, दुरुस्त्या व सुधारणा करण्याची गरज आहे.एमआयडीसीचे सीईओ पासून तर उद्योग आयुक्त यांच्या पर्यंत सर्वच यंत्रणांमध्ये समन्वय व चांगल्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. यामधल्या काही उणीवा भरून काढून सक्षमतेने धोरण ठरविण्यास उद्योग उभारणीसाठी चांगले काम करता येणार असल्याचेसुद्धा त्यांनी सभागृहाला पटवून दिले. अमरावती विभागात १ लाख हेक्टरमध्ये संत्रा पीक घेण्यात येते. त्यामुळे रिलायन्स सारखी मोठी कंपनी अमरावती येथे १ हजार कोटींची गुंतवणूक करणार होती. मात्र हा प्रकल्प काटोल येथे गेला असल्याचे सांगून आमदार संजय खोडके यांनी नाराजी व्यक्त केली.

यावर उत्तर देतांना राज्याचे उद्योग मंत्री नामदार -उदय सामंत यांनी सांगितले कि, अमरावती येथील पीएम मित्रा मेगा टेक्स्टाईलपार्क हा लवकरात लवकर सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी उद्योगसमूहांना गुंतवणूक करता यावी म्हणून प्लॉट चे रेट ५९० प्रति चौ. मी. करण्यात आले आहेत. यासंदर्भात सदस्यांनी ज्या सूचना केल्यात त्यानुसार बैठक बोलावून टेक्स्टाईल पार्क मधील प्लॉट चे रेट पुढील एक वर्षभरासाठी ५९० प्रति.चौ, मी. एवढे कायम करण्याबाबत निर्णय घेऊ,असे उत्तर मंत्रीमहोदयांनी दिले. तसेच टेक्स्टाईल पार्क मधील उद्योगांना पाण्याचे रेट अधिक असल्याबाबत आ. संजय खोडके यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना मात्र ना. सामंत यांनी सांगितले कि, टेक्स्टाईल कंपनींना वर्ष २०२३ पासून ६७ रुपये पाण्याचा रेट लागू केले. त्यात कुठलीही वाढ न करता ते अजूनही कायम आहेत. तसेच त्यांना पूर्वीचे ५० टक्के दराचे पैसे माफ करण्याबाबत सुद्धा आजच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्रीमहोदयांनी सभागृहासमक्ष दिले. टेक्सटाईल पार्क व अन्य प्रकल्पांच्या उर्वरित जागा सुद्धा अन्य उद्योगासाठी वापरण्याबाबत सुद्धा कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमरावतीच्या औद्योगिक विकासाशी संदर्भात आवश्यक बाबींची पूर्तता व्हावी , गुंतवणुकीला चालना व उद्योगांना भरभराटी देण्यासंदर्भात तसेच उद्योजकांच्या समस्या व संबधित अडथळे लक्षात घेता, अमरावती येथे सर्व उद्योग सचिव, आयुक्त ,सीईओ तसेच नामंकित उद्योगांचे सीईओ यांची एकत्रित बैठक घेऊन अमरावतीच्या औद्योगिक विकास , गुंतवणुकीला चालना,उद्योगांना सवलत व सुविधा याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ. असे उत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्याच्या औद्योगिक विकासाला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दावोस सोबत करार केलेला आहे. त्यामुळे दावोस येथील एखादा मोठा उद्योग अमरावतीच्या एमआयडीसीमध्ये उभारण्यासंदर्भात सुद्धा पुढील काळात कार्यवाही केली जाणार असल्याचे उद्योगमंत्री ना. सामंत यांनी आ. संजय खोडके यांची विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना सांगितले.

24/03/2026
*विदर्भातील वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज-आ.संजय खोडके* *महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधे...
24/03/2026

*विदर्भातील वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज-आ.संजय खोडके*

*महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधेयक २०२६ वर आ.संजय खोडके यांची चर्चा*

*मुंबई(प्रतिनिधी )दिनांक -२३ मार्च महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास विदर्भात सर्वाधिक वनपरिक्षेत्र असून वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासह मानवांना सुद्धा वन्यप्राण्यांपासून धोका पोहोचू नये म्ह्णून महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या वन्यजीव संरक्षक दुरुस्ती विधेयक २०२६ चा उपयोग खऱ्या अर्थाने विदर्भाला होण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची सुचना आ.संजय खोडके यांनी विधान परिषदेतून केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेने वन्यजीव संरक्षण संशोधन विधेयक २०२६ पारित केले आहे. या शासकीय विधेयकावर आज अधिवेशनाच्या अठराव्या दिवशी विधानपरिषदेमध्ये चर्चा होत असतांना आ.संजय खोडके यांनी या विधेयकाला पाठिंबा जाहीर करीत समर्थन दिले. तसेच सदर केंद्र शासनाच्या वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये राज्यशासनाच्या वतीने दुरुस्ती करण्यात येत असतांना त्यामध्ये विदर्भातील वन्यजीव परिक्षेत्राला चांगला उपयोग होण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची सुचना आ. संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष केली.

आ.संजय खोडके यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले कि, भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ ,मध्ये दुरूस्ती करण्याचे विधेयक महाराष्ट्र शासनाने आणले आहे. यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम च्या कलम १२ अंतर्गत ज्या तरतुदी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये मुख्य वन्यजीवांचे पर्यायी अधिवास स्थानांतरण करणे, वनजीवन संख्येचे व्यवस्थापन करणे यासाठी हे विधेयक आणले असून या विधेयकामुळे वन्यजीव व मानव या संघर्षाला आळा बसणार असल्याचे सांगून आ.संजय खोडके यांनी राज्यशासनाचे अभिनंदन केले. आमदार संजय खोडके यांनी सभागृहाचे ध्यानाकर्षण करतांना सांगितले कि, नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्यात वन संरक्षक निधी मधून निधीचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये पुण्याला १७ कोटी , कोल्हापूर १४ कोटीचा निधी वितरित करण्यात आला. तर नाशिकला १९ कोटी , ठाणेसाठी ५ कोटी निधी देण्यात आला. मात्र विदर्भासाठी कुठलाही निधी देण्यात आला नाही. या संदर्भात जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उचलला, माध्यमांनीही लक्ष वेधले असता विदर्भासाठी २ कोटी निधी देण्यात आले, मात्र अजूनही निधी वितरित झाला नसल्याचे आ. संजय खोडके म्हणाले.
विदर्भामध्ये सर्वात जास्त वने असलेले क्षेत्र म्हणून ताडोबा ,पेंच, मेळघाट सारखे वन्य भाग असून पोहरा जंगल हे अमरावती शहराला लागून आहे. तेथील वन्यजीव तर शहरात भटकंती करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे अशा अधिक वन क्षेत्र असलेल्या भागात प्रभावी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. पोहरा भागातील वनविकासाच्या संदर्भात मागे वन विभागाच्या निधीतील व्याजाचा जो ७ कोटी निधी होता, तो जुन्नर ला खर्च करण्यात आला असल्याचे सुद्धा आ. संजय खोडके सभागृहात म्हणाले. त्यामुळे वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधेयक पारित करीत असतांना विदर्भाशी दुजाभाव होता कामा नये. अशी विनंती सुद्धा आ. संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष करीत महाराष्ट्र विधानसभेच्या वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधेयक २०२६ चे समर्थन करीत पाठिंबा जाहीर केला आहे.

Address

Amravati

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjay Khodke - A Vision. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sanjay Khodke - A Vision.:

Share