Vishnu Savara

Vishnu Savara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vishnu Savara, Wada.

आम्ही मतदान केले आपणही करा.! लोकशाही बळकट ही आपण केलेल्या मतदानावर होते.!
21/10/2019

आम्ही मतदान केले आपणही करा.! लोकशाही बळकट ही आपण केलेल्या मतदानावर होते.!

'आज आंतरराष्ट्रीय योग दिन.' त्या निमित्त सर्व योगप्रेमी नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!    प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी य...
21/06/2019

'आज आंतरराष्ट्रीय योग दिन.'
त्या निमित्त सर्व योगप्रेमी नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!
प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' घोषित केला असून जगभरातील 177 देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. योगाला आता वैद्यकीय चिकित्सा व जीवनपद्धतीच्या स्वरुपात जगभरातील लोक स्वीकारत आहेत.

श्री.जे.पी. नड्डाजी यांची भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...
18/06/2019

श्री.जे.पी. नड्डाजी यांची भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

18/06/2019
राज्याचे महसुल मंत्री श्री.चंद्रकांतदादा पाटील आज आपला वाढदिवस.त्या निमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!  आपणास उत्तम आयुरा...
10/06/2019

राज्याचे महसुल मंत्री श्री.चंद्रकांतदादा पाटील आज आपला वाढदिवस.
त्या निमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन! आपणास उत्तम आयुरारोग्य लाभो,
ही सदिच्छा !

09/06/2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक शु...
09/06/2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक शुक्रवारी संपन्न.
----------------------------
राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊन देखील ११५ लाख मेट्रिक टन उत्पादकता होती. शेतीतील गेल्या साडेचार वर्षातील गुंतवणूकचे आणि जलसंधारणाच्या कामांचे हे यश आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी बियाणे, खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्जपुरवठा बँकांनी करावा असे सांगून पावसाचा अंदाज घेऊन आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पेरणी करवी,असे आवाहन मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत बोलताना केले.
या बैठकीस विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभागाचे सचिव, आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हार्दिक अभिनंदन!मार्च २०१९ मध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इय...
08/06/2019

हार्दिक अभिनंदन!
मार्च २०१९ मध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावीच्या) परीक्षेत धवल यश संपादन केलेल्या राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल शैक्षणिक कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने अधिकाधिक लोकाभिमुख योजना राबवाव्यात ---------------------       मुंबई दि .७ जून : ...
08/06/2019

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने अधिकाधिक लोकाभिमुख योजना राबवाव्यात
---------------------
मुंबई दि .७ जून : शबरी आदिवासी विकास व वित्त महामंडळाने अधिकाधिक लोकाभिमुख योजना राबवून आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी आज येथे केले.
त्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे या महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
या सभेस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील तसेच आदिवासी विभागाचे उपसचिव ल. ना. डोके, महाव्यवस्थापक उत्तम कावडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
महामंडळाच्या विविध उपक्रमांची या सभेत सविस्तर चर्चा झाली. यात प्रामुख्याने महामंडळा मार्फत राबवण्यात येणारे भावी उपक्रम, महा मंडळाचे संगणकीकरण तसेच कर्मचारी वर्ग व इतर अनुषंगिक बाबी याबाबत चर्चा झाली.
महामंडळाने आगामी काळात जास्तीत जास्त लोकाभिमुख व लोकपयोगी उपक्रम राबवून महामंडळ सक्षम करावे, ज्यायोगे महामंडळाची महती व माहिती लोकांपर्यंत पोहोचेल,असे मंत्रि महोदयांनी यावेळी सुचित केले.
--------

Address

Wada

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishnu Savara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vishnu Savara:

Share