BVA_Naigaon

BVA_Naigaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BVA_Naigaon, Political Party, Vasai.

21/02/2025

वसई विरार ची शान म्हणजे लोकनेते हितेंद्र ठाकूर,वसई विरार ची शक्ती म्हणजे लोकनेते हितेंद्र ठाकूर,वसई विरार चा कैवारी म्हणजे लोकनेते हितेंद्र ठाकूर.

18/05/2022
 #नायगाव_रेल्वे_स्थानकात लवकरच बसणार  #सरकते_जिने ( #एस्कलेटर्स) व  #उद्वाहक (लिफ्ट)  – माजी सभापती  #कन्हैया (बेटा) भोई...
18/03/2021

#नायगाव_रेल्वे_स्थानकात लवकरच बसणार #सरकते_जिने ( #एस्कलेटर्स) व #उद्वाहक (लिफ्ट) – माजी सभापती #कन्हैया (बेटा) भोईर #

नायगाव परिसराचे झपाट्याने नागरीकरण होत असून लोकसंख्या वेगाने वाढत आहे. परिणामी नायगाव स्टेशनवरील प्रवाशांची संख्याही कईक पटीने वाढत आहे. असे असताना स्थानकातील मुलभूत सोई-सुविधांची कमतरता मात्र प्रकर्षाणे जाणवत आहे. सद्यस्थितीत नायगाव स्थानकात स्टेशन विस्तार, पादचारी पुल, आवश्यक ठिकाणी शेड, सी.सी.टि.व्ही. कॅमेरे, निकास मार्ग, रंगकाम व इतर विविध आवश्यक कामे प्रगतीपथावर आहेत. आता लवकरच नायगाव रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सरकते जीने (एस्कलेटर्स) बसविण्यात येणार असल्याचे माजी सभापती कन्हैया (बेटा) भोईर यांनी सांगितले.

नायगाव रेल्वे स्थानकांवरील आवश्यक सोई सुविधांकरीता लोकनेते, आमदार हितेंद्रजी ठाकूर यांचे मार्गदर्शनखाली मागील 4.5 वर्षांपासून सन्मा. रेल्वेमंत्री, डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर, पश्चिम रेल्वे चर्चगेट मुख्य कार्यालय व नायगाव रेल्वे स्टेशन अधिक्षक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच याकाती स्थानकाची प्रत्यक्ष पाहणीसुद्धा करण्यात आलेली होती. सदर पाठपुराव्याच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेच्या डिव्हीजनल इलेक्ट्रिक इंजिनिअर (पॉवर), मुंबई सेंट्रल यांचेमार्फत पत्र जा.क्र. एल-166/एस्कलेटर्स दि.30/01/2018 व जा.क्र. ईएल-82/284 वीओएल-6 दि.23/10/2018 तसेच जा.क्र. ईएल-81/284 वीओएल-6 दि.25/10/2018 अन्वये स्थानकात सरकत्या जीने व सोलर पॅनल बसविण्यात येणार असल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आलेले होते. परंतु याकामी 2018 पासून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे नायगाव स्टेशनचे तत्कालीन अधिक्षक संतोष पाटील यांनी भेटीअंती सांगितले होते.

नायगाव स्थानकातील सरकते जीने (एस्कलेटर्स) व इतर आवश्यक सोई सुविधांबाबत विचारणा केली असता स्थानकात टप्प्याटप्प्याने 02 सरकते जिने (एस्कलेटर्स) व 01 उद्वाहक (लिफ्ट) बसविण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे. याकामी नुकतेच रेल्वे अधिकाऱ्यांमार्फत सर्व्हे करण्यात आलेला असून स्टेशन अधिक्षक कार्यालयास अधिकृत पत्रही देण्यात आलेले आहे. त्यानुसार फलाट क्र. 2 व 3 च्या मध्ये चर्चगेट बाजूस असलेल्या नविन पादचारी पुलावर सरकता जिना (एस्कलेटर) बसविण्यासाठी बॅरीकेडींग करण्यात आल्याचे नायगाव स्टेशनचे विद्यमान अधिक्षक कौशल किशोर यांनी सांगितले.

सद्यस्थितीत नागयाव रेल्वे स्थानकातील सर्वांत मोठी समस्या म्हणजे स्वच्छता गृहे (शौचालय/मुतारी). स्वच्छता गृह बांधणेबाबत महानगरपालिकेने पुढाकार घेऊनसुद्धा रेल्वे व सॉल्ट विभागाच्या आपआपसातील वादंगात काम अडकलेले आहे. सद्यस्थितीत नायगाव स्टेशन फलाट क्र. 1 वर फक्त एक स्वच्छता गृह असून त्याचीही बिकट दुरावस्था झालेली आहे. सबब ज्येष्ठ नागरीक, लहाने मुले, दिव्यांग तथा महिलांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. बहुतांशी वेळा रेल्वे प्रवाशांना नाईलाजास्तव उघड्यावर नैसर्गिक विधी करावे लागतात. त्यामुळे नायगाव पुर्वेकडील सबवेजवळ, पश्चिमेकडील उड्डाणपुलाखाली दुर्गंधीचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. दोन्ही बाजूकडील तिकीट खिडीक्यांची संख्या कमी व तिकीट खिडक्यांसमोरील पॅसेज लहान असल्याने तिकीटासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. सदर समस्यांसोबत स्थानकालगतचे धोकादायक वृक्ष, पाणपोई, कॅन्टीन, दिव्यांग स्वच्छता गृह, स्टेशनलगत पार्कींग, कचरा पेट्या, रॅम्प बांधणे व इतर विविध समस्यांबाबत लोकनेते, आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सभापती श्री. कन्हैया (बेटा) भोईर यांनी सांगितले.

Address

Vasai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BVA_Naigaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share