Shivsena VVMC - शिवसेना वसई विरार महानगरपालिका

  • Home
  • India
  • Vasai
  • Shivsena VVMC - शिवसेना वसई विरार महानगरपालिका

Shivsena VVMC - शिवसेना वसई विरार महानगरपालिका शिवसेना सदैव तुमच्यासोबत
Official facebook Page of Shivsena Vasai-Virar-Nallasopara.

१७ ऑक्टोबर २०१० : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर युवासेनेची स्थापना.
माननीय आदित्य ठाकरे यांची युवासेना प्रमुख म्हणून नेमणूक.
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी परिषद् २०१०-११ यासाठी अध्यक्ष व सचिव पदावर युवासेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड. विद्यापीठावर फडकला युवासेनेचा भगवा.
मुंबई विद्यापीठात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वर्ष २०१० च्या सिनेट निवडणुकीत १० पैकी ८ जागा जिंकून विद्यापीठावर युवासेना

प्रमुख मा. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे निर्विवाद वर्चस्व.
मुंबई विद्यापीठ उपकेन्द्र उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवली मनपाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांच्याकडे जागा हस्तांतरित केली. यासाठी युवासेना प्रमुख मान. आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता.
परीक्षा विभागातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी युवासेनेने जोरदार पाठपुरावा करून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि पाचव्या शनिवारी विद्यार्थी तक्रार निवारण दरबार भरविण्यास भाग पाडले.
तसेच विद्यार्थांना तक्रार करणे सोयीचे होण्याकरिता विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईटला लिंक करून सिनेट सदस्य व विद्यार्थी तक्रार निवारण समिती यांच्याशी संपर्क करण्यासाठी वेबसाईट बनवली.
मुंबई विद्यापीठाचा पुनर्मूल्यांकन निकाल लवकर जाहीर करण्यासाठी युवासेना व सिनेट सदस्यांनी सतत पाठपुरावा केला.
विद्यापीठ सर्वच परीक्षांचा निकाल वेळेवर लावण्यास असमर्थ ठरते. अभियांत्रिकी, विधी, वाणिज्य, कला, विज्ञान तसेच सर्वच परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्यासाठी सर्व सिनेट सदस्यांनी विद्यापीठावर सतत दबाव आणून शक्य तितक्या लवकर निकाल जाहीर करण्यास भाग पाडले आहे. या संपूर्ण निकालप्रक्रियेवर युवासेना सिनेट सदस्य कायम लक्ष ठेवून असतात व विद्यार्थी माहिती देत असतात.
पाटकर महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या अश्लील व गैरवर्तणुकीविरोधात आवाज उठवून महाविद्यालय व पोलीस यंत्रणेला प्राध्यापकावर करवाई करण्यास भाग पाडले.
तृतीय वर्षातील विद्यार्थांना परीक्षा देताना पुरवणी उत्तरपत्रिका पुरवण्यास विद्यापीठ टाळाटाळ करीत होते. याविरुद्ध सिनेट सदस्यांनी जोरदार आवाज उठवून विद्यार्थांना लागतील तेवढ्या पुरवण्या उपलब्ध करण्यास भाग पाडले.
अपंग विद्यार्थांना पेपर सोडविताना १ तास जास्त वेळ देण्याची मुभा आहे. परंतु बऱ्याच महाविद्यालायांना याची माहिती नसल्यामुळे बरेचसे विद्यार्थी यापासून वंचित राहतात. याबाबत सिनेट सदस्यांनी जागरुकता दाखवून अपंग विद्यार्थांना पेपर सोडविण्यासाठी त्यांच्या हक्काचा एक तास मिळवण्यासाठी सहकार्य केले.
देशपातळीवरील तिरंदाजी स्पर्धेमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना स्पर्धेत प्रवेश देण्यास मुंबई विद्यापीठ सहकार्य करत नव्हते. याविरुद्ध आदित्यसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिनेट सदस्यांनी आवाज उठवून या खेळाडूंना न्याय मिळवून दिला.
चिनॉय व एम.व्ही.एल.यू. मोक्याचा ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने महाविद्यालय बंद करण्यासाठी विद्यार्थ्यांना वैयक्तिक त्रास देऊन परीक्षेस बसण्यास हरकत घेतली होती. याविरुद्ध युवासेनेने जोरदार आंदोलन केले तसेच विद्यापीठ स्तरावर देखील सिनेट सदस्यांच्या माध्यमातून महाविद्यालयावर दबाव आणला. या परिस्थितीत युवासेनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांना घेराव घालून सर्व विद्यार्थ्यांना दूरशिक्षण अभ्यासक्रमातील परीक्षेस सामावून घ्यायला लावून त्यांना परीक्षेस बसायला दिले. त्याचबरोबर सिनेट सदस्यांनी विद्यापीठ स्तरावर दबाव आणून शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसविण्यास भाग पडले. यासाठी केलेल्या आक्रमक संघर्षात युवासेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांना अटक झाली होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
भायखळा येथील सेंट मेरी विद्यालयाची मान्यता शासनाने रद्द केली होती. यांचा नाहक त्रास संबंधित विद्यालयातील विद्यार्थी व पालकांना होत होता. जवळजवळ १५०० विद्यार्थांना दुसऱ्या शाळेत विस्थापित व्हावे लागणार होते युवासेनेने यास जोरदार आक्षेप घेतला आणि विद्यालयाला पूर्ववत मान्यता मिळवून देण्यात सहकार्य केलं आणि विद्यार्थी व पालकांना न्याय मिळवून दिला.
मिशन क्लीन या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयातील स्वच्छतागृहे, उपाहारगृहे यांना ग्रेड देण्याची मागणी युवासेनेने केली. यासंबंधी सिनेटच्या बैठकीत तसा ठराव मान्य करून घेतला तसेच अजूनही याबाबत युवासेना पाठपुरावा करत आहे
मुंबई विद्यापीठच्या प्राधिकरण निवडणुकीमध्ये युवासेनेचे सिनेट सदस्य कार्यकारी कमिटी व इतर समित्यांवर निवडून आले. पुन्हा एखदा युवासेनेचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले
गोरेगाव (प.) येथील एल.एन.पटेल महाविद्यालयातील ७३ विद्यार्थांना दुसऱ्या वर्षातील वाणिज्य शाखेतील अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश देण्यास महाविद्यालयास भाग पाडले.
रत्नागिरी उपकेंद्रामध्ये असलेल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे विद्यार्थांना त्रास होत होता. याविरुद्ध सिनेट सदस्यांनी सभागृहात आवाज उठवून तेथे अपूर्ण बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी आणि कर्मचारी यांची संख्या वाढवण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला.
मुंबई विद्यापीठामध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी सिनेट सदस्यांना कायमस्वरूपी जागा नाही यासाठी विद्यापीठामध्ये ठिय्या आंदोलन करून जागा उपलब्ध करून घेतली
युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून रस्त्यावर, उद्यानात दिव्याच्या प्रकाशावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई मनपाने १६ शाळा अभ्यासिकेसाठी उपलब्ध करून दिल्या.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत झालेल्या चर्चेत आदित्य यांनी विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या डब्याची मागणी केली. त्यानंतर येणाऱ्या अर्थसंकल्पात तत्कालीन मा. रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी याविषयी घोषणा केली होती.
राज्यातील शिकाऊ डॉक्टरांचे विद्यावेतन रु. २५५० इतके अत्यल्प होते. या अन्यायाविरुद्ध त्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये युवासेना अध्यक्ष मा. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व डॉक्टरांना जोरदार पाठिंबा दिला. यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन विद्यावेतन वाढविण्याची आग्रही मागणी केली. युवासेनेमुळे बाकीच्या पक्षांचं लक्ष पण या आंदोलनाकडे लागलं.
मुंबईत अनधिकृतरीत्या असलेल्या धोकादायक गतिरोधकांविरुद्ध आवाज उठवून सगळे गतिरोधक एकसमान करण्याची मागणी मनपाकडून मान्य करून घेतली.
मुंबई विद्यापीठात युवासेनेच्या मागणीनुसार प्रथमच जनता दरबार सुरू करण्यात आला. महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी ११.०० ते १.३० परीक्षा भवन विद्यानगरीमध्ये जनता दरबार घेतला जातो.
मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या कला, वाणिज्य, बी.एम.एस. आणि बी.एससी. शाखेचा विलंबलेला निकाल युवासेनेच्या आंदोलनामुळे त्वरित जाहीर झाला आणि विद्यापीठाचे संकेतस्थळ कार्यरत नसल्यामुळे युवासेनेच्या मदत कक्षाने सुमारे १६,५७१ विद्यार्थांना निकालासंदर्भात मदत केली.
मुंबई विद्यापीठाच्या विलंबलेल्या निकालामुळे IBPS बँकिंग प्रवेशाच्या परीक्षेची १ जुलैची शेवटची तारीख होती. या वर्षी निकाल उशिरा लागल्याने यंदा उत्तीर्ण होणारे पदवीधर अर्ज भरण्यास असमर्थ होते. ही मुदत वाढवून १५ ऑगस्ट करावी यासाठी युवासेनेतर्फे IBPS ला निवेदन देण्यात आले आणि विद्यापीठास देखील IBPS ला यासंदर्भातील निवेदन देण्यास भाग पाडले.
मुंबईत अतिवृष्टीमुळे आणि उच्च ज्वारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शिवसेना – युवासेना मुंबई महानगरपालिका यांच्या मदत कक्षातून मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर होती.
आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत विजयी झालेल्या हिंदुस्थानी संघ व त्या संघात समाविष्ट असलेल्या मुंबईकर युवराज वाल्मिकी यांचं स्वागत युवासेनेतर्फे करण्यात आले व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना कार्यकारी प्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी आणि युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे यांनी युवराजला हॉकी खेळाचे किट देऊन भविष्यात लागेल ती मदत करण्याचे जाहीर केले.
युवासेना अवाजवी एसएमएसवर रोख लावणाऱ्यांच्या विरोधात आहे. TDTALM या प्रकारच्या एसएमएसवर प्रतिबंध केलाच पाहिजे किंवा त्या स्वीकारण्याचा अथवा बंद करण्याचा DND सारखा विकल्प असला पाहिजे. सरकारने एसएमएसवर बंदी घालणे म्हणजे अभिवादन स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. युवासेना याविरोधात आहे. त्याऐवजी सरकारने आतंकवाद, भूक, भ्रष्टाचार आणि महागाई थांबवली पाहिजे.
गत वर्षांमध्ये ४ वेळा प्रभारी प्राचार्यांच्या नेमणुका करणाऱ्या शासकीय कायदे महाविद्यालयावर (GLC) दयनीय अवस्था आली होती आणि तेव्हाचे प्राचार्य हे न्यूट्रिशिनिअस्ट व होम सायन्सचे शिक्षक होते म्हणून त्यांच्या विरोधात युवासेनेने निदर्शने व आंदोलने केली. सोबत जोरदार पाठपुरावा केला आणि अनुभवी व उच्चशिक्षित कायद्याचे ज्ञान असलेले पूर्ण वेळ प्राचार्य देण्यास भाग पडले.
अभियांत्रिकी महाविद्यालय :
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी व त्याबाबतचा अहवाल वेळच्या वेळी संबंधित व्यवस्थापनांना देण्यासाठी महाविद्यालयीन पातळीवर स्थानिक परीक्षण समिती नेमा अशी मागणी युवासेनेने केली आहे. काही महाविद्यालयांच्या प्रयोगशाळांमध्ये आवश्यक उपकरणे नाहीत, कुठे प्रत्येक विषयाला प्राध्यापक नाहीत, ग्रंथालयात पुरेशी पुस्तके नाहीत, जिमखाना नाही, कॅन्टीन स्वच्छ नाहीत तर कुठे विद्यार्थ्यांकरता कॉमन रूम नाही. अशा विविध तक्रारींचा यात समावेश आहे. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार युवासेनेने के.सी. कॉलेज दत्ता मेघे व यादवराव तासगावकर आदी महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाला सूचना केल्या आहेत.
तरुणांसाठी युवासेनेची हेल्पलाईन : शिक्षण, आरोग्य, रोजगार याबरोबरच तरुणांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी युवासेनेची हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.
दूरध्वनी क्र २४३२८१८१
युवासेनेचे सिनेट सदस्य सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सायं. ५ ते ७ या वेळेत विद्यार्थांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी शिवसेना भवन येथे उपस्थित असतात.

मनसे युवानेते मा.श्री अमितजी ठाकरे ह्यांच्या आज वसई विरार दौऱ्या दरम्यान वसई पूर्व फादरवाडी येथे शिवसेना ,युवासेनेच्या व...
30/08/2026

मनसे युवानेते मा.श्री अमितजी ठाकरे ह्यांच्या आज वसई विरार दौऱ्या दरम्यान वसई पूर्व फादरवाडी येथे शिवसेना ,युवासेनेच्या वतीने वसई तालुक्यात स्वागत केले. सदर प्रसंगी जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत,जिल्हा अधिकारी अतुल मोटे , मनसेचे प्रवीण भोईर, वितेंद्र पाटील ,उपजिल्हा अधिकारी भट्टा म्हात्रे, रूपेश चव्हाण, रोहन पठारे,ओमकार भोपाळगडे , राहुल पाटील, गणेश साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा!
27/08/2026

सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा!

वसंतनगरी रस्त्यासाठी सुमारे ₹9 कोटी सार्वजनिक निधी खर्च झाल्याची माहिती आहे; मात्र रस्त्याची दुरवस्था पुन्हा कायम आहे.या...
26/08/2026

वसंतनगरी रस्त्यासाठी सुमारे ₹9 कोटी सार्वजनिक निधी खर्च झाल्याची माहिती आहे; मात्र रस्त्याची दुरवस्था पुन्हा कायम आहे.

या विषयावर युवासेनेच्या शिष्टमंडळाने आज वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौर मा. अजिवजी पाटील साहेब, आयुक्त मा. बी. प्रदीप साहेब व विरोधी पक्षनेते मा. मनोजजी पाटील साहेब यांची भेट घेऊन स्वतंत्र तांत्रिक चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

याप्रसंगी उपस्थित :
युवासेना जिल्हा अधिकारी – अतुल मोटे
जिल्हा सचिव – प्रतिक जाधव
जिल्हा चिटणीस – निशांत बिरजे
जिल्हा समन्वयक – रोहन पाठारे
उपजिल्हा अधिकारी – भारत म्हात्रे, रुपेश चव्हाण, भूषण वैती, जयेश पाटील
युवासैनिक – ब्रह्मेश सावंत, कौस्तुभ म्हात्रे, गणेश साठे, अर्जुन खैरे, गौरव झांझे, अविनाश खैरे, कैलास टोपले, अमित राणे, प्रथमेश सुर्वे

जनतेचा पैसा — जनतेच्या विकासासाठी!
जवाबदारी निश्चित झालीच पाहिजे. ✊

#वसंतनगर #वसईविरार #जनतेचापैसा #पारदर्शकता #जनतेचाआवाज

वसई विरार महापालिकेत ९५७ कोटींचा कचरा टेंडर घोटाळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आरोप प्रक्रिया रद्द करून तत्काळ...
26/08/2026

वसई विरार महापालिकेत ९५७ कोटींचा कचरा टेंडर घोटाळा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आरोप
प्रक्रिया रद्द करून तत्काळ चौकशी करा

१४ कोटी खर्चूनही रस्ता खड्ड्यात! वसंतनगरी रस्ते कामातील कथित भ्रष्टाचाराची स्वतंत्र चौकशी करा; ठाकरेंची युवासेना आक्रमकव...
25/08/2026

१४ कोटी खर्चूनही रस्ता खड्ड्यात! वसंतनगरी रस्ते कामातील कथित भ्रष्टाचाराची स्वतंत्र चौकशी करा; ठाकरेंची युवासेना आक्रमक

वसई : वसंतनगरी येथील रस्त्याच्या कामासाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे ₹१४ कोटींच्या निधीच्या वापराबाबत आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे काम आणि शासकीय निधीच्या संभाव्य गैरवापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.युवासेनेच्या शिष्टमंडळाने महापौर मा. अजीवजी पाटील, आयुक्त मा. पृथ्वीराज बी.पी. तसेच विरोधी पक्षनेते मा. मनोजजी पाटील यांची भेट घेऊन याबाबत निवेदन साद केले. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही मागील वर्षी तसेच यावर्षीदेखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने कामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य, प्रत्यक्ष मोजमाप आणि निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात केवळ प्रशासकीय चौकशी न करता स्वतंत्र वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी व तांत्रिक तपासणी करण्यात यावी. तसेच प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, मंजूर अंदाजपत्रक, प्रत्यक्ष कामाचे प्रमाण, ठेकेदारास केलेली देयके, मोजमाप पुस्तिका, बिले आणि गुणवत्ता नियंत्रण अहवालांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेल्या डांबर, खडी, मुरूम व इतर साहित्याची गुणवत्ता निर्धारित मानकांनुसार होती का, त्यांचे प्रयोगशाळा अहवाल काय आहेत, याचीही चौकशी करण्यात यावी. प्रत्यक्ष कामापेक्षा अधिक काम कागदोपत्री दाखवण्यात आले का, निकृष्ट साहित्य वापरूनही बिले मंजूर करण्यात आली का किंवा मोजमाप व देयकांमध्ये अनियमितता झाली का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सदर कामाशी संबंधित सैतान सिंग या ठेकेदाराची कार्यपद्धती व करारातील अटींचे पालन यांची चौकशी करून काम निकृष्ट असल्याचे निष्पन्न झाल्यास ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करावी, नुकसानभरपाई वसूल करावी तसेच संबंधित अधिकारी, अभियंते व ठेकेदार दोषी आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची तातडीने तांत्रिक पाहणी करून दर्जेदार डागडुजी करण्यात यावी, अशी मागणीही युवासेनेने केली आहे.

“जनतेच्या करातून जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्ता खराब होत असेल, तर या निधीचा हिशोब जनतेसमोर आला पाहिजे. दोषी कोणत्याही स्तरावरील असो, चौकशीत दोष सिद्ध झाल्यास कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

यावेळी युवासेना जिल्हा अधिकारी अतुल मोटे, जिल्हा सचिव प्रतीक जाधव, जिल्हा चिटणीस निशांत बिरजे, जिल्हा समन्वयक रोहन पठारे, वसई उपजिल्हा अधिकारी भरत म्हात्रे, नालासोपारा उपजिल्हा अधिकारी रुपेश चव्हाण, बोईसर उपजिल्हा अधिकारी जयेश पाटील ,भूषण वैती, कौस्तुभ म्हात्रे ,गणेश साठे, ब्रह्मेश सावंत, गौरव झांजे,अमित राणे, प्रथमेश सुर्वे,अर्जुन खैरे, कैलास टोपले यांच्यासह सागर बागले शहर समन्वयक विनित जाधव सहसचिव नालासोपारा ,युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

९५७ कोटींच्या कचरा निविदेत मोठा गैरव्यवहार; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक!वसई-विरार शहरात कचऱ्याचा बोजवारा उडाल...
24/08/2026

९५७ कोटींच्या कचरा निविदेत मोठा गैरव्यवहार; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक!
वसई-विरार शहरात कचऱ्याचा बोजवारा उडाला असताना, प्रशासनाने घाईघाईने ९५७ कोटींची संशयास्पद निविदा कंत्राटदारांच्या घशात घातली आहे. मनुष्यबळ आणि गाड्यांची कपात करून पालिकेची व जनतेची फसवणूक सुरू आहे.
प्रमुख मागण्या:
१) ९५७ कोटींची संशयास्पद निविदा तातडीने रद्द करा.
२) या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा.
३) आगामी महासभेत नवीन पारदर्शक प्रस्ताव आणा.
जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाला निवेदन दिले असून, कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा दिला आहे!

🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - नालासोपारा शहर 🔥हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर...
17/08/2026

🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - नालासोपारा शहर 🔥
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माजी जिल्हाप्रमुख श्री. शिरीषदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख रोहन शिरीष चव्हाण यांच्या नेतृत्वात नालासोपारा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.
🩸 ११२ रक्त पिशव्यांचे संकलन!
या उपक्रमास पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार! 🤝❤️

युवासेना जिल्हा सचिव श्री. प्रतीक जाधव ह्यांच्या वतीने आयोजित ‘प्रतीक पर्व’ दहीहंडी सराव शिबिर. वर्ष ४ !!
17/08/2026

युवासेना जिल्हा सचिव श्री. प्रतीक जाधव ह्यांच्या वतीने आयोजित ‘प्रतीक पर्व’ दहीहंडी सराव शिबिर. वर्ष ४ !!

14/08/2026

Address

पंचवटी शिवसेना शहर शाखा , वसई पश्चिम
Vasai
401202

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena VVMC - शिवसेना वसई विरार महानगरपालिका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share