Swachh Vengurla

Swachh Vengurla स्वच्छ वेंगुर्ला हे वेंगुर्ला नगरपरिषदेचे अधिक़त पेज आहे.

10/11/2023
25/10/2023

हवामानातील बदल हे मोठे पर्यावरणीय आहवान आहे............














Majhi Vasundhara
Directorate of Municipal Administration, Maharashtra
Ministry of Housing and Urban Affairs
Urban Development Department Government of Maharashtra
Swachh Bharat Mission - Urban
Swachh Maharashtra Mission -Urban

हवामानातील बदल हे मोठे पर्यावरणीय आहवान आहे..........
25/10/2023

हवामानातील बदल हे मोठे पर्यावरणीय आहवान आहे..........

जगभरात १४ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ई- कचरा दिवस (ईलेक्‍ट्रॉनिक/ इलेक्‍ट्रीकल वेस्‍ट) म्हणून साजरा केला जातो. यानिमि...
14/10/2023

जगभरात १४ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ई- कचरा दिवस (ईलेक्‍ट्रॉनिक/ इलेक्‍ट्रीकल वेस्‍ट) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्‍ताने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दि. १४ ऑक्‍टोंबर २०२३ रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेची एक गाडी ई - कचरा संकलन करणेसाठी शहरातील सर्व प्रभागामध्‍ये फिरविण्‍यात आली असून नागरिकांनी आपल्‍या घरात असलेला ई -कचरा जसे की, (खराब झालेले टी.व्‍ही.चे पार्टस , वायर्स, चार्जर, इलेक्ट्रॉनिक वस्‍तु, खराब झालेले फोन, प्रिंटर्स, टयुब लाईटस, इ.) नगरपरिषदेच्‍या वाहनामध्‍ये देवून ई कचरा दिवस साजरा केला.
वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत शहरातील विविध प्रभागामधून संकलित करण्यात आलेल्या ई कच-यावर प्रक्रिया करणेसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचेकडून मान्यता प्राप्त असलेल्या "ग्‍लोबल ई वेस्‍ट मॅनेजमेंट सिस्टिम, गोवा " यांच्‍याशी करार केलेला आहे यानुसार त्यांचेमार्फत शहरातील जमा करण्यात आलेल्या ई कचऱ्यावर शास्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. सर्व जमा झालेला ई-कचरा (जवळपास 600 किलो एवढा) कचरा आज दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी "ग्‍लोबल ई वेस्‍ट मॅनेजमेंट सिस्टिम, गोवा " यांना पुढील प्रक्रिया साठी देण्यात आला.
















0

ULB Name - Vengurla Municipal CouncilULB Code - 802879प्रेस नोट स्वच्‍छ भारत अभियान २.० (नागरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्...
23/09/2023

ULB Name - Vengurla Municipal Council
ULB Code - 802879
प्रेस नोट
स्वच्‍छ भारत अभियान २.० (नागरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण त‍था शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांनी दि. १५ सप्‍टेंबर २०२३ ते दि. २ ऑक्‍टोंबर २०२३ या कालावधीत स्वच्‍छता पंधरवडा आयोजित करणेबाबत सुचित केलेले आहे. यासअनुसरुन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सफाई मित्र यांच्‍याकरीता सेवा व सुरक्षा शिबीर आयोजित करण्‍यात आले होते.
वेंगुर्ला नगरपरिषद आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्‍या संयुक्‍त विदयमाने नगरपरिषदेच्‍या सर्व सफाई कर्मचा-यांसाठी शुक्रवार दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी आपला दवाखाना, वेंगुर्ला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्‍यात आले. यामध्‍ये सर्व सफाई कर्मचा-यांचा दैनंदिन चेकअप, रक्‍ताच्या विविध चाचण्‍या व इतर आरोग्‍य विषयक तपासण्या करुन त्‍यांना आवश्‍यकतेनूसार औषधे देण्‍यात आली.
वेंगुर्ला नगरपरिषदेकरीता स्वच्छता विषयक सर्व प्रकारची कामे करणा-या तसेच नगरपरिषदेस प्राप्‍त होणा-या विविध पुरस्‍कारांमध्‍ये महत्वाची भूमिका बजावणा-या सर्व सफाई कर्मचा-यांच्‍या आरोग्‍याची काळजी घेणे गरजेचे आहे. स्वच्‍छता विषयक विविध कामे करताना सफाई कर्मचा-यांना रोगराईची लागण होवू शकते यामुळे त्‍यांच्‍या आरोग्‍यावर विपरीत परिणाम होण्‍याची शक्‍यता असते. यास अनुसरुन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सर्व सफाई कर्मचा-यांकरीता या प्रकारची आरोग्‍य तपासणी शिबीरे नियमितपणे आयोजित करण्‍यात येणार असल्‍याचे मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी सांगितले.













ULB Code-802879ULB Name- Vengurla Municipal Council      "स्वच्छोत्सव २०२३"स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान ३.० अं...
31/03/2023

ULB Code-802879
ULB Name- Vengurla Municipal Council
"स्वच्छोत्सव २०२३"
स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत "स्वच्छोत्सव २०२३" आयोजित करण्यात आलेला होता.
महिलांचा स्वच्छते मधील सहभाग वृद्धिंगत करण्यासाठी, स्वच्छते मधील महिलांच्या अतुलनीय कामगिरीचा सन्मान करण्यासाठीच्या हेतूने सदर कार्यक्रम Led Sanitation या ब्रीदवाक्याने साजरा करण्यात आला.
शून्य कचरा दिनाचे (Zero Waste Day) औचित्य साधून शून्य कचरा व्यवस्थापन तसेच प्लास्टिक मुक्त शहर या संकल्पनेवर आधारित असा "स्वच्छोत्सव २०२३" वेंगुर्ला नगरपरिषदे मार्फत साजरा करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दी साठी सर्व कापडी बॅनर वापरण्यात आले .प्लास्टिक चा वापर कुठेही करण्यात आला नाही.

~~*सांस्कृतिक कार्यक्रम*~~
स्वच्छोत्सव २०२३ अंतर्गत एक आगळावेगळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
* या कार्यक्रमा मध्ये फक्त महिलांच्या सहभागातून स्वच्छतेच्या प्रचार व प्रसिध्दी साठी विविध प्रकारचे नृत्य, पथनाट्य, समूहगीत सादर करण्यात आले.
* या मधून स्वच्छतेचे महत्व, स्वच्छतेचा संदेश मनोरंजकरित्या सादर करण्यात आला.

ULB Code- 802879ULB Name- Vengurla Municipal Council      "स्वच्छोत्सव २०२३"स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान ३.० अ...
31/03/2023

ULB Code- 802879
ULB Name- Vengurla Municipal Council
"स्वच्छोत्सव २०२३"
स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत "स्वच्छोत्सव २०२३" आयोजित करण्यात आलेला होता.
महिलांचा स्वच्छते मधील सहभाग वृद्धिंगत करण्यासाठी, स्वच्छते मधील महिलांच्या अतुलनीय कामगिरीचा सन्मान करण्यासाठीच्या हेतूने सदर कार्यक्रम Led Sanitation या ब्रीदवाक्याने साजरा करण्यात आला.
शून्य कचरा दिनाचे (Zero Waste Day) औचित्य साधून शून्य कचरा व्यवस्थापन तसेच प्लास्टिक मुक्त शहर या संकल्पनेवर आधारित असा "स्वच्छोत्सव २०२३" वेंगुर्ला नगरपरिषदे मार्फत साजरा करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दी साठी सर्व कापडी बॅनर वापरण्यात आले .प्लास्टिक चा वापर कुठेही करण्यात आला नाही.

* वुमेन्स फूड फेस्टिवल*
महिला बचत गटांना आत्मनिर्भर बनविणे, महिलांना शून्य कचरा व्यवस्थापनाचे महत्व सांगणे या उद्देशांनी "स्वच्छोत्सव २०२३" अंतर्गत Food Festival आयोजित करण्यात आला होता.
_या फेस्टिवल मधील खास वैशिष्टये म्हणजे_
* सर्व खाद्यपदार्थ केळीच्या पानावर देण्यात आले.
* पाणी पिण्यासाठी स्टीलचे फुलपात्र/ग्लास वापरण्यात आले.
* कोठेही प्लास्टिक चा वापर करण्यात आला नाही.
* सर्व महिला बचत गटांनी कागदी माहिती फलक तयार करून प्रत्येक स्टॉल वर लावले होते.




















ULB Code- 802879ULB Name- Vengurla Municipal Council        "स्वच्छोत्सव २०२३"स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान ३.०...
31/03/2023

ULB Code- 802879
ULB Name- Vengurla Municipal Council
"स्वच्छोत्सव २०२३"
स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत "स्वच्छोत्सव २०२३" आयोजित करण्यात आलेला होता.
महिलांचा स्वच्छते मधील सहभाग वृद्धिंगत करण्यासाठी, स्वच्छते मधील महिलांच्या अतुलनीय कामगिरीचा सन्मान करण्यासाठीच्या हेतूने सदर कार्यक्रम Led Sanitation या ब्रीदवाक्याने साजरा करण्यात आला.
शून्य कचरा दिनाचे (Zero Waste Day) औचित्य साधून शून्य कचरा व्यवस्थापन तसेच प्लास्टिक मुक्त शहर या संकल्पनेवर आधारित असा "स्वच्छोत्सव २०२३" वेंगुर्ला नगरपरिषदे मार्फत साजरा करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दी साठी सर्व कापडी बॅनर वापरण्यात आले .प्लास्टिक चा वापर कुठेही करण्यात आला नाही.
*स्वच्छ चित्रकला स्पर्धा*
* स्वच्छोत्सव- 2023 कार्यक्रमाची सुरुवात नगरपरिषदे तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेने झाली.
* स्वच्छतेवर आधारित विषयांवर तीन गटांमध्ये ही स्पर्धा भरवली होती.
* या स्पर्धेमध्ये लहान-मोठया सर्वांनी सहभाग घेतला. जवळपास १०० स्पर्धाकांमधून प्रत्येक गटामधून तीन विजेते निवडण्यात आले.
* विजेत्यांना नगरपरिषदे तर्फे प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि "झाडे लावा, झाडे जगवा" या संदेशास अनुसरून सर्वांना एक वृक्षाचे रोपटे देण्यात आले.




















ULB Name: VengurlaULB Code: 802879महाराष्ट्र शासन पर्यटन संचालक यांमार्फत 15 डिसेंबरपासून 3 महिन्यांच्या कालावधीसाठी महा...
22/12/2022

ULB Name: Vengurla
ULB Code: 802879

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालक यांमार्फत 15 डिसेंबरपासून 3 महिन्यांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रात गंतव्यस्थानाच्या जाहिरातीसाठी 6 माहितीपटांची मालिका शूट करण्यासाठी tv 18 ब्रॉडकास्ट लिमिटेडची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे.

या मालिकेमध्ये वेंगुर्लेमधील खालील ठिकाणांचा समावेश आहे.
मत्स्य बाजारपेठ, वेंगुर्ला नगरपरिषद इमारत, कलादालन, वेंगुर्ला light house.

ही मालिका म्हणजे वेंगुर्ला शहर पर्यटनासाठी नक्कीच हातभार असेल.
सदर माहितीपट मालिका शूट करण्यासाठी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हिंदी अभिनेता कुणाल विजयकर यांनी वेंगुर्ला नगरपरिषद स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालन यास भेट दिली.
यावेळेस वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी कम्पोस्ट डेपो येथे तयार केलेले जैविक खत तसेच फुलाचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळेस मुख्याधिकरी यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत राबविले जाणारे विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प यांची माहिती दिली. वेंगुर्ला स्वच्छता पॅटर्न, क्रॉफर्ड मार्केट तसेच वेंगुर्ला नगरपरिषद पर्यटनाला चालना देण्यासाठी करत असलेले विविध प्रकल्प यांची माहिती दिली.








ULB Name: VengurlaULB Code: 802879वेंगुर्ला नागरपरिषेदेमार्फत स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक व ना...
29/11/2022

ULB Name: Vengurla
ULB Code: 802879

वेंगुर्ला नागरपरिषेदेमार्फत स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबिविले जात आहेत. तसेच केंद्र व राज्य शासन नियमावलीनुसार 3R Principle ची देखील प्रभावी अमलबजावणी सुरू आहे.






वेंगुर्ला नगरपरिषद वेंगुर्लादिनदयाळ अंत्‍योदय योजना राष्‍ट्रीय नागरी उपजिवीका अभियान वेंगुर्ला नगरपरिषदलोकसंख्‍या (२०११ ...
28/11/2022

वेंगुर्ला नगरपरिषद वेंगुर्ला
दिनदयाळ अंत्‍योदय योजना राष्‍ट्रीय नागरी उपजिवीका अभियान वेंगुर्ला नगरपरिषद
लोकसंख्‍या (२०११ च्‍या जनगणनेनुसार)  १२३९२
एकुण बचतगट: १०५ 
बचतगटात एकुण सभासद: १०७७  

ULB CODE: 802879

दिनदयाळ अंत्‍योदय योजना राष्‍ट्रीय नागरी उपजिवीका अभियाना अंतर्गत महिलांनी  मसाला उद्योग, पत्रावळी बनवणे, कापडी पिशवी बनवणे, खाद्यपदार्थ (पुरणपोळी, फराळ) निर्माण व विक्री, खानावळ, कुक्‍कुटपालन, दुग्‍धव्‍यवसाय, गावठी भाजीपाला शेती व विक्री, मत्‍स्‍याविक्री इ. व्‍यवसाय सुरु केले आहेत. व अभियान अंतर्गत एकुण कर्जवाटप: २ कोटी ५ लाख  ९१  हजार (२०१५-२०२२ पर्यंत) करण्‍यात आले आहे. 

दिनदयाळ अंत्‍योदय योजना राष्‍ट्रीय नागरी उपजिवीका अभियाना अंतर्गत शहरी गरीब कुटुंब अनुसुचीत जाती जमाती, अल्पसंख्‍याक, विधवा, हे लाभार्थ्‍यांचा आर्थिक सामाजिक स्‍तर उंचवावा या साठी त्‍यांना वैयक्‍तीक  कर्ज, ग्रुपगट कर्ज, बचतगटकर्ज  दिले जाते हे  कर्ज परतफेड करण्‍यासाठी ३ ते ५ वर्षांचा कालावधी देण्‍यात येतो व ७ टक्‍के  व्‍याजावरील रक्‍कम व्‍याज अनुदान म्‍हणुन देण्‍यात येते. प्रत्‍येक  बचतगटाला १०,०००/- रुपये फिरता निधी दिला जातो. संकल्‍पना, लेखा, नेतृत्‍व विकास, उद्योजकता अशा  प्रकारचे विविध प्रशिक्षण देण्‍यात आलेले आहेत. आतापर्यंत वैयक्‍तीक स्‍तरावर ७२ लाख ८० हजार एवढे कर्ज देण्‍यात आले आहे. त्‍याचबरोबर आरोग्‍य शिबीर, महिला मेळावा, सांस्‍कृतीक, सामाजिक उपक्रम इत्‍यादी च्‍या माध्‍यमातुन महिलांच्‍या आत्‍मविश्‍वासात वाढ झालेली आहे व प्रगती साधत आहेत.  


वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत मोहीम राबविण्यात आली.
24/11/2022

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत मोहीम राबविण्यात आली.

Address

Swachh Bharat Paryatan Sthal Ramghat Road Vengurla (Waste Processing Plant)
Vengurla
416516

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swachh Vengurla posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Swachh Vengurla:

Share